लेखनप्रकार (Writing Type)
==================================================================
नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी... माळ नववी... माळ दहावी...
==================================================================
पुढारी मधील समतोल लेखा जोखा प्रस्तावीत मोठ्या प्रकल्पांची सद्य्स्थीती.
-------------------------------------------------------------
दमणगंगा - पिंजाळ (पेयजल पुरवठा योजना)
• दमणगंगा नदीवर भूगड येथे धरण (एकूण क्षमता- ४२६ द.ल.घ.मी.)
• भूगड धरणातून २८७ द.ल.घ.मी. (१०० टक्के विश्वासार्हतेचे) पाणी ८५ कि.मी. लांबीच्या जोडबोगद्यातून खारगीहिल जलाशयात सोडण्यात येईल.
• वाघ नदीवर खारगीहिल येथे धरण (एकूण क्षमता - ४६१ द.ल.घ.मी.)
• खारगीहिल धरणातून २९० द.ल.घ.मी. (१०० टक्के विश्वासार्हतेचे) पाणी २६ कि.मी. लांबीच्या जोडबोगद्यातून पिंजाळ जलाशयात सोडण्यात येईल.
• पिंजाळ नदीवर खिडसे येथे पिंजाळ धरण (एकूण क्षमता ४१४ द.ल.घ.मी.)
• पिंजाळ धरणातून मुंबईसाठी ३३२ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात येईल.
• १२८० कोटी रुपये.
नार-पार-तापी-नर्मदा योजना
• पश्चिम घाटातील जास्तीचे पाणी सौराष्ट्र व कच्छला देणार. त्यासाठी सात धरणं व ३९५ कि.मी. लांबीचा कालवा. पाणी सोडणार सरदार सरोवर धरणात. किंमत ६००० कोटी रुपये.
• महाराष्ट्रातील या योजनेतील ८१३ द.ल.घ.मी. पाण्यापैकी ६०० द.ल.घ.मी. पाणी गुजरातला द्यायचा मूळ प्रस्ताव.
• पण महाराष्ट्राला गिरणा उपखोऱ्यासाठी ३०० द.ल.घ.मी. पाणी आवश्यक आहे. त्याबाबत चर्चा चालू.
• गुजरातने अय्यंगार समितीच्या शिफारशींचा आदर करावा, अशी महाराष्ट्राची भूमिका.
गोदावरी-कृष्णा प्रकल्प
• गोदावरी नदीवर या योजनेद्वारे ८० टीएमसी पाणी उचलणार.
• १७४ कि.मी. लांबीच्या पोलावरम उजव्या कालव्यातून ते ८० टीएमसी व अन्य स्रोतातील ४० टीएमसी असे एकूण १२० टीएमसी पाणी कृष्णेत सोडणार.
• १३ लाख एकर जमीनीला पाणी मिळणार.
• किंमत १३०० कोटी रुपये.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना
• पश्चिम महाराष्ट्रातील सहा वेगवेगळ्या नद्यांतून एकूण ११५ टीएमसी ‘अतिरिक्त पाणी’ फक्त पावसाळ्यात आणले जाईल. त्या नद्या व कंसात प्रत्येक नदीतली तथाकथित ‘अतिरिक्त पाणी’ टीएमसीमध्ये पुढीलप्रमाणे ः कुंभी (३), कासारी (७), वारणा (३७), कृष्णा (५१), पंचगंगा (१०) व निरा (७).
• तथाकथित अतिरिक्त पाण्याचे प्रस्तावित वाटप प्रकल्पनिहाय पुढीलप्रमाणे आहे ः (कंसातील आकडे ‘टीएमसी’मध्ये) ः टेंभू (१३.२५), ताकारी (३.०), म्हैसाळ (१०), माण-खटाव-कोरेगाव (७.५), ढाकाळे (२.०५), नीरा (१६.२०), उजनी (४२), कृष्णा-मराठवाडा (२१).
• सिंचन क्षमता - ६,७२,७०६ हेक्टर.
• पाणी वापर - ११५ टीएमसी.
• किंमत ः १३,५७६ कोटी (२००९-१०).
• सद्यःस्थिती ः प्रकल्प रद्द झाला.
कारण वाचा :
राज्यात 56 टक्के जलसाठा
- दहावी माळ विजयादशमीला प्रकाशीत केली नाही कारणः
- अजूनही दुष्काळ रावणाचे दहन झालेले नाही. समस्त विजय कसा साजरा करणार ?
- मालीकाच जलजागर असण्याने शेवटच्या लेखाला "कोजागर" सारखा दुग्धशर्करा योग येणे क्रमप्राप्त आहे.
- लेखमाला नक्की कशासाठी आणि मिपा वाचकांकडून काय अपेक्षा ते त्यांच्या शंका समाधानात देत आहेच.
आणि हो मी फक्त हमाल आहे भारवाही मूळ मालक वेगळा आहे . जी माहीती आहे ती सकाळ प्रकाशनच्या "अग्रोवन" मधून जशीच्या तशी फक्त आपल्या करिता देत आहे.मी विचारवंत नसल्याने त्याचे मूल्यमापन करण्यास असमर्थ आहे. पण महाराष्ट्रभर विखुरलेले मिपाकर नक्की त्याबद्दलचे अनुभव सिद्ध मत देत देतील आणि सगळी माहीती मिळेल हाच धाग्याचा साधा आणि सरळ उद्देश आहे
त्यात दिलेल्या लोकांशी (सरकारी अधिकारी,सरपंच आणि लाभार्थी यांच्याशी फोनवर बोललो आहे)
स्नेहांकिता – पाण्याचा थेंबही वाया जाताना पहिला तर मन तळमळते. दुर्दैवाने भारतात याविषयी अत्यंत अनास्था दिसते. जल-अभियान होणे आवश्यक आहेधन्यवाद पाणी साक्षरता याची शहरातील सर्वच थरातील लोकांना फार गरज आहे . घराघरातून पाणी वापराची काटकसर शिकवली गेली तरी चांगला फरक पडेल. मुख्य शहरातील प्रत्येक कुटुंबाने दिवसाला किमान १० लिटर वाया जाणारे पाणी वाचवले तरी शेतीचे हक्काचे पाणे जे शहराला पुरवले जाते ते वाचेल आणि शेतीसाठी देता येईल. शहर पुणे किमान १० लीटर लोकसंख्या ३१,२४,४५८ (साक्षर २४,९६,३२४) किमान २०% लोकांनी जरी पाणी वाचवले (बंगल्यातील-झोपडीतील-चाळीतील-सोसायटीतील-फ्लॅट मधील) असा भेदभाव न बाळगता तरी किमान ६,५०,००० लोक होतात. आता सहा लाख पन्नास हजार गुणीले १० लिटर गुणीले ३६५ दिवस असा हिशेब
२३७२५
लाख लीटर इतकाच फक्त येतो. हे फक्त पुण्याचे मुंबई ठाणे आणि औद्योगीक यांचा विचार केला तर किती होईल ते क.अकौंटंट यांनी पहावे ही विनंतीमदनबाण –महाराष्ट्राला बर्याच काळाने एक उत्तम मुख्यमंत्री लाभला आहे !फडणवीस माझ्या कंपनीतील सहकारी आणि इअतर काही मित्रांच्या मते (थेट पैश्याची खिरापत करीत नसल्याने) अगदी शहरी मुख्यमंत्री आहेत (त्यातही काही महाभाग ब्राम्हण असल्यानेच अकार्यक्षम आहेत असा शिक्का ठेवूनही मोकळे झाले आहेत. जाणत्या राजांनीच फडणवीस मुख्यमंत्री ठरताच "महाराष्ट्राला ब्राम्हण मुख्यमंत्री परवडणार नाही" असे जाहीर विधान केले होतेच.त्यामुळे रा.काँच्या पाठीराख्यांकडून मला वेग्ळी अपेक्षा नव्हतीच. तरी देवेंद्रांची बातचीत तुमच्या साठी फडणवीशी
प्रसाद१९७१ - नाखु साहेब, ह्या लेख माले बद्दल तुमचे आभार मानावेत तितके कमी आहेतसाहेब म्हणून दूर लोटू नका. मला मिपाकरच राहू द्या. ही माहीती मी फक्त आप्लयपर्यंत पोहोचवली मी फक्त वाढपी आहे. पाक कौशल्य अअॅग्रोवनचे आहे. आभार+ अभिनंदन त्या त्या भागातील लाभार्थींचे,सहभागींचे करा
एस -सवडीनुसार मीही काही टंकण्याचा प्तयत्न करतो.अवश्य वाट पहात आहे.
पैसा - वाचते आहे! बंधार्यातील गाळ काढणे एकूण शेतीला सर्वप्रकारे फायदेशीर झालेले दिसतेअर्थात आर्थीक फायदा तर आहेच प जमीनीची सुपीकता आणि भोगर्भातील पाणीसाठा यासाठी संजीवनी आहे.
डॉ सुहास म्हात्रे -पुढची पायरी म्हणून, या सर्व लेखांचा गोषवारा करून एखाद्या मोठ्या वाचकसंख्या असलेल्या नियतकालिकात प्रसिद्ध केल्यास ते अजून खूप मोठ्या लोकसंख्यपर्यंत पोहोचू शकेल. नाखु यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! जिथे हे काम चालले आहे तेथिल मिपाकरांनी त्यांचे प्रत्यक्ष अनुभव लिहून या माहितीत भर टाकावी असे सुचवतो.ही माहीती मी नियतकालीकातून संकलीत केलेली आहे मिपा वाचकांना लेखमालेत प्रस्तुत केली आहे. लेखांचे दुवे देण्यापेक्षा थेट माहीतीच दिली आहे. मी फक्त वाढपी आहे.
स्वधर्म - लेख व विषय अावडला.धन्यवाद. आजच श्री भुजबळ यांचे कडून माहीती घेतली त्या नुसार अद्द्यावत केली आहे
अभ्या.. -लहान गांवे जरी पाण्याच्या बाबतीत स्वावलंबी झाली तरी सध्या पुरेसे आहे. बाकी शहरांना राजकारण्यांना हाताशी धरुन पाणी मिळवायची टॅक्ट जमतेदोन्ही बाबतीत तंतोतंत सहमत. शहरी भागातील लोकांचे राजकीय महत्व (मतदार) असल्याने पाण्याचे बाबतीत जरा फाजील लाड होतात हे मी पिंपरी-चिंचवड मध्ये अनुभवले आहे. काही भागात पाण्याची कमतरत असेल पण एकूण पाण्याची चंगळ आहे हे सर्वांना मान्य आहे.
गुलाम -या योजनेतल्या त्रुटी (प्रामाणिकपणे) दाखवणारे प्रतिसाद देखील आले असते तर धाग्याचा दर्जा अजुन उंचावला असता.ही लेख माला लिहिण्यामागे हाच उद्देश होता. ती एकांगी राहू नये याकरीता तरी मिपाकरांनी त्यांचे वौक्तीक (मित्रांचे) अनुभव इथे मांडावेत ही विनंती.
नमकिन -महाराष्ट्रात दुष्काळ जाहिर झाला, परंतु सोलापूरचे नाव यादीत नाहीं, हे का? अवर्षण इथे कायम आहे, वर्षों पासुन तरीही? शिवारात पाऊसच नाहीं तर कसं होणार?दुष्काळाचे निकष काय आहेत मला माहीत नाहीत सरकारी कर्मचारीच ठीक सांगू शकतील.
अनुप ढेरे - यातलं ७४६ हा आकडा टीएम्सी नसावा. खूप जास्तं होइल तेलहान बंधार्यातील पाणी साठा Thousand Qubic Meter असा मोजला जातो आणि तो मोठ्या धरणांतील (थाउजंड मिलीयन क्युबिक फीट) बरेच लहान(छोटे) परिमाण आहे (मैल आणि फूट).
प्रतिक्रिया
उत्तम लेखमाला नाखुकाका.
चाम्गली लेखनमाला नाखुनकाका.
अभ्या
माझे एक स्नेही
धन्यवाद
आणखी ४ पैसे (याच धाग्याला उद्देशून असल्याने)
आजचे
बारामती, पुरंदर, आंबेगाव आणि इंदापूर तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना या अभियानाचा चांगला लाभ मिळाला आहे. या अभियानात निवडलेल्या गावांमध्ये चार हजारांहून अधिक कामे झाली आहेत. या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. अशा स्थितीमध्ये या दोनशे गावांत पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचे आणि जिरविण्याचे काम झाले आहे. त्यामुळे गावातील भूजल पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेले बंधारे, ओढे भरले आहेत. या दोनशे गावांपैकी १३३ गावांत पूर्वी टँकरची आवश्यकता भासत होती. अभियानानंतर यापैकी ९० गावे टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. तर, ४७ गावे जलयुक्त झाली आहेत. या गावांमध्ये यंदा टँकरची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केला. त्यांनी पुरंदर आणि बारामती तालमुक्यांमध्ये झालेल्या कामाची पाहणी केली.
राव म्हणाले, या अभियानांतर्गत झालेल्या कामांना बळकटी यावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे नाला काठ स्थिरीकरणाचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये नव्याने झालेल्या नाल्यांच्या काठक्षेत्रावर विविध रोपे, बिया, गवत, घायपात कोंब लावण्यात येणार आहे. यामुळे या जलस्त्रोतांचे काठ स्थिर होतील आणि माती पुन्हा ओढे आणि नाल्यात जाणार नाही. टंचाईग्रस्त गावांतील भूजल पातळीमध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये उपयुक्त होणार आहे. First Published on October 28, 2015 3:20 am लोकसत्ता पुणे आवृत्तीआजचे फूल :ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्
ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा
दुष्काळी मराठवाडय़ात यंदा ४६ साखर कारखाने ऊस गाळप करण्याच्या तयारीत आहेत. तब्बल २ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्रावरील १६० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होईल. यातून २० लाख टन साखर उत्पादित होईल, असा अंदाज आहे. दुष्काळाच्या झळा तीव्र असणाऱ्या लातूर जिल्ह्यात सर्वाधिक ४२ हजार हेक्टर ऊस आहे. साखरेचे भाव घसरल्याने कारखान्यांचे अर्थकारण कोलमडले असले, तरी उसाची ही आकडेवारी अतिशोषित पाणलोटातील प्रदेशाची आहे, हे विशेष! हा ऊस पोसण्यासाठी हेक्टरी पाण्याची गरज मोजली असता ऐन दुष्काळात तब्बल १७२ टीएमसी पाणी उपसा झाल्याची प्राथमिक आकडेवारी आहे. एकीकडे तीव्र पाणीटंचाईमुळे खरीप हंगाम हातचा गेला असला, तरी जिगरबाज ऊस उत्पादकांनी ऊस पोसला आहे. यातील काही ऊस मध्यंतरी चाऱ्यासाठी तोडला गेला. परिणामी, सर्वसाधारणपणे १८० दिवस चालणारा उसाचा हंगाम या वर्षी १०० दिवसांपर्यंत घसरेल, असे अभ्यासक सांगतात. वास्तविक, आजही अनेक कारखान्यांनी आधारभूत किमतीनुसार शेतकऱ्यांना गेल्या वर्षीची रक्कम दिली नाही. औरंगाबाद विभागातील जालना, बीड, औरंगाबाद व जळगाव, तसेच धुळे जिल्ह्यातील १३ कारखान्यांकडे शेतकऱ्यांची तब्बल ६८ कोटी ५० रुपये देणी बाकी आहेत. ही रक्कम देण्याचा तगादा सरकारकडून सुरू असला, तरी दरांचे गणित बिघडलेले असल्याने ऊस उत्पादकांना रक्कम देणे अवघड होऊन बसले आहे. सध्या कारखान्यातून होणाऱ्या साखर विक्रीचा दर २४ रुपये ९० पसे प्रतिकिलो, तर मळीचा दर ४ हजार २०० रुपये प्रतिटन आहे. इथेनॉलसाठी चांगली मागणीही आहे. दरम्यान, दुष्काळातील उसाची आकडेवारीही सरकारदरबारी भुवया उंचवायला लावणारी आहे. एक हेक्टर ऊस पिकास सिंचनासाठी नक्त गरज २ हजार मिलिमीटरची असते. हे क्षेत्र खरोखरच उभ्या उसाचे असेल तर या हंगामात उसाने तब्बल १७२ टीएमसी पाणी घेतले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकाच पिकावर पाणी वापरले गेले तर दुष्काळ जाणवणारच, असे जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे सांगतात. काही कारखान्यांनी बॉयलर प्रदीपन सुरू केले आहे. दिवाळीनंतर ऊस तोडणीला सुरुवात होईल तेव्हा ऐन दुष्काळात वापरलेला पाण्याचा हिस्सा जरा लक्षात घेण्याची गरज असल्याचे असल्याचे जलअभ्यासक आवर्जून सांगत आहेत. जिल्हानिहाय कारखाने, ऊसक्षेत्र हेक्टरमध्ये व अपेक्षित गाळप मेट्रिक टनामध्ये औरंगाबाद ५ कारखाने, १५ हजार ९४७, १०.२५ लाख जालना ५ कारखाने, २६ हजार ९६, १३.४६ लाख बीड ६ कारखाने, ३६ हजार ७३, १९.१८ लाख (एकूण १६ कारखाने, अपेक्षित गाळप ४२ लाख ८९ हजार मेट्रिक टन) —————– नांदेड १८ हजार ७९२ लाख उस्मानाबाद ३१ हजार लातूर ४२ हजार ६७८ हिंगोली १७ हजार ६३० परभणी ३० हजार (या पाचही जिल्हय़ांचे अपेक्षित एकत्रित गाळप ९९.४४ लाख मेट्रिक टन, चालू होणारे कारखाने २५) पाणी ‘खाणारे’ पीक! लोकसत्तामधून थेट First Published on October 28, 2015 1:56 amजिगरबाज ऊस उत्पादकांनी ऊस
आजचे फुल
लोकसहभागातून जलयुक्त शिवार
- अभय दिवाणजी शनिवार, 31 ऑक्टोबर 2015 - 01:24 PM IST राज्यात एक लाख 20 हजार कामे पूर्ण; लोकसहभागाची योजना सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वर्षात वरुणराजाच्या अवकृपेला सामोरे जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या समाजाभिमुखतेचा आलेख चढता दिसतो आहे. लोकसहभागातून; पारंपरिकता सोडून दूरदृष्टीची उपाययोजना म्हणून केलेल्या ह्या कामांमुळे निर्माण झालेल्या शाश्वत पाणीसाठ्याने काही हजार गावांमध्ये तरी बळिराजाला निश्चितच चांगले दान मिळण्याची अपेक्षा आहे. उद्देश आहे महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्याचा. आतापर्यंत झालेली कामे आहेत एक लाख वीस हजारांवर. राज्य सरकारने त्यासाठी आतापर्यंत एक हजार 453 कोटी रुपये खर्च केले आहेत. ज्या ज्या गावांमध्ये ही कामे झाली आहेत, तिथे यंदा जो काही पाऊस पडला तो वाहून न जाता पाणी साठवले गेले. तब्बल 24 टीएमसी पाणी साठले. सोप्या भाषेत सांगायचे तर एवढ्या पाण्यात दोन लाख चाळीस हजार एकर जमीन भिजू शकेल. स्वातंत्र्योत्तर काळात पाण्यासाठी उभारली गेलेली ही सर्वांत मोठी लोकचळवळ ठरली आहे. मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर फडणवीस यांच्यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा गुंता होता. पॅकेजची पारंपरिक उपाययोजना करून हा गुंता सोडवण्यापेक्षा मूलभूत सोयी, सुविधा निर्माण करण्याचा विचार झाला. पंचवीस हजार दुष्काळी गावांची यादी तयार झाली आणि पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने या गावांना दुष्काळमुक्तीकडे नेण्याचा मोठा संकल्प केला गेला. शाश्वत शेतीसाठी पाणी आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हाच या अभियानाचा गाभा ठरू लागला आहे. या योजनेसाठी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी पॅटर्नबरोबर शिरपूर, हिवरेबाजार अशा विविध पॅटर्नचा अभ्यास करून एकत्रितपणे ही योजना तयार केली गेली. प्रशासकीय पातळीवर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पाठपुराव्याचे काम करण्यात येऊ लागले. या मोहिमेत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांध, नाला खोलीकरण आणि रुंदीकरण, असलेल्या छोट्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून त्यांची साठवणक्षमता पुनः पूर्वस्थितीला आणणे, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करणे, छोटे ओढे-नाले एकमेकांना जोडणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणीवापर संस्था बळकट करणे, अशी कामे हाती घेतली आहेत. या योजनेसाठी सरकारी अधिकारी, कॉर्पोरेट कंपन्यांनी मदत केली. नागपूर जिल्ह्यात श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने काम केले आहे. कॉर्पोरेट्सने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून 500 गावे दत्तक घेतली आहेत. मुंबईतील सिद्धिविनायक देवस्थान आणि शिर्डीतील साई देवस्थान यांनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कोटी असे प्रत्येकी 34-34 कोटी रुपये दिले आहेत. एकूण 248 कोटी रुपयांची कामे लोकसहभागातून होत आहेत. सोलापूर प्रथम क्रमांकावर ज्या ज्या जिल्ह्यात, तालुक्यात कडक भूमिका स्वीकारून तत्काळ निर्णय घेणारे प्रशासक आहेत, त्या त्या जिल्ह्यात वा तालुक्यात जलयुक्त शिवारच्या कामांची यशस्विता 90 टक्क्यांवर गेलेली दिसते. याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास सोलापूरचे सांगता येईल. सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी जलयुक्त शिवारच्या कामात झोकून दिल्याने आणि प्रत्येक वेळी तपासणी मोहीम हाती घेतल्याने जिल्ह्यात 19 हजार 524 कामे झाली आहेत. सरासरीच्या केवळ 38 टक्के पाऊस होऊनही अनेक शिवारात पाणी खेळताना दिसत आहे. या कामात सोलापूर राज्यात प्रथम क्रमांकावर आलेला आहे. सिंचनात वाढजलयुक्त शिवारच्या माध्यमातून केलेल्या कामांमध्ये विभागनिहाय पाणीसाठा पाहिल्यास कोकण 4,592.69, नाशिक 54,455.58, पुणे 81,617.77, नागपूर 63,125, अमरावती 50,606.77 आणि औरंगाबाद 1,58,015.16 टीसीएम पाणीसाठा झालेला आहे. राज्यात, एकूण तीन लाख 42 हजार 739.95 हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संरक्षित सिंचन झालेले आहे.
"डीसीएफ‘कडून सर्वेक्षण राज्यभरात जलयुक्त शिवारच्या झालेल्या कामांचे त्रयस्थांकडून परीक्षण (थर्ड पार्टी ऑडिट) करण्यात आले आहे. यासाठी "सकाळ‘च्या "डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन‘कडून (डीसीएफ) अभियानात समाविष्ट प्रत्येक गावात चाललेल्या सर्व कामांचे जागेवर प्रत्यक्ष जाऊन सोशल ऑडिट करण्यात आले. त्याचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. दान दुष्काळाचे स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला दोन मोठ्या दुष्काळांना तोंड द्यावे लागले. मात्र या दुष्काळांतून धडा घेत महाराष्ट्राने देशाला नवी दृष्टी दिली, नवी दिशा दिली. महाराष्ट्र सरकारने 1972च्या दुष्काळात रोजगार हमी योजना आणली. ही योजना भलतीच यशस्वी ठरली आणि पुढे याच यशाच्या प्रेरणेतून केंद्र सरकारने देशभर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविली. यंदाच्या दुष्काळात महाराष्ट्राने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. पाच वर्षे चालणाऱ्या या अभियानाचे पहिले वर्ष संपत आले आहे. पण या अभियानाची दखल देशपातळीवर घेतली जाऊ लागली आहे. विशेषतः राजस्थान सरकारने या अभियानाची गंभीर दखल घेत असाच प्रयत्न आपल्याकडेही कशाप्रकारे राबविता येऊ शकेल, याचा अभ्यास सुरू केला आहे. यासाठी राजस्थानमधील शासकीय अधिकारी महाराष्ट्रातील जलयुक्त शिवारमधील गावांना भेटी देत तेथील जलचळवळीची माहिती घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अभियानाची प्रशंसा केली आहे. विकेंद्रित जलसाठे आणि लोकसहभाग पाणलोट विकास चळवळ म्हटले की, राज्यातून हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच उदाहरणे आजवर समोर येत आहेत. जलयुक्त शिवार अभियानाने आता प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात किमान एक तरी गाव जलयुक्त गावांच्या पंक्तीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. या अभियानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकसहभागातून विकेंद्रित जलसाठे तयार करणे हे होय. या धोरणाचा अनुभव पाहून फडणवीस सरकारने गावोगावी छोटेछोटे जलसाठे तयार करण्याचे आणि या कामाला लोकसहभागाची जोड देण्याचे धोरण आखले आहे. या अभियानातून अनेक गावांत लोकसहभागाचे आदर्श निर्माण होत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मळेगाव, साताऱ्यातील जाखणगाव, लातूरमधील किनगाव, नागपूर जिल्ह्यातील झिल्पा, उस्मानाबादमधील अनेक गावांत लोकसहभागातून झालेली जलसंधारणाची कामे पाहता लवकरच ही गावे राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, शिवणी या गावांच्या बरोबरीने येतील असा विश्वास या अभियानाने महाराष्ट्राला दिला आहे, असे म्हणता येईल. सलग तीन वर्षे होरपळणाऱ्या या राज्याला लोकसहभागातून विकासाकडे वाटचाल करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मिळालेला हा नवविश्वास, हेच फडणवीस सरकारचे मोठे यश ठरणार आहे. दै सकाळ मधून साभारउत्तम संकलन आणि टिप्पण्या.
सध्या तरी वाखूसा.....
उत्तम लेखमाला
शेतकर्यांना सरसकट
अतिशय उत्तम लेखमाला!
आजचे पुष्प
सुंदर आणि अत्यंत माहितीपूर्ण
हा लेख एकदमच नजरेतून सुटला.
आजचे पुष्प
अतिशय चांगल्या बातम्या!
+१
आज्चे पुष्प
विदर्भ, मराठवाड्यात सामूहिक शेततळ्यासाठी 25 कोटी
विदर्भ, मराठवाड्यात सामूहिक शेततळ्यासाठी 25 कोटी
- Tuesday, November 17, 2015 AT 06:00 AM (IST) दैनीक अग्रोवन मधून साभार मुंबई - विदर्भ आणि मराठवाड्यातील सामूहिक शेततळ्यासाठी राज्य सरकारने यंदा 25 कोटी रुपयांच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही नवीन सामूहिक शेततळी योजना राबविली जाणार आहे. त्याद्वारे या भागातील फळबागायतदार शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत निर्माण करून फलोत्पादनाला संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्याचा उद्देश आहे. टंचाईच्या काळात अशा साठविलेल्या पाण्याद्वारे फळबागा जगविणे त्यामुळे शक्य होणार आहे. त्यासाठी यावर्षी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 25 कोटी रुपयांचा कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे. दोन्ही विभागांतील सर्व जिल्ह्यांत हा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. प्रत्येक शेततळ्यामागे दहा हेक्टर फलोत्पादन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी वीस लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. अस्तरीकरण नसलेल्या शेततळ्यांच्या अनुदानात तीस टक्के कपात केली जाणार आहे. चालू वर्षात हा निधी संपूर्ण खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या बैठकीत या कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजूर निधीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा हिस्सा अर्धा-अर्धा राहणार आहे.राज्यातील सिमेंटच्या साखळी बंधाऱ्यांसाठी पाचशे कोटी मंजूर
- Tuesday, November 17, 2015 AT 05:45 AM (IST) मुंबई - राज्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेला साखळी सिमेंट नाला बांध कार्यक्रम यंदा राज्यात अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार आहे. त्यावर येत्या वर्षभरात तब्बल पाचशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून राज्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागते आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारच्या काळात जलसंधारणाचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. राज्यातील शेतीसाठी संरक्षित जलसिंचनाची साधने निर्माण करणे, जमिनीची धूप थांबवणे, पडीक जमिनींचा विकास करून ग्रामीण भागातील उत्पन्नाची आणि उत्पादनाची साधने निर्माण करणे हा हेतू त्यामागे आहे. राज्याचे सरासरी पर्जन्यमान हे 1067 मिलिमीटर इतके आहे. राज्यात भौगोलिक आणि हवामानविषयक विविधता असल्यामुळे प्रदेशानुसार पर्जन्यमानही वेगवेगळे आहे. कोकणाचे सरासरी पर्जन्यमान सर्वाधिक म्हणजे 3 हजार 161 मिलिमीटर इतके तर मराठवाड्याचे सर्वाधिक कमी म्हणजे 826 मिलिमीटर इतके आहे. पश्चिम महाराष्ट्राचे सरासरी पर्जन्यमान एक हजार मिलिमीटर इतके तर विदर्भाचे सरासरी पर्जन्यमान 1 हजार 106 मिलिमीटर इतके आहे. सर्वाधिक कमी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यातील अर्धे पाणी अडविले, तरी या भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते. मात्र, येथील एकूण पावसापैकी साधारण दहा टक्के पाणीही अडवले जात नाही. गावागावांत, नद्या-नाल्यांवर, ओढ्यांवर, शेतीमध्ये, ओसाड माळरानावर, जंगलांमध्ये, डोंगरपायथ्याशी अशा ठिकठिकाणी जलसंधारणाचे लहान-मोठे प्रकल्प उभे करून विकेंद्रीत जलसाठे निर्माण करणे आवश्यक आहेत. त्यामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी त्या त्या गावात अडविले जाऊन त्याचा वापर त्याचठिकाणी होऊ शकणार आहे. आठ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेले धरण बांधण्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपये इतका खर्च होतो. यात धरणाच्या बांधकामापेक्षा जमिनीचे अधिग्रहण, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या बाबींचाच खर्च अधिक असतो. याउलट जलसंधारणाचे छोटे-छोटे प्रकल्प उभे केल्यास आठ टीएमसी पाणीसाठ्यासाठी आवश्यक कामे केवळ पाचशे कोटी रुपये इतक्या खर्चात होऊ शकतात. हाच विचार करून राज्यात सिमेंटच्या साखळी बंधाऱ्यांचा कार्यक्रम अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष आहे. सन 13-14 मध्ये या कार्यक्रमावर चारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर गेल्यावर्षी 268 कोटी रुपये खर्च झाले. गेल्या तीन वर्षात सुमारे एक हजार कोटी रुपये या कार्यक्रमावर खर्च झाले आहेत. आता या वर्षी पुन्हा पाचशे कोटी रुपयांचा कार्यक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी चारशे कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने अर्थसंकल्पित केला आहे.आजचे पुष्प
अॅग्रोवन मधून साभार
- समूहशक्तीची ताकद ठरली महत्त्वाची - ज्वारी, गव्हाचे शेतकरी वळले संरक्षित शेतीकडे - 150 हून अधिक शेडनेट हाऊसची उभारणी
परिस्थितीसमोर गुडघे टेकले तर परिस्थिती तुम्हाला नेस्तानाबूत करते. मात्र तुमच्या ध्येयासाठी परिस्थितीशी झुंजाल तर परिस्थितीसुद्धा नतमस्तक होते, नेमका हाच अनुभव सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातील "कृषिक्रांती फार्मर्स क्लब'मधील तरुण शेतकऱ्यांनी घेतला. अडचणींचा प्रचंड मोठा डोंगर समोर असूनही समूहशक्तीच्या जोरावर त्यांनी मात केली. नवे तंत्र, ज्ञानाचा अवलंब करत शेडनेटहाऊससारख्या नियंत्रित शेतीमध्ये लौकिक मिळवला. या क्लबमुळे त्यांना पैसा मिळालाच, पण पत आणि प्रतिष्ठाही मिळाली...! मंगळवेढा हा तसा दुष्काळी तालुका. कमी पाऊसमानामुळे पाण्यासाठी कायम वणवण. ज्वारीचे कोठार म्हणून असलेली ओळख आज काळाच्या ओघात मागे पडत आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यासाठी मंगळवेढेकरांना कायमच निसर्गावर अवलंबून राहावे लागते. आजही तीच स्थिती. पण या परिस्थितीला बदलण्याची किमया कृषिक्रांती फार्मर्स क्लबच्या माध्यमातून काही तरुणांनी करून दाखवली. दोन वर्षांपूर्वी शेतीमध्ये काही तरी नवीन करण्याच्या ध्यासाने अध्यक्ष अंकुश पडवळे, सचिव शरद हेंबाडे, उपाध्यक्ष सुनील डोके, संघटक हरिभाऊ यादव, कार्याध्यक्ष अमरजित जगताप यांच्यासह ज्ञानेश्वर वाघमोडे, अशोक दिघे, सतीश शिंदे, सुनील चौगुले, अशोक क्षीरसागर, ऍड. धनंजय हजारे, दिनेश लेंगरे, रविराज बंडगर, धनंजय देठे, धनाजी जाधव हे तरुण शेतकरी एकत्र आले. शेतीत काही तरी करण्याची जिद्द, कष्टाची तयारी, पण मार्ग सापडत नव्हता. या दरम्यान सोलापुरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून रफिक नाईकवाडी यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी या तरुणांच्या प्रयत्नांना बळ दिले. कमी पाण्यावरील पिके आणि अधिकचे उत्पादन घेण्याकडे सर्व शेतकऱ्यांचा कल होता. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेडनेटमधील शेतीचा विषय आकाराला आला. त्यासाठी तातडीने पूर्वतयारी म्हणून शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनासंबंधी माहिती घेण्याचे काम सुरू झाले. जानेवारीचा माहिना होता तो. हे काम म्हणावे तसे सोपे नव्हते. पण नवीन करण्याची जिद्द सगळ्यांच्या मनात होती. वाटेल तिथे जाण्याची, माहिती घेण्याची, फिरण्याची मानसिकता सर्वांची होती. शेडनेट शेतीला पसंती, बॅंकाही तयार झाल्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत भागात शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे प्लॉट पाहण्याचे सर्वांनी ठरवले. पहिल्या टप्प्यात 20 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष शेडनेट उभारण्याची तयारी केली, पण प्रश्न आला, तो अर्थसाह्याचा. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बॅंकेत भेटी घेतल्या. त्यांना या प्रकल्पाबाबत माहिती पटवून दिली. पण दाखविण्यासाठी समोर काहीच नव्हते. पिंपळगाव बसवंत परिसरातील पीक उत्पादनाची माहिती आणि मिळणारे उत्पन्न याबाबतची खात्री पटवून देण्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 35 शेतकरी, बॅंक ऑफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बॅंक, आयडीबीआय, बॅंक ऑफ इंडिया, फेडरल बॅंक, एचडीएफसी, युनियन बॅंक या बॅंकांचे अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी जी. एन. ताटे यांच्यासह जथ्था पिंपळगाव बसवंतला गेला. पिंपळगाव, दिंडोशी भागातील शेडनेटमधील ढोबळी मिरचीचे काही शेडनेट प्रकल्प पाहिले. त्यांना मिळणारे उत्पादन, हंगाम, मार्केटिंग या सगळ्याची माहिती घेतली. विशेषतः कुरणोली येथील अमित संधान, कसबे सुपने येथील गोकुळ जाधव यांनी त्याची सविस्तर माहिती दिली. दिंडोशी तालुक्यातील मोहाडीचे विलास शिंदे या निर्यातदार शेतकऱ्याचीही भेट या शेतकऱ्यांनी घेतली. तिथे सगळी पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना खात्री पटली आणि कर्ज देण्यास बॅंका तयार झाल्या. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सहायक महाव्यवस्थापक व्ही. रमणमूर्ती, भारतीय स्टेट बॅंकेचे ज्ञानेश्वर बुट्टे यांनी चांगले सहकार्य केले आणि बघता-बघता मंगळवेढा तालुक्यातील 11 गावांत 20 शेतकऱ्यांची 20 शेडनेट उभी राहिली. कुणाचे अर्धा एकर, कुणाचे एक एकर, अशा पद्धतीने 18 एकर क्षेत्रावर शेडनेट प्रकल्प उभे राहिले, त्यातून ढोबळी मिरचीच्या उत्पादनाला सुरवात झाली. ढोबळी मिरचीने दिली ओळख मंगळवेढ्यासह नजीकच्या सांगोला, पंढरपूर, मोहोळ तालुक्यातील शेतकरीही "कृषिक्रांती'ला जोडले जाऊ लागले. आज जवळपास 300 हून अधिक शेतकरी या क्लबचे सदस्य आहेत. यात सर्वाधिक तरुणांचा सहभाग जास्त आहे. दोन वर्षांपूर्वी 20 शेडनेट हाऊसने झालेली सुरवात आज 150 हून अधिक आहे. त्यात खुपसंगीमध्ये सर्वाधिक 29 शेडनेट आहेत. येथे सर्वाधिक ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. ढोबळी मिरचीच्या उत्पादनाने शेतकऱ्यांचे जीवनमान बदलून गेले. हिरव्या, लाल, पिवळ्या रंगीत मिरच्यांचे उत्पादन शेतकरी घेऊ लागले. एकरी 60 ते 70 टनांपर्यंत शेतकऱ्यांनी मजल मारली. प्रतिकिलो 18, 20, 40 रुपयांपर्यंतचे दर शेतकऱ्यांना मिळाले. नाशिकपाठोपाठ अवघ्या दोन-तीन वर्षात ढोबळी मिरचीसाठी मंगळवेढ्याचे नाव घेतले जाऊ लागले. कोलकता, दिल्ली, मुंबई आणि हैदराबादच्या व्यापाऱ्यांच्या ढोबळी मिरचीच्या खरेदीसाठी मंगळवेढ्यात फेऱ्या वाढल्या. तरुणांची जिद्द, कष्ट करण्याची तयारी या जोरावरच हे शक्य झाले. अंधाऱ्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होतो. उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तुत्वामुळे येते, हा ठाम विश्वास आणि हेच कर्तृत्व या तरुणांनी आता सिद्ध करून दाखवलं आहे. शेततळ्याकडे कल, पाण्याचा संरक्षित वापर पाणी हा मंगळवेढ्यातील शेतीच्या दृष्टीने अडचणीचा मुद्दा. पण शेडनेटसारख्या नियंत्रित शेतीमधून त्यांनी तो सोडविण्याचा प्रयत्न केला. शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनासाठी कमी पाणी लागते. त्याचा वापर फायदेशीर ठरलाच. पण तेवढ्यावरच न थांबता पाण्याचा वापर आणि बचतीबाबतही शेतकरी संवेदनशील झाले. पाण्याचा शाश्वत स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने शेततळी घेण्यावर भर दिला. त्यामुळेच क्लबच्या बहुतेक सर्व सदस्यांकडे शेततळे आहे. ज्यांच्याकडे नाही, ते पाण्याचा काटकसरीने वापर करतात. काही जणांनी पाणी अडवणे, जिरवणे यांसारखी कामेही केली आहेत. भाजीपाल्यांसाठी दर करार शेडनेटमधील भाजीपाला उत्पादनाबरोबरच मोकळ्या शेतातील फळभाज्यांबाबतही कृषिक्रांती फार्मर्स क्लबने पुढाकार घेतला. शेडनेटच्या जोडीला मोकळ्या शेतात प्रत्येक सदस्याने दुधी भोपळा, हिरवी मिरचीच्या लागवडीचे नियोजन केले. या सगळ्या भाज्यांचे पुढील वर्षभराचे दरही संबंधित कंपनीशी करार करून ठरवण्यात आले. गेल्या वर्षभरात ढोबळी मिरची, काकडी, भेंडी यांसारख्या भाज्यांसाठी दर करार क्लबने केले. कृषी आधार फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी कृषिक्रांती फार्मर्स क्लबने "कृषी आधार ऍग्रिकल्चर फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी' या नावाने शेतकऱ्यांची कंपनी स्थापली. अलीकडेच क्लबला कंपनीचे नोंदणीपत्र मिळाले. या माध्यमातून एकत्रित उत्पादन होणार आहे. पण त्याहूनही सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पिकवलेल्या भाजीपाल्यासह अन्य पिकांच्या मार्केटिंगचे काम केले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी व्यापक स्तरावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. अगदी पिकांच्या लागवडीपासून, व्यवस्थापन, प्रक्रिया आणि मार्केटिंगपर्यंत सगळ्या प्रकारचे प्रशिक्षण यामध्ये मिळणार आहे. "लक्ष' निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचे पाणी हा मुद्दा प्रत्येक पीक उत्पादनासाठी महत्त्वाचा... कमी पाण्यामुळे शेडनेटसारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या शेतीत शेतकरी उतरले. पण मंगळवेढा-सांगोल्याचे प्रमुख पीक असलेल्या आणि कमी पाण्यावर येणाऱ्या डाळिंबाच्या पिकाची नाळ काही शेतकऱ्यांनी तोडली नाही. आज क्लबमधील जवळपास निम्म्या सदस्यांकडे डाळिंब आहे. आता निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी प्रयत्न होत आहेत. मंगळवेढ्यासह सांगोला, पंढरपूर भागातील 70 शेतकरी आणि सुमारे 400 एकरांवर निर्यातक्षम डाळिंब उत्पादनाचे लक्ष्य क्लबने ठेवले आहे. होम टू होम डिलिव्हरी अन् सेंद्रिय शेतीवर भर शिवारफेऱ्यांतून होतो अभ्यास गेल्या दोन वर्षांत झपाटलेपणाने क्लबचे सर्व सदस्य काम करीत आहेत. अकलूज, नातेपुते, पंढरपूर, सांगोल्यातील दर्जेदार डाळिंब उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेऱ्या काढण्यासह छोटी-मोठी चर्चासत्रे क्लबने ठेवली आहेत. पुणे, साताऱ्यातील निर्यातदार कंपनीच्या भेटी आणि पुणे, नाशिक, सांगलीच्या कृषी प्रदर्शनाच्या कृषी सहलीही क्लबच्या सदस्यांनी केल्या आहेत. शेतकऱ्यांचे अनुभव... आयुष्याचा हा "टर्निंग पॉइंट' आंधळगाव (ता. मंगळवेढा) येथील आबासाहेब माळी हे इलेक्ट्रिक मोटारी दुरुस्ती करणारे व्यावसायिक. पाण्याची अडचण, बेभरवशाचा बाजार यामुळे घरची शेती असूनही शेतीकडे पाठ फिरवलेले मूळचे शेतकरी. व्यवसायात जेमतेम स्थिरता. पण पहिल्यांदाच क्लबच्या सान्निध्यात ते आले. पहिल्याच वर्षी 2013 मध्ये त्यांनी अर्धा एकर शेडनेट केले. त्यासाठी एसबीआय बॅंकेने कर्जपुरवठा केला. शेतीत काहीच केले नसल्याने बॅंक कर्ज देण्यास तयार नव्हती. पण क्लबने त्यांची जबाबदारी घेतली. सात लाखांचे कर्ज मिळाले, मोठ्या नेटाने त्यांनी शेती केली. पहिल्या वर्षी खर्च वजा जाता चार लाखांचा नफा त्यांना मिळाला. पन्नास टक्के अनुदानातून निम्मे कर्ज फेडले. उर्वरित साडेतीन लाखापैकी दोन लाखांचे बॅंकेचे कर्ज त्यांनी फेडले. तर उर्वरित घरखर्चाला ठेवून बायकोसाठी चार तोळे सोने त्यांनी खरेदी केले. विशेष म्हणजे यंदा पुन्हा त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर शेडनेट उभारले. त्यासाठी बॅंकेने तत्काळ मंजुरी दिली. त्यात ढोबळी मिरची घेतली आहे. याबाबत श्री. माळी म्हणतात, ""माझ्या आयुष्याचा हा टर्निंग पॉइंट ठरला. व्यवसायातून हे मी कधीच करु शकलो नसतो. मला पैसा मिळालाच. पण माझी पत वाढली आणि प्रतिष्ठाही मिळाली.'' समूहशक्तीची ताकद कळाली... रहाटेवाडी (ता. मंगळवेढा) येथील अतुल पाटील पदवीधर तरुण. घरची चाळीस एकर शेती. विहीर, कूपनलिकेच्या पाण्यावर सर्वाधिक उसाची शेती. दहा एकर क्षेत्रातून दरवर्षी 1200 ते 1500 टन उत्पादन, बाकी क्षेत्र ज्वारी, गव्हासाठी राखीव. पण पाणी खाणाऱ्या उसाचा त्यांना कंटाळा आला. उसाला दरही मिळत नाही. नवीन काही तरी करण्यासाठी शेडनेटहाऊस तंत्राकडे वळले. पहिल्याच वर्षी एक एकर शेडनेटमधून 12 लाख रुपये मिळविले. ढोबळीने त्यांना आर्थिकदृष्ट्या उत्पन्न काय असते, हे दाखवून दिले. आता ऊस कमी करुन ते यामध्येच नवी संधी शोधत आहेत. याबाबत श्री. पाटील म्हणाले, ""कृषिक्रांती क्लबमुळेच मला नवीन काही तरी करण्याची संधी मिळाली. शिवाय गटामुळे शेतीतल्या प्रत्येक कामात मदत झाली. गटशेती किंवा समूहशक्ती काय असते, त्याचा लाभ कसा होऊ शकतो, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला.'' ""शेती करायची पण नव्या तंत्राने, हे पक्क असूनही पूर्वी कुठे जायचे आणि काय करायचे, याबाबत सगळा गोंधळ होता. आता बऱ्यापैकी आम्ही एका वाटेवर आलो आहोत. आम्ही निवडलेली वाट योग्य आहे, हे अनेक उदाहरणांनी आम्ही सिद्ध करून दाखवलं आहे. अडचणी येतच असतात, त्यातूनही मार्ग काढत आहोत. यापुढे सेंद्रिय पद्धतीची शेती, प्रक्रिया, मार्केटिंग, निर्यात या विषयावर आम्ही काम करणार आहोत. - अंकुश पडवळे (अध्यक्ष, कृषिक्रांती फार्मर्स क्लब, मंगळवेढा)आजचे पुष्प
आजचे पुष्प
जलयुक्त शिवार अभियान रुजले जनमानसात
1) शेत बांधबंधिस्ती या जलसंधारण व मृदसंधारण उपचार पद्धती कंपार्टमेंट बंडिंग म्हणून प्रचलित आहे. मूलस्थानी मृदा व जलसंधारण उपचार पद्धतीत याचा समावेश होतो. 750 मि.मी. पावसाच्या प्रदेशात पावसाचे पडलेले पाणी जागेवर मुरवले जाण्यासाठी ही उपचार पद्धती प्राधान्याने हातावर घेतले जाते. जलयुक्त शिवार योजनाची अंमलबजावणी सुरू करायची त्या वेळेस ही उपचार पद्धती आमच्या डोक्यात होती. आम्ही वर्षभरासाठी जवळपास 141 कामे 4500 हेक्टर क्षेत्रावर प्रस्तावित केली होती. आम्हाला जो निधी प्राप्त झाला त्यामध्ये 74 कामे 2000 हेक्टर वर पूर्ण केली. कृषी विभाग व कृषी सहायक यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. 2. खोल सलग समतल चर उजाड जमिनीवर 1 मीटर रुंद व 1 मीटर खोल 1 मीटर लांब उताराला चर घेतले जातात. हे चर समपातळीत घेतले जातात. जमिनीचा उतार 3 टक्के असेपर्यंत हे चर घेतले जातात. तालुक्यात निवडलेल्या गावात 85 खोल सलग समतोल चर 1874 हेक्टर वर प्रस्तावित केले होते. त्यापैकी 1966 हेक्टर क्षेत्रावर 52 खोल सलग समतल चरांची कामे घेण्यात आम्ही यशस्वी झालो. 3. शेततळे अलीकडच्या काळात संरक्षण सिंचनाचे महत्त्व शेतकऱ्यांना समजल्यामुळे शेततळ्यांबाबत जागृती होत आहे. जलयुक्त शिवार योजनेत 30 मी इतके रुंद 30 मी लांब आणि 3 मी इतके खोल शेततळे घेण्यात आले. लोकजागृतीच्या माध्यमातून 12 शेततळे आम्ही पूर्णत्वास नेऊ शकलो. 4. विहीर पुनर्भरण शेतकऱ्याच्या शेतात असलेला महत्त्वाचा जलस्रोत म्हणजे विहीर. असा जलस्रोत पावसाच्या पाण्याने समृद्ध करायचा असेल तर विहीर पुनर्भरण शिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार अभियानमध्ये कन्नड तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 242 विहीर पुनर्भरण कामे पूर्णत्वास नेण्यात आली. 5. माती नालाबांध माती नालाबांध हा 3 टक्के उतार असलेल्या पाणलोट क्षेत्रावर घेतला जातो. माती नाला बांध हा सिमेंट नाला बांधापेक्षा कमी खर्चिक असल्याने जेथे पाण्याचा अपाधव कमी आहे तेथे प्राधान्याने घेतला जातो. 6. नाला खोलीकरण व सरळीकरण नाला खोलीकरण व सरळीकरण ही उपचार पद्धती सिमेंट बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस घेणे हितावह ठरते. नाला खोलीकरण व सरळीकरण या उपचार पद्धतीमध्ये अस्तित्वात असलेला नाला दोन्ही बाजूंनी रुंद आणि खोल केला जातो. निश्चितच या उपचार पद्धतीमुळे नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता व साठवणूक क्षमता वाढते. असे रुंदीकरण व खोलीकरण सिमेंट बंधाऱ्याच्या वरच्या बाजूस असल्यास बंधाऱ्याच्या साठवण क्षमतेत वाढ होते. 7. ठिबक सिंचन कन्नड तालुका हा प्रथम पासूनच शेतीमध्ये अग्रेसर तालुका म्हणून नावाजला असल्याने आम्ही जलयुक्त शिवार अभियानात निवडलेल्या गावात ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत स्रोत आहे, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत या योजनेखाली 50 टक्के अनुदानावर ठिबक सिंचन सेट बसवण्याबाबत जागृती केली. सहा महिन्यांच्या कालावधीत 215 शेतकऱ्यांच्या शेतावर सरासरी प्रत्येकी 2 एकर क्षेत्रावर म्हणजे 500 एकर क्षेत्रावर ठिबक सेट बसवले. 8. तुषार सिंचन सहा महिन्यांच्या अभियान कालावधीत 37 शेतकऱ्यांच्या शेतावर सरासरी प्रत्येकी 1 एकर क्षेत्रावर म्हणजे 40 एकर क्षेत्रावर तुषार सेट बसवले. 9. सिमेंट बंधारे सिमेंट बंधाऱ्यांची उंची जवळपास 3 मीटर व लांबी जवळपास 30 मीटर घेतली जाते. सिमेंट बंधाऱ्यात पडणारे पावसाचे पाणी अडवल्याने लगतच्या क्षेत्रावरील विहिरींची पाणी पातळी वाढते. तसेच सुरक्षित जलसिंचन उपलब्ध होते. 10. गाळ काढणे गाव तलाव, माती नाला बांध, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, कोल्हापुरी बंधारे, लघुप्रकल्प ही भूपृष्ठीय पाणी साठवणुकीची साधने आहेत. काळाच्या ओघात अशी जल साधने गाळ साचून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जेसीबी व पोकलॅन यासारख्या कंपनीची यंत्रसामग्री वापरून गाळाचा उपसा केला जातो. गाळ हा ट्रॅक्टर वा टिप्पर सारख्या तत्सम वाहनातून शेतात घेऊन जाऊन शेतात पसरवला जातो व शेतीची सुपीकता वाढवली जाते. जलयुक्त शिवार अभियानात कन्नड तालुक्यात 27 कामांवर 50,000 घनमीटर गाळ जल साधनातून काढून 302 शेतकऱ्यांच्या 150 हेक्टर क्षेत्रावर पसरवण्यात आला.
आजपर्यंत शासनाने राबवलेल्या व अंमलबजावणी केलेल्या सर्व योजनेत जलयुक्त शिवार अभियान पारदर्शकतेबाबत अग्रेसर राहिली आहे.
कन्नड तालुक्यात निवडलेल्या 24 गावांत क्षेत्रीय कर्मचारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अभियान राबवण्यापूर्वी पाण्याची उपलब्धता 5462 होती, अभियान राबवल्यानंतर ती 6731 झाली म्हणजेच जवळपास जलसंसाधनांची क्षमता 1269 एवढी वाढली. क्षेत्रीय स्तरांवरून प्राप्त माहितीवरून भूजल पाणी पातळी अर्धा ते एक मीटर वाढली. जलयुक्त शिवार अभियानामुळे जवळपास 260 हेक्टर क्षेत्र नव्याने जलसिंचन खाली आहे. पीक घनतेमध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाली. फळ पिकाखाली 34 हेक्टर क्षेत्र तर पिकाखाली 46 हेक्टर क्षेत्रात वाढ झाली. सद्यःस्थितीत कन्नड तालुक्यात 500 मि.मी. पाऊस झालेला असून, जलयुक्त शिवार अभियानात पूर्णत्वास नेण्यात आलेली कामांचे दृश्य फायदे शेतकऱ्यांना दिसू लागले आहेत. सिमेंट बंधारे पाण्याने भरले आहेत तर खोल सलग समतल चरातून पाणी जमिनीत मुरल्याने जलपातळीत वाढ झालेली आहे, विहीर पुनर्भरण माध्यमातून पावसाचे पाणी विहिरीत जमा झाल्याचे चित्र आम्हास पाहावयास मिळाले. शेततळे तुडुंब भरले आहेत. पहिल्यांदाच एखादी शासनाची योजना दृश्य स्वरूपात इतक्या लवकर जनमानसात रुजली गेलेली निदर्शनास आले. राजू नंदकर उपविभागीय अधिकारी (महसूल) कन्नड तथा अध्यक्ष तालुकास्तरीय जलयुक्त शिवार अभियान समिती, तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद.आज्चा
पेडगाव झाले जलयुक्त
कामांचे फलित अभियानांतर्गत गावशिवारातील सहा सिमेंट नाला बंधाऱ्यांचे खोलीकरण करण्यात आले. सुमारे १९५. ०७ हेक्टरवर ढाळीचे बांध घेण्यात आले. लोकसहभागातून लघुसिंचन तलावातील ७२, १९६ घनमीटर गाळ काढण्यात आला. यामुळे ७२ कोटी ११९ लाख सहा हजार लिटर पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली. जलसंधारणाच्या नव्या कामांमुळे ९१० टीसीएम पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली. पूर्वीच्या कामांची क्षमता ११४७. ७२ टीसीएम आहे. गावशिवारात एकूण २०५७ .७२ टीसीएम पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली. पिकांसाठी १७३१.३२ टीसीएम तर पिण्यासाठी २६६.१७ टीसीएम अशी गावाची एकूण पाण्याची गरज १९९७.४९ टीसीएम आहे.
खोलिकरणामुळे पाणीसाठवण क्षमता वाढली... गावाशिवारातील अनेक बंधाऱ्यात वाळू, गाळ जमा झाल्यामुळे पडलेले पावसाचे पाणी अडून राहात नव्हते. सिमेंट बंधाऱ्याचे खोलीकरण आणि पिचिंग केल्यामुळे यंदा शिवारात एकमेव जोरदार पाऊस होऊनही मोठा पाणीसाठा निर्माण झाला. यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली. पाण्याअभावी सुकू लागलेल्या फळबागांना यामुळे जीवदान मिळाले. ज्वारी, तूर आदी पिकांना पुरेसे पाणी देता आल्यामुळे उत्पादनाची काही प्रमाणात खात्री निर्माण झाली आहे. मार्गदर्शन ठरले प्रेरणादायी.... गावातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे हाच उपाय आहे, ही बाब ग्रामस्थांमध्ये बिंबवण्यात अनेक व्यक्तींचा वाटा महत्त्वाचा राहिला. यात पालकमंत्री दिवाकर रावते, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, तत्कालीन जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जलयुक्त शिवारचे नोडल अधिकारी महेश वडदकर, जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी साहेबराव दिवेकर, आर. टी. सुखदेव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. साहजिकच कामांमध्ये लोकसहभाग वाढण्यास मदत झाली. शेतकऱ्यांचे बोल.... यंदा शिवारात लागोपाठ दुसऱ्या वर्षी कमी पाऊस पडला. यामुळे ३२५ झाडांची माझी संत्रा बाग कशी वाचवावी याची चिंता लागली होती. परिस्थिती लक्षात घेऊन बागवान मंडळी संपूर्ण बागेस दीड लाख रुपयांच्या वर भाव काही देत नव्हते. शेताजवळील बंधाऱ्यात पावसानंतर जमा झालेल्या पाणीसाठ्यामुळे विहिरीची पाणीपातळी वाढली. यामुळे फळबाग वाचली. बागेला २ लाख ४० हजार रुपयांचा दर मिळाला. आता गहू, चारा, लसूण, मेथी, कांदा आदी भाजीपाला पिके घेणे मला शक्य झाले आहे. हरिभाऊ चांदणे - ९९७०९९४८१२ माझ्या शेतात दोन विहिरी आहेत. जमिनीत अवघ्या काही फुटांवर खडक असल्याने पाणी नाही. त्यामुळे ४५ एकर शेती जिरायतीच आहे. शेतामधून वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे बंधाऱ्यात मोठा पाणीसाठा झाला. त्यामुळे विहिरीतील पाणीपातळी वाढली. संरक्षित पाणीसाठ्यामुळे बारा एकरांपैकी सहा एकर ज्वारी तुषार सिंचन पद्धतीने भिजवता आली. मुंजाभाऊ गायकवाड - ९९२३९७३५०८ जिल्हा परिषद, पेडगाव जलसंधारणाच्या कामासाठी लोकसहभाग महत्त्वपूर्ण ठरला. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत आमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना ओलितासाठी पाणी मिळाल्याने पीक उत्पादनात निश्चितच भर पडणार आहे. येत्या काळात उर्वरित बंधाऱ्यांचे खोलीकरण, शेततळ्यांचे नियोजन केले जाणार आहे. जितेंद्र देशमुख माझी सात एकर शेती आहे. त्यात कापूस, सोयाबीन आदी पिके घेत असतो. खोलिकरणाच्या कामांमुळे विहिरीची पाणीपातळी वाढली. सध्या दररोज तासभर मोटर चालते. त्यामुळे ज्वारी, भाजीपाला आदी विविध पिके घेणे शक्य झाले. पाणी नसते तर दुष्काळात काहीच करणे शक्य झाले नसते. ज्ञानेश्वर शिंदे शेताजवळील बंधाऱ्याच्या खोलीकरणामुळे अत्यंत कमी पाऊस पडूनही विहिरीतील झरा सुरू आहे. त्यामुळे सात एकर शेवगा पिकास तसेच तूर पिकास पाणी मिळाले. त्यास चांगली फुले व शेंगा लगडल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत चांगल्या उत्पादनाची खात्री मिळाली आहे. प्रमोद देशमुख संपर्क : बी. एस. शिलार - कृषी पर्यवेक्षक - पी. ए. देवकर - ९४२२७ ०१०५६ कृषी सहाय्यक -वाचते आहे.
आजची भर
महाराष्ट्रातील नाही तरी
चांगली माहिती नाखुकाका,
देर आये दुरुस्त आये
अॅग्रोवन मधून साभार
पंकजा मुंडे यांची माहिती; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास आणि जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता. ९) दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करणे तसेच संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना हाती घेण्यात येत आहे. टंचाईग्रस्त भागातील ज्या गावात मागील ५ वर्षांत किमान एक वर्ष ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे, अशा गावांमध्ये ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५१ हजार ५०० शेततळी घेण्यात येणार असून त्यापेक्षा जास्त मागणी प्राप्त झाल्यास त्यानुसार उद्दिष्टात वाढ करण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती (बीपीएल) आणि ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड केली जाईल. तसेच शेततळ्याची मागणी करणाऱ्या अर्जदारांची प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वांत मोठ्या आकारमानाचे शेततळे ३० बाय ३० बाय ३ मीटरचे असून त्यासाठी ५० हजार इतके कमाल अनुदान दिले जाणार आहे, तर सर्वांत कमी १५ बाय १५ बाय ३ मीटर आकारमानाचे असणार आहे. इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाईल. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च झााल्यास उर्वरित रक्कम लाभार्थी शेतकऱ्याने स्वत: खर्च करायची आहे. या शेततळ्याची शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत. चालू वर्षासाठी ५० कोटी रुपये जिल्हा पातळीवर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा आणि समन्वय समिती या योजनेवर देखरख करणार आहे. योजनेची अंमलबजावणी, नियंत्रण आणि समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नियुक्त केली जाणार आहे. तालुका पातळीवरील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती शेततळ्याला मान्यता देईल. चालू वर्षात या योजनेसाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुढील वर्षात २०७ कोटी ५० लाख निधी मदत व पुनर्वसन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभाग नोडल विभाग म्हणून ही योजना कार्यान्वित करणार असल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.मार्डी येथे फुलतेय संत्र्यासोबत चंदनाची शेती
आजची भर
तीव्र दुष्काळातही ठेवले आले पिकात सातत्य
- अॅग्रोवन मधून साभार सततच्या दुष्काळामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अौसा तालुक्यातील मोताळा गाव त्याला अपवाद नाही. येथील प्रशांत भोसले हा युवक दहा वर्षांपासून आले पिकाची शेती प्रयोगशील वृत्तीने सातत्याने करतो आहे. एकरी १०० क्विंटल उत्पादनाचे सातत्य त्याने ठेवले आहे. यंदाही केवळ २० इंच पाऊस झाला असतानाही प्रशांत यांनी पाण्याचे योग्य नियोजन करीत सात एकरांवर आले पीक जगवले, फुलवले, उत्पन्नापर्यंत आणून ठेवले. दुष्काळात दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत प्रयोगशील बाणा जपला. रमेश चिल्ले लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातील मातोळा या सुमारे ८००० लोकवस्तीच्या गावातील ग्रामस्थ एकत्र आले. गाव करेल ते राव काय करेल या उक्तीप्रमाणे गावाने वज्रमूठ आवळली. ही गोष्ट २०१५ ची. गावातील काही मोजके युवक धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नची व अन्यत्र झालेल्या जलयुक्त कामांची पाहणी करतात. त्यातून प्रेरणा घेतात. तसे पाहिले तर मातोळा गावाजवळ अशी कुठलीच मोठी नदी नाही. शिवारातील लहान-मोठे ओहोळ, नाले खोल व रुंद केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. सगळे कष्टाळू शेतकरी. सर्वांची मदार शेतीवरच. उगी आश्वासने व बाता मारणाऱ्या पुढाऱ्यांमागे न लागता अाधी गावातून किती लोकसहभाग जमतो त्याबाबत बैठक झाली. सुरवातीला नकार येणारच. सहसा कुणाच्या खिशातून अशा सततच्या दुष्काळी काळात पैसा निघणे कठीणच, तरी सुरवातीला पुढाकार घेणाऱ्यांनी स्वतःचा हिस्सा जमा केला. बॅंकेत ‘जॉइंट अकाउंट’ काढले गेले, अन् दुसऱ्या-तिसऱ्या बैठकीपासून पैसे जमायला लागले. कामाचे महत्त्व कळायला लागले अन् थोडेथोडके नाहीत, पाहता-पाहता तब्बल बावीस लाख रुपये लोकवर्गणीतून जमा झाले. त्यातून कामाला सुरवात झाली. सकाळ रिलीफ फंड, आमदार व खासदार फंड आदींच्या माध्यमातून एकूण पन्नास लाख रुपयांहून अधिक निधी संकलित झाला. त्यातून नऊ किलोमीटर नाल्याचे खोली व रुंदीकरण झाले. एवढे काम झाल्याने जूनमध्ये पावसाकडे डोळे लावून असताना पहिले दोन महिने कोरडेच गेले. पावसाच्या ताणामुळे शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली. होती-नव्हती ती सारी पुंजी काढून जलयुक्त कामासाठी वापरली होती. पाऊस केवळ वीस इंच या वर्षी तरी वेळेवर पाऊस पडेल, नाले भरतील, विहिरी, बोअरला मुबलक पाणी येईल, पिके तरारून येतील हे घेऊ ते घेऊ, याचे कर्ज फेडू, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण, एक नाही हजार स्वप्ने रंगवलेली; पण पावसाची वाट पाहून खरीप हातचा गेलेला. सोयाबीन, तूर पेरणीची तारीख निघून गेल्यावर दहा ऑगस्टला केवळ दहा इंच पाऊस पडला. रानात जिरून सगळा नाल्यात अडला, साठला. मनाचा हिय्या करून काहींनी सोयाबीन पेरला. पुढे पाऊस न झाल्याने पाण्याची व्यवस्था नसणाऱ्यांकडे पिकाची वाढ खुंटली. त्यांनी रब्बीसाठी जमिनी तयार केल्या. एका पावसानंतर पुढे पाऊस न झाल्याने रब्बीवरही पाणी फिरले. पुढेही १० इंचांपर्यंतच पाऊस झालेला. ज्यांनी थोड्याबहुत ओलीवर एखादे पाणी देऊन हरभरा घेतला, त्यांना दीड-एक क्विंटलचा एकरी उतारा मिळाला. एवढेच काय ते दोन हंगामांतील उत्पादन; पण मदत झाली ते नाल्यात साठलेल्या व जिरलेल्या एका पावसाने. बोअर, विहिरींना थोडेबहुत पाणी राहिले. उसासारखी पिके तर बहुतेकांनी हद्दपारच केलेली. मातोळा गाव गेल्या दहा वर्षांपासून भाजीपाला व अाले पिकासाठी प्रसिद्ध. गावात दर वर्षी सुमारे पन्नास एकरांपर्यंत अाले असायचे. इथल्या प्रशांत भोसले यांना मात्र तारले ते या पिकानेच. त्यात ते मास्टर झालेत. जेमतेम पाण्यावर ते हे पीक ठिबकवर जगवतात. प्रशांत यांनी या पिकात अनेक प्रयोग केलेले. एक वेळ तर बाजारभावाचे गणित घालून फेब्रुवारीत अाले लागवड करून उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. प्रशांत यांचा प्रयत्नवाद प्रशांत यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक. वडिलोपार्जित दीड एकर शेती. त्यांनी नोकरीतले पैसे जमवून सुमारे १० एकर शेती वाढवलेली. पुढे प्रशांत बीए झाले. गावातील शिक्षणसंस्थेत क्लार्क म्हणून नोकरी करीत लहान भाऊ व वडिलांच्या मदतीने शेतीत ते विविध प्रयोग करायचे. वडील उसाची शेती करायचे तेव्हा मुबलक पाणी होते. त्यात सरी पद्धतीने एकरी पंचाहत्तर टनांपर्यंत उत्पादन काढलेले. पुढे पाण्याच्या काटकसरीमुळे व क्षेत्र वाढल्यामुळे ठिबक केले. चार किलोमीटरवरून निम्न तेरणा धरणामधून पाइपलाइन केली, कर्ज काढले व शेतीसाठी पाणी आणले. प्रशांत यांनाही कर्जप्रकरण व इतरांकडूनही कर्जाऊ पैसे उभे करून दर वर्षी एकर-दोन एकर शेती विकत घेतली. हंगामी उत्पन्नातून ते कर्ज फेडीत. त्यातून स्वकर्तृत्वावर सुमारे साडेबारा एकर शेती वाढवली. शेणखताचा चांगला वापर करायचा त्यांना छंद, त्यामुळे हलक्या विकत घेतलेल्या जमिनी टप्प्याटप्प्याने सुपीक झाल्या. शेजारच्या गावांतील शेतकऱ्यांकडून वर्षाला सुमारे शंभर ट्रॅक्टर शेणखत आणून ते शेतात टाकीत. त्यातून कमी पावसातही हमखास उत्पादन येऊ लागले. मेहनत, चिकाटी व प्रयोगशीलवृत्तीमुळे दर वर्षी ऊस, अाले पिकातून चांगले उत्पादन ते घेऊ लागले. मागील दोन वर्षांत मात्र पाण्याअभावी ते घटले. आले पिकात ठेवले सातत्य प्रशांत गेल्या दहा वर्षांपासून आले पिकात सातत्य ठेवून आहेत. पाण्याच्या उपलब्धेतनुसार ते चार एकरांपासून ते दहा एकरांपर्यंत आले घेतात. याच पिकाने आपल्या घरात समृद्धी आणली असा त्यांचा विश्वास आहे. दर वर्षी एकरी १०० क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. मागील वर्षी १५५ क्विंटल तर त्या मागील वर्षी त्यांनी ११४ क्विंटलची उत्पादकताही गाठलेली आहे. चालू वर्षी अन्य शेतकऱ्यांना कोठेच कोणतेच पीक हाती लागले नाही. प्रशांत यांचेही १४ एकर सोयाबीन व सुमारे ८ एकर ज्वारी वाया गेली. सगळा मिळून हंगामात केवळ २० इंच पाऊस झाला. त्यावर काय तरणार? पाण्याचे नियोजन केले प्रशांत यांनी मात्र पाण्याची उपलब्धता जाणून घेतली. पावसाची वाट पाहेतोपर्यंत आॅगस्ट उजाडला होता. आता इतक्या उशिरापर्यंत बेणे कुठे मिळणार? पाऊस नसल्याने लातूर भागातील एका शेतकऱ्याकडील बेणे शिल्लक होते. ते सुदैवाने प्रशांत यांना मिळाले. हिंमत करून प्रशांत यांनी पाण्याचा शोध सुरू केला. त्या नियोजनातूनच १५ ऑगस्टला सात एकरांवर लागवड केली. कारण त्या वेळी विहिरीत, बोअरला पाणी होते. स्वतःकडील चार बोअर आहेत. मात्र त्यातील दोन बोअरच चांगल्या चालतात. त्यातील पाणी विहिरीत साठवून पुरवून वापरू लागले. सात एकरांत ठिबकही केले होतेच. शेणखतामुळे जमीन सुपीक झाल्याने पीक म्हणावे असे आले. प्रशांत यांचे मामा गावातच राहतात. त्यांच्याकडेही यंदा पीक नव्हतेच. प्रशांत यांनी मामांकडील बोअरचे पाणी पाइपलाइन करून आपल्या शेतापर्यंत आणले. अन्य चुलतमामांकडील पाणी आठ तासाला ४०० रुपये या दराने तशाच पद्धतीने आणले. छोटेसे शेततळे आहे. मात्र त्यातील पाणी पुरेसे होत नाही. प्रयत्नाला मिळतेय यश दर वर्षी एकरी १०० क्विंटल उत्पादन घेणाऱ्या प्रशांत यांनी यंदाहा सात एकरांवर हिमतीने आले फुलवले. मागील वर्षी त्यांना चार लाख तर त्या मागील वर्षी सात लाख रपपयांपर्यंत उत्पन्न हाती आले होते. यंदा एकरी उत्पादन ८० ते ९० क्विंटलपर्यंत हाती लागेल. दर मात्र चांगला मिळेल, अशी आशा त्यांना आहे. येत्या महिन्यात उत्पादन मिळेल. आता ते किती होईल हे एकूण परिस्थिती पाहता अधिक महत्त्वाचे नाही. मात्र गेल्या काही वर्षांत या पिकात ठेवलेले सातत्य यंदाही त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कायम ठेवले. पीक चांगल्या प्रकारे फुलवले, उत्पन्नापर्यंत आणले आणि दुष्काळात किमान एक लाख रुपयांपर्यंत रकमेची आशा पल्लवीत केली, हीच गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. केवळ दहा इंच पावसाच्या व काटकसरीने चार-पाच बोअरचे एक इंच-अर्धा इंच साठवलेल्या पाण्यावर सात एकर पीक जगवण्याचे धाडस म्हणजे दुर्दम्य इच्छाशक्ती व आत्मविश्वासाचे प्रतीकच म्हणाले लागेल. ते असेल तर कुठल्याही कामात यश मिळते हेच खरे. समाजसेवेची आवड जपली सध्या प्रशांत यांच्याकडे सुमारे नऊ म्हशी व दोन बैल आहेत. ग्रामपंचायतीचे ते सदस्य आहेत. त्यांना समाजसेवेची आवड असून, आत्तापर्यंत पन्नास जणांच्या मोतीबिंदूंच्या शस्त्रक्रिया त्यांनी पुणे येथे त्यांना स्वखर्चाने व मोफत करवून आणली आहेत. सुमारे ३३ शौचालये बांधली आहेत. चिंचेची रोपे प्रत्येकाच्या घरासमोर लावली आहेत. पिण्याचे योग्य पाणी व्यवस्थापन करून शंभर टक्के त्यांची वसुली करून गाव वसुलीत पहिला आणला आहे. स्वतःची नोकरी सांभाळून समाजसेवेबरोबरच आपल्या घराचीही प्रगती केली. वडिलोपार्जित केवळ ६६ गुंठ्यांत स्वतः भर घातली. भाऊ-बहिणींची लग्ने करण्यासाठी त्यांची महत्त्वाची मदत झाली. प्रशांत भोसले- ९८६०१८१२१२ रमेश चिल्ले- ९४२२६१०७७५ (लेखक लातूर जिल्हा कृषी विभागात कार्यरत आहेत.)खूपच चांगली लेखमाला. नेहमी
दै पुढारी मधून साभार
विविधसेंद्रिय खताने महाडमध्ये फुलविली स्ट्रॉबेरी शेती (भूमिपुत्र)
By pudhari 6:24PMकेवळ महाबळेश्वरमध्येच पिकणारी स्ट्रॉबेरी शेती शेणखताच्या जीवामृत या सेंद्रिय खताने महाड तालुक्यातील नांदगाव या गावी फुलवून प्रचंड उत्पन्न घेतल्याने तालुक्यातील शेतकर्यांना स्ट्रॉबेरी या नवीन शेतीचा यातून बोध मिळणार आहे. मूळच्या थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर येथील पिकणारी स्ट्रॉबेरी या फळाला बाजारामध्ये प्रचंड मागणी असते. काही ठराविक कालावधीमध्ये येणार्या या पिकाची मक्तेदारी अजूनपर्यंत केवळ महाबळेश्वर पुरतीच मर्यादित होती. मात्र, काही वर्षांपासून दापोली कृषी विद्यापीठाने कोकणात देखील या स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करून चांगले उत्पादन होत असल्याचे दाखवून दिल्याने या गोष्टीचा सखोल विचार करून महाड येथील फादर केणी यांनी या स्ट्रॉबेरी पिकातील लागवड महाड येथील नादगाव गावातील शेतीमध्ये करण्याचा निश्चिय केला. वाई येथून स्वीट चार्ली व विंन्टर डाऊन या दोन जातींच्या स्ट्रॉबेरीची आठ हजार रोपे आणून त्यांची वाफे पद्धतीने नांदगाव येथील शेतीत डिसेंबर महिन्यात लागवड केली. या संपूर्ण पिकाला ठिंबक सिंचन पद्धतीने पाणीपुरवठा केला व डॉ. सुभाष पालेकर यांचे तंत्रज्ञान वापरून 200 लिटर पाण्यामध्ये 10 किलो देशी गाईचे शेण, 5 लि. त्याच गाईचे गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन असे मिश्रण तयार करून हे मिश्रण दोन दिवस प्रक्रियेसाठी ठेवून 15 दिवसांच्या प्रत्येक कालावधीने स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या मुळाजवळ त्याचा डोस सुरू केला. या शेतीसाठी फादर केणी यांनी कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत व कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ या जीवामृतवर स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. दोन महिन्यांनी या स्ट्रॉबेरीच्या झाडांवर चांगल्या प्रकारची स्ट्रॉबेरीची फळे येऊ लागली असून जानेवारीपासून या पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. सध्या या स्ट्रॉबेरीला घाऊक बाजारात 125 रु. प्रति किलो व पॉकिंगमध्ये रु. 30 प्रति पॅक असा भाव मिळत असून महाड तालुक्यातील नागरिक स्ट्रॉबेरी हे नांदगाव येथे येऊन शेतामधूनच विकत घेऊन जात असल्याने या स्ट्रॉबेरीसाठी कोणत्याही प्रकारची बाजारपेठ सध्या तरी बघावी लागत नाही. या स्ट्रॉबेरी पिकाच्या उत्पादनाबाबत फादर केणी सांगतात. 25 गुठ्यांच्या क्षेत्रामध्ये 8 हजार झाडांची लागवड केली आहे. प्रति झाड रु. 4 किमतीप्रमाणे रोपांची किंमत रु. 32 हजार तसेच मजुरी, पाणी, सेंद्रिय खते व जमिनीची मशागत या सर्वांचा खर्च मिळून सरासरी दोन लाख एवढा खर्च झाला असून पुढील तीन महिन्यांसाठी या 25 गुंठे क्षेत्रामधून 6 टन एवढे उत्पन्न अपेक्षित आहे. बाजार भावाप्रमाणे या उत्पन्नाची किंमत 6 लाख रुपये होत असून शेतकर्यांना यापासून 60 टक्के एवढा प्रचंड फायदा मिळणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्ट्रॉबेरीच्या या शेतीबरोबर या पिकांमध्ये अंतर्गत पीक म्हणून तैवान 786 या जातीच्या पपईच्या झाडांची देखील लागवड करण्यात आली आहे. महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरीला महाडमध्ये देखील पीक घेणे आता शक्य झाले असून नांदगाव येथील या स्ट्रॉबेरीच्या शेतीमुळे महाड तालुक्यातील शेतकर्यांना नव्या शेतीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. - महेश शिंदे, महाडखूपच चांगली लेखमाला. नेहमी
शेतीतून झाले स्वावलंबी
शेतीत स्वावलंबी होणे हेच ध्येय ठेवून मी प्रयत्नशील राहिलो आहे. सेंद्रिय शेती, देशी गोपालन व सेंद्रिय प्रक्रियायुक्त मालनिर्मितीतून कौटुंबिक, आर्थिक समाधान मी कमावले आहे. अशी प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यातील निगडी (ता. कोरेगाव) येथील प्रमोद शिवाजी बोरगे यांनी दिली आहे. त्यांची ही यशकथा.
सातारा जिल्ह्यात कोरेगावपासून सुमारे नऊ किलोमीटरवर निगडी गाव आहे. गावची ओळख रंगनाथ स्वामींचे वास्तव्य व त्यांच्या समाधीस्थळामुळे सर्वदूर आहे. अनेक लोक प्रमोद शिवाजी बोरगे कुठे राहतात असे विचारत त्यांना शोधत या गावात येतात. त्याचे कारण म्हणजे सेंद्रिय शेतकरी व प्रक्रिया व्यावसायिक म्हणून ते नावारूपास आले आहेत. बोरगे यांची पार्श्वभूमी प्रमोद यांचे वडील सैन्य दलातून निवृत्त झाले, तेव्हा त्यांचे वास्तव्य पुण्यामध्ये होते. प्रमोद यांनी खासगी कंपनीचा मोटारसायकल मेकॅनिकल विषयातील एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दहा वर्षे पुणे येथे गॅरेज व्यवसायात घालवली. अनुभवाच्या जोरावर त्यांना संबंधित मोटर कंपनीची डीलरशीप व सर्व्हिस पॉइंट या बाबी मिळत होत्या. त्यासाठी एक लाख रुपये भांडवल लागत होते. तसा प्रस्ताव त्यांनी वडिलांसमोर ठेवला. मात्र, कर्जाचा पूर्वानुभाव चांगला नसल्याने त्यांनी नकार दिला. शाश्वत जीवनाच्या शोधात नोकरी करूनही भांडवल हाताशी नाही हे लक्षात आले. हताश न होता काहीतरी करावेच लागेल या जिद्दीने प्रमोद गावी परतले. पूर्णवेळ शेती करू लागले. सुरवातीला रासायनिक पद्धतीचाच वापर व्हायचा. वाहन व्यवसाय, काही काळ राजकारण केले. परंतु या सर्वांतून शाश्वत विकासाचा मार्ग काही मिळत नव्हता. टर्निंग पॉइंट मिळाला २००५ ची गोष्ट. एकदा गावात रौप्यमहोत्सवी पारायण सोहळ्यात दुग्ध व्यवसायाविषयी मार्गदर्शन मिळाले. त्या पाठोपाठ रायगड येथील व्यसनमुक्त युवक संघाच्या शिबिरातही देशी गोपालनाचे फायदे समजले. त्यातून नवी उमेद मिळाली. त्यातूनच एकदा कत्तलखान्याकडे चाललेली देशी गाय विकत घेऊन सांभाळ सुरू केला. गावातील संजय साळुंखे यांच्या आजोबांकडून दान मिळालेली गायही घेतली. दुग्ध व्यवसाय व शेतीला बैल असावा या भावनेतून जर्सी गाय, म्हशीचेही संगोपन सुरू झाले. पुरेसे भांडवल मिळाल्यावर होलस्टिन फ्रिजीएन जातीच्या दोन गायी आणल्या. दुधास रास्त भाव मिळावा याकरिता शेतकरी बचत गटाच्या स्थापनेद्वारे दूधसंकलन केंद्र सुरू केले. देशी गोपालनाकडे प्रवास पत्नी सौ. मंदाकिनी यांच्या मदतीने पूर्ण ताकदीने दुग्ध व्यवसाय सांभाळला. पुढील टप्प्यात युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या सहवासातून प्रमोद देशी गायपालनाकडे व त्यापुढे सेंद्रिय शेती, सेंद्रिय मालाचे उत्पादनही सुरू झाले. प्रमोद यांच्या शेतीचा पसारा -एकूण ५ एकर शेती. त्यात ऊस, आंतरपीक आले, तसेच कडधान्याची पिके. -गोठ्यात एकावेळेस जास्तीत जास्त चार लिटर दूध देणाऱ्या दोन गायी. -गायीपालनाकडे व्यावसायिकपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला. -पिकांत जीवामृत, शेणखत आदींचाच वापर -सध्या १३ गीर गायी, एकूण जनावरे संख्या २५ --दोनवेळचे एकूण ८ लिटर दूधसंकलन. शंभर टक्के सेंद्रिय पदार्थ -गेल्या १२ वर्षांपासून प्रमोद सेंद्रिय शेती करतात. त्यांच्याकडे तयार होणारी उत्पादने १) सेंद्रिय देशी गायीचे तूप - जागेवरून विक्री - प्रतिकिलो ३ हजार रुपये दर. तूप शिल्लक राहत नाही. ----- ३ किलो तूप महिन्याला खपते. २) गरजेनुसार ताकाची २० रुपये प्रतिलिटर दराने विक्री. ३) गोमूत्र, शेण प्रतिलिटर २० रुपयांनी विक्री. ४) सेंद्रिय गुळाची एक, पाच व दहा किलोच्या स्वरूपात विक्री. दर- ७० रुपये प्रतिकिलो. ५) हळद - किलोला २०० रु. ६) जिल्हा परिषदेच्या सातारा आॅरगॅनिक उपक्रमांतर्गत मिळालेल्या गाळ्याद्वारे गूळ, हळदीची विक्री. ७) गेल्या वर्षी तूप, ताक, शेण, गोमूत्र अर्क, गोमूत्र, तसेच सेंद्रिय गूळ व हळद पावडरीच्या विक्रीतून ३ लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. -देशी गाय आधारित शेतीची संकल्पना राबवताना दुकानामधून महागडी खते, कीडनाशके न आणता शेणखत, गोमूत्र, अर्क व ताक आदींच्या वापराद्वारे शेतीचे व्यवस्थापन. -सुरवातीला देशी गायपालन व्यवसायाच्या उद्देशाने प्रमोद व गावातील सहकाऱ्यांनी जवळच्या जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मैदानावरील कळपामधून १० गायी, एक खोंड व कालवड विकत आणली. गायी प्रमोद यांच्या गोठ्यात ठेवल्या. त्यानंतर सहकारी शेतकऱ्यांनी प्रत्येकाचे वैयक्तिक कारण व वैचारिक परिवर्तन झाल्यानंतर गायी त्यांच्याकडेच सांभाळण्यास दिल्या. तरीही न डगमगता त्यांच्यासह पत्नीनेही कष्ट घेत गायींचे संगोपन केले. विद्यार्थी घेतोय अनुभव प्रमोद यांच्याकडे जवळच्या तारगाव येथील अजय अशोक निकम हा एम. एसस्सी. मायक्रोबायोलॉजी झालेला युवक सध्या गोपालनाचा अनुभव किंवा प्रशिक्षण घेतोय. आयुष्यात वेगळे काही करण्याची तळमळ असल्याने त्यांनी नोकरी सोडून दोन गीर गायी विकत घेतल्या. प्रमोद यांच्याकडे या गायींचीही देखभाल होत आहे. झालेले गौरव -यंदाचा जिल्हा परिषदेचा जे. के. बसू सेंद्रिय व अाधुनिक शेती पुरस्कार -स्वर्गीय कमलनयन बजाज फाउंडेशन व इस्कॉन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथील गो-विज्ञान परिषदेत गौरव दोन्ही मुलांचे स्वप्न.... प्रमोद यांचा मुलगा नीलेश बीई (मेकॅनिकल) आहे. येत्या काळात प्रक्रियायुक्त मालाचा उद्योग उभारण्याचे त्याचे स्वप्न आहे. मोठा मुलगा प्रशांत बीफार्म. आहे. शेतात नेचरोपथी केंद्र सुरू करण्याचे त्याच्या विचाराधीन आहे. प्रमोद बोरगे- ९८२३८८२६८५ कौटुंबिक व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणारी शेती करतो आहे. जीवनात वा शेतीत केवळ हिशेब पाहून चालत नाही, ते आवश्यक आहेच, मात्र जीवनाचे समाधानही तेवढेच महत्त्वाचे आहे. उदाहरण सांगतो. मी ५० टन ऊस पिकवला. तो कारखान्याला दिला असता, तर लाखभरापेक्षा कमी पैसे मिळाले असते. त्याऐवजी ऊस पिकवून तीन टन सेंद्रिय गूळ तयार करून किलोला ७० रुपये दराने विकला. त्यातून दीड लाखांचा नफा मिळाला.दै पुढारी मधून साभार
सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर
अॅग्रोवन मधून साभार
लोकसहभागातून ४४ दिवसांत पाच कोटी लिटर क्षमतेचे तळे
- - दुष्काळी तामसीकरांच्या एकजुटीचा परिणाम - कोणत्याही शासकीय मदतीशिवाय तळे उभारले तामसी, जि. वाशीम - गावकऱ्यांच्या एकजुटीने असाध्य गोष्टी साध्य केल्याच्या घटना अनेकदा चित्रपटांमधून बघायला मिळातात. वाशीम जिल्ह्यातील तामसी गावाने प्रत्यक्षात अशीच कमाल केली आहे. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय लोकसहभाग व लोकवर्गणीतून पाच दहा नव्हे, तर तब्बल ७० लाख रुपये खर्चून गावासाठी तळे उभे केले. पाच कोटी लिटर क्षमता असलेले हे तळे अवघ्या ४४ दिवसांत पूर्ण झाले असून, यासाठी ना कोणी इंजिनिअर होता ना कोणी तज्ज्ञ. होती ती गावकऱ्यांची एकजूट, ध्येय आणि काम करण्याची तयारी. यासाठी गावातील लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाने आपला लोकसहभाग दिला. तामशी हे पावणेचार हजार लोकसंख्येचे गाव गेल्या २० वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन करीत आहे. वाशीम जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर गाव असले तरी नळाद्वारे प्यायला पाणी मिळत नाही. सिंचनाच्या कुठल्याही सोयी सुविधा तेथे नाहीत. गावाशेजारी कुठलाही नाला, नदी नाही. पाण्याचे स्रोतच नसल्याने दिवसेंदिवस येथील परिस्थिती भीषण रूप घेत आहे. दिवाळी झाली की पाणीटंचाईच्या झळा सुरू होतात. या वर्षी तर मार्च महिन्यातच ‘मे’ प्रमाणे उन्हाचे चटके बसत आहेत. २० वर्षांपूर्वी तामसी हे गाव लगतच्या गावांना पाणी देणारे गाव होते. आज स्वतःच हे गाव पाण्यासाठी आसुसलेले बनले. ही समस्या कुठल्याही परिस्थितीत सोडविली पाहिजे, या विचारातून गावात बदलाचे वारे वाहू लागले. गेल्या सहा महिन्यांपासून गावकऱ्यांची मानसिकता तयार करण्याचे काम गावातील तरुणांनी हातात घेतले. दिवसाकाठी बैठकांचे सत्र झाले. ग्रामसभा घेतली आणि गावासाठी मोठे तळे उभे करायचेच असा निर्धार झाला.अतिक्रमण हटविले
गावासाठी तळे करण्याचे निश्चित झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेली ई-क्लास जमीन यासाठी निवडण्यात आली. पाच एकर असलेल्या या जमिनीवर अतिक्रमण झालेले होते. अतिक्रमण करणाऱ्यांना विश्वासात घेऊन प्रश्नाचे गांभीर्य समजावून सांगितल्याने त्यांनी स्वतःहून अतिक्रमण मोकळे केले. त्यानंतर १७ जानेवारीला या तळ्याच्या कामाचा नारळ फुटला. २९ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच ४४ दिवसांत २५० बाय २५० फुटांचे तळे आकाराला आले. २६ फूट खोल झाल्यानंतर या तळ्यात पाणी लागल्याने लोकांचा उत्साह आणखीच वाढला आहे. या तळ्यात पाच कोटी लिटर पाणीसाठा होणार आहे.जलपुरुषानेही केले कौतुक
८ मार्च रोजी जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे वाशीम येथे शासकीय कामासाठी आले होते. त्यांना तामसी करांनी केलेल्या कामाची माहिती मिळाली. त्यांनी कार्यक्रमापूर्वी तामसी गावाला भेट दिली. गावकऱ्यांनी केलेले कामाचे कौतुक केले. शिवाय या तळ्याची पाहणी करून भूगर्भाचे विविध टप्पे नागरिकांना समजावून सांगितले. येथील पाषाण हा जमिनीत पाणी धारण करू शकतो. या कामाचा खूप मोठा फायदा होईल, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. लोकसहभागातून अशी घडली किमया एवढे मोठे काम करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा होता. वर्षानुवर्षे पाणीटंचाईचे चटके सर्वच गावकऱ्यांना बसत असल्याने पाण्याचे मोल त्यांनी जाणले. यामुळेच घराघरांतून तसेच प्रत्येक व्यक्तीने लोकवर्गणी दिली. प्रत्येक घरातील पुरुष, तरुण, महिला, बालकांनी यासाठी निधी दिला. प्रत्येक माणसाने एक हजारापेक्षा अधिक रक्कम दिली. तरुणांनी मोबाईलवरील खर्च कमी करून ३०० ते ६०० रुपये दिले. बालकांनी खाऊचे गोळा झालेले शंभर, दोनशे रुपये दिले. सर्वांत मोठा व उत्स्फूर्त पुढाकार दिसला तो महिलांचा. त्यांनी गळ्यातील मंगळसूत्रातील प्रत्येकीने चार, सहा मणी काढून दिले. गावातील १०० पेक्षा अधिकजण नोकरीवर बाहेर आहेत. त्यांनी आपापल्या क्षमतेनुसार पैसा दिला. गावातील हनुमान मंदिराकडे गोळा असलेल्या वर्गणीतील १ लाख ७० हजार मिळाले. भागवत सप्ताहासाठी गोळा झालेल्या निधीपैकी २५ हजार आले. शेतकरी गटांनी पैसा तर दिलाच शिवाय श्रमदान केले, त्यामुळे या तळ्याच्या कामासाठी एकही रुपयाची मजुरी चुकविण्याची वेळ आली नाही. तयार झालेल्या या तळ्याला आता ‘लोकरंग जलमंदिर’ असे नाव देण्यात आले आहे. या तळ्याला चारही बाजूंना आखीवरेखीव पद्धतीने बंधिस्त केले आहे. पाण्यासाठी इनलेट-आउटलेट तयार केले. आगामी काळात येथे सुशोभीकरण केले जाईल. आता आणखी एका दुसऱ्या तळ्याचे काम सुरू झाले आहे. ‘लोकसागर’ नावाचे हे तळे किमान अडीच ते तीन कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे राहणार आहे. तळ्यांमध्ये पाणी गोळा झाले पाहिजे यासाठी वाशीम-मालेगाव रस्त्यापासून तर गावापर्यंत अडीच किलोमीटर नाली काढण्यात आली. हे दोन्ही तळे भरल्यानंतर गावाची पाणी समस्याच मिटणार आहे. ही कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अजून १५ लाखांचा निधी लागणार आहे. तोही उभा करून कामे करण्याचा निश्चय गावकऱ्यांनी केला आहेआशादायक बातमी. वाचतानाही खूप
अरे वा. हा इतका सुंदर
मी स्वतः श्री मोहन पवार- ९४२३६९१५५० यांच्याशी बोललो आहे
सजग मिपाकरांनी संपर्क करून त्यांचे अभिनंदन करावे ही माझी सर्वांना विनंती आहे. चार कवीता आणि "लाइक्स" करण्यापेक्षा अश्या प्रोत्साहनाची/कौतुकाची गरज आहे सगळ्या मोहन पवारांना !
मोहन पवार- ९४२३६९१५५०‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’
- अॅग्रोवनम्धून साभार उच्चशिक्षित तरुणाकडून पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन १७ एकरांत फुलताहेत विविध पिके कायम दुष्काळी बीड जिल्ह्यातील मादळमोही येथील मोहन निवृत्ती पवार हा उच्चशिक्षित तरुण शेतकरी. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ (पाण्याच्या प्रत्येक थेंबापासून अधिक उत्पादन) ही संकल्पना त्यांनी आपल्या १७ एकर शेतीत राबवली आहे. पाण्याची गरज, ठिबक सिंचनाचे नेमके तंत्र आदींचा सूक्ष्म अभ्यास करून ते पाण्याचा कार्यक्षम वापर करतात. त्यातून पिकांची विविधता घेत शेतीत नवा उत्साह निर्माण केला आहे. संतोष मुंढे बीड जिल्ह्यातील मादळमोही येथील मोहन निवृत्ती पवार यांनी आॅरगॅनिक केमिस्ट्री या विषयात एमएस्सी केले आहे. जोडीला कायद्याचेही ते पदवीधर आहेत. रसायनशास्त्रात उच्चशिक्षण असल्याने त्यांना खासगी कंपनीत नोकरीदेखील मिळाली. परंतु तिथे ते रमले नाहीत. वडिलोपार्जित १७ एकरांतच आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा फायदा करून दुष्काळातही शेती चांगल्या प्रकारे फुलवायची असे त्यांनी ठरवले. त्यानुसार २००७ मध्ये नोकरी सोडून शेतात राबण्याचा निर्णय घेतला. शेती आणली ड्रीपवर मोहन यांनी पाण्याला पहिले प्राधान्य दिले. कापूस हे पीक ठिबकवर घेण्यास सुरवात केली. सन २००८-०९ च्यादरम्यान ठिबकवरच ऊस व केळीचेही चांगले उत्पादन घेण्याचा प्रयोग केला. परंतु ऊस शेतीतील तांत्रिक व स्थानिक अडचणी त्यांना सतावू लागल्या. तरीही ११० टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली. त्यानंतर कमी पाण्यात येणाऱ्या डाळिंबासारख्या पिकाची २०१० मध्ये कास धरली.उभारले शेततळे मोहन यांच्या शेतात एक विहीर व दोन बोअर आहेत. मात्र सततचा दुष्काळ, कमी होत चाललेला पाऊस व घटत्या भूजलसाठ्यामुळे त्यांना २०१२ मध्ये टॅंकरवर बाग जगवून उत्पादन घ्यावे लागले. काळाची गरज अोळखून कृषी विभागाच्या योजनेचा आधार घेत ३४ बाय ३४ मीटर आकाराचे शेततळे त्यांनी घेतले. मात्र त्याचे आकारमान पदरखर्चाने वाढवून ते ५० बाय ७७ मीटरपर्यंत केले. त्याची सुमारे अडीच ते पावणे तीन कोटी लिटर साठवणक्षमता आहे.
पिकांना पाणी मोजून व काटेकोर दिल्याने आज शेततळ्यात सुमारे ८० टक्के पाणीसाठा आहे. यंदा तर पाऊस जवळपास झालाच नाही, मात्र पावसाळ्यात बोअरला येणाऱ्या पाण्यातून शेततळे भरून घेण्याचे तंत्र अवलंबिले. पाण्याच्या नियोजनावर आधारलेली शेती - एकूण १७ एकरांवर ठिबक सिंचन - मायक्रो स्रिंकलरचे दोन सेट, त्याआधारे कांदा पिकांचे नियोजन - प्रयोग १ - कमी पाण्यात येणारे पीक डाळिंब सुमारे साडेसहा एकर- तीन एकर जुनी बाग - मागील वर्षी त्यातून एकरी १३ टन उत्पादन, - साडेसहा ते सात टन एक्स्पोर्ट (व्यापाऱ्यांमार्फत) - जागेवर किलोला ६० रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी अडीच एकरांत बीजोत्पादनाचा कांदा घेतला. त्याचे सुमारे ५ क्विंटल ९० किलो उत्पादन मिळाले. त्यास ८५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. त्याचबरोबर सर्वसाधारण कांद्याचे एकूण क्षेत्रात २३ टन उत्पादन मिळाले. सोलापूर मार्केटला साडेसोळा रुपये दर मिळाला. प्रयोग ३ - गादीवाफा व पॉलिमल्चिंगचा वापर नोव्हेंबर २०१५ मध्ये अडीच एकरांवर खरबुजाची लागवड केली. त्यातून ३० टन उत्पादन घेतले. किलोला १७ ते १८ रुपये दर मिळाला. प्रयोग ४ त्यानंतर याच क्षेत्रात सव्वा एकर खरबूज व सव्वा एकर कलिंगड केले. खरबुजाचे १२ टन तर कलिंगडाचे १८ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. प्रयोग ५ त्यानंतर याच क्षेत्रात घेतली मिरची व शेवगा. मिरचीला व्हायरस आल्याने ती पुढे काढली. पण त्यातून सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले. मिरचीनंतर त्यात कोबी घेतला. सध्या तो उभा आहे. शेवग्याचे उत्पादन सुरू आहे. सात टनांची आत्तापर्यंत झाली विक्री. त्याला १० ते ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. म्हणजेच गेल्या नोव्हेंबरपासून सात पिकांचे उत्पादन सुरू आहे. त्यातील डाळिंब हेच पीक दीर्घ मुदतीचे आहे. बाकी सर्व कमी मुदतीची आहेत. पॅकहाउस व कांदाचाळ मालाला मूल्यवर्धनाची जोड देताना मोहन यांनी शेतात पॅकहाउस घेतले आहे. सोबतच कांदाचाळही उभारली आहे. सध्या कांद्याचे दर कमी असल्याने सुमारे २२ टन कांदा चाळीत साठवला आहे. मोहन यांच्या शेतीची वैशिष्ट्ये : - मजुरी, दर व पाण्याची उपलब्धता पाहून कापूस घेणे तीन वर्षांपासून थांबवले आहे. - केवळ अडीच एकर क्षेत्रात कमी कालावधीची पिके लागोपाठ हंगामात घेणे व त्यातून पैसा कमावणे - गादीवाफा व पॉली मल्चिंगचा वापर केल्याने जमिनीतील अोलावा टिकवला. - या दोन्ही बाबी पुढील पिकांसाठी वापरल्या जातात. - प्रत्येक पिकाची पाण्याची गरज किती हे अभ्यासून त्याप्रमाणे वापर - शेततळ्याचा आधार - १०० टक्के क्षेत्र ठिबकवर - सातत्याने प्रयोगांची कास धरणाऱ्या मोहन यांना पॉलिहाउस उभारणी प्रस्तावासाठी एनएचएमअंतर्गत मंजुरी मिळाली आहे. - हे ज्ञान आपल्यापुरते मर्यादित न राहता अन्य शेतकऱ्यांनाही त्याचा उपयोग व्हावा यासाठी कायम धडपड. - गावातील जलसंकटावर तोडगा काढण्यासाठी झटणाऱ्यातही ते अग्रस्थानीपाणी हे जीवन आहे. त्याचे दुर्भिक्ष्य कुणालाही परवडणारे नाही. ठिबक सिंचनाचा नुसता वापर महत्त्वाचा नाही; तर त्याचे तंत्र पूर्णपणे अभ्यासून मगच पाणी द्यायला हवे. शाश्वत उत्पादनासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब वापरायला हवा. बांधबंदिस्ती, विहीर, बोअर पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन, पिकांना गरजेनुसार पाणी देणे, मूलस्थानी जलसंधारण या बाबी अपरिहार्य आहेत.
मोहन पवार- ९४२३६९१५५०एक बाजू
मराठवाड्यात ‘जलयुक्तशिवार अभियान' मंदावले
By pudhari | Publish Date: Mar 22 2016 1:19AM | Updated Date: Mar 22 2016 1:19AM औरंगाबाद : प्रतिनिधी राज्यासह मराठवाड्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने ‘जलयुक्तशिवार अभियान’ हाती घेतले;परंतु पुरेशा निधीअभावी या अभियानाचा वेग मंदावला आहे. या अभियानांतर्गत मराठवाड्यातील 1682 गावांपैकी केवळ 37 गावांतील कामे शंभर टक्के पूर्ण झाली असून, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मराठवाड्यात 2015-16 अंतर्गत 1682 गावांत 67,333 कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 42,752 कामे पूर्ण झाली. मात्र, अजूनही 24,761 कामे अपूर्ण आहेत. मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत.एकीकडे निधीअभावी ही कामे खोळंबली असताना या वर्षासाठी 1522 गावांत नव्याने कामे करण्यात येणार असल्यामुळे प्रलंबित कामे व नवीन कामे करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या अभियानांतर्गत पहिल्या वर्षी मराठवाड्यातील 8 हजार 536 गावांची निवड करण्यात आली. यापैकी 2015-16 मध्ये 1682 गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून 592 कोटी 48 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने गाळ काढणे, पाणलोट क्षेत्र विकास, शेततळे, कंपार्टमेंट बंडिंग, सिमेंट व माती नाला बांध दुरुस्ती, खोलीकरण व सरळीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्षभरात झालेल्या कामांमुळे प्रत्यक्षात 1.16 लक्ष टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून, विहिरीच्या पाणीपातळीत 2.75 मीटरने वाढ झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ‘जलयुक्त शिवार अभियाना’चा चांगला परिणाम दुष्काळी मराठवाड्यात पहिल्या वर्षी दिसून आला. आतापर्यंत मराठवाड्यात 2 लाख 28 हजार हेक्टर एवढ्या क्षेत्राची सिंचन क्षमता वाढली आहे. या अभियानासाठी निवडलेल्या 1682 गावांच्या आराखड्यानुसार या कामांसाठी 2 हजार 266 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. प्रत्यक्षात केंद्र व राज्याचा मिळून सध्या 689 कोटी 60 लाख एवढाच निधी उपलब्ध आहे. अपेक्षित निधीच्या तुलनेत सध्या 1 हजार 577 कोटी रुपयांची तूट आहे. सध्या सुरू असलेल्या कामांना अधिक गती देण्यासाठी ‘गॅप फंडिंग’च्या माध्यमातून शासनाकडून 341 कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरपर्यंत किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची अपेक्षा आहे. या अभियानात गाळ काढण्यासाठी आतापर्यंत लोकसहभागातून 113 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सध्या 730 गावांमध्ये 1437 ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे. लोकसहभाग तसेच सरकारी निधीतून 287.08 लक्ष घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. 1682 गावांपैकी केवळ 37 गावांतील ‘जलयुक्त शिवार’ची कामे शंभर टक्के पूर्ण झाली आहेत. 114 गावांतील कामे 80 टक्के, 325 गावांतील कामे 50 टक्के, 510 गावांतील कामे 30 टक्के पूर्ण झाली आहेत.नाखुकाका, अपडेट्स वाचून लय
इच्छा तिथे मार्ग.....
अॅग्रोवन मधून साभार
Pagination