मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवीन वसाहत

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
काव्यरस
ताजी खबर, ताजी खबर भुतीण पारावरून ओरडली लगबगीने सरसर सरसर पारंबी धरून खाली आली - रात्र काळी, सळसळ झावळी समंध भारी, मुंजे किरकीरी जखिणी, हडळी आणि भुतावळी झाडांवर जमली सारी बिरादरी - कशाला उगाच मारतेस बोंबा उलटे झुलते वेताळ विचारते जरा थांबा, खाली घ्या टांगा सांगते सारे, भुतीण फिस्कारते - आपला सगळा मोहल्ला चालला येथून दुसरीकडे जागा देतील संपला जुना सहवास इथला कबरीतून काढून भांड्यात ठेवतील - बिरादरी भुमीवर वसाहत बांधून जागा भरणार, माणसे रहाणार हाडे खोदून, थोडीशी निवडून, एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१ - मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा तूच मर, मला नको डब्ब्याचे घर - एयर कंडीशन कंडो जंक्शन ***२ असेल, पण खुराडेच खरोखरी लॅन्डेड प्रॉपर्टी, बगीचा सोडून डब्ब्यांच्या घरी कशाला गुदमरी? - बकवास नको, समंध पिसाळला तुमचे मत कोणी विचारले का तुम्हाला? पुढल्या अमावस्येला बिरादरीला पॅक करून धाडतील कंडोत रहायला - मिळतील हेल मनी, कागदी मोटारी व हनी, **३ इथे दोन हप्ते उरले, मजा करू जानी चिंता भविष्याची कधी केली भुतांनी? सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी ***१- कबरस्थान हटवून त्याजागी फ्लॅटस होणार. नवीन वातानुकुलीत इमारतीत कबरीतील हाडांचे अस्थीकलश, पोस्टबॉक्स सारखे एकावर एक रचून ठेवणार. ***२ कंडो- कंडोमिनीयम ***३-चायनीज संस्कृतीत पितरांना कागदाच्या नोटा, कागदाचे बंगले, गाडया वगैरे जाळून अर्पण करतात.

वाचने 1080 वाचनखूण प्रतिक्रिया 0