Skip to main content

विनोद

कप्पा मनातला

लेखक गणेश.१० यांनी शुक्रवार, 22/09/2017 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे ही जिव्हाळ्याच्या माणसांसारखी पण अगदी चिकटून असणारी गोष्ट. त्यामुळेच की काय घरातल्या कपाटापेक्षा मनातल्या आठवणींच्या कपाटात कपड्यांनी थोडी जास्तच जागा व्यापलेली असते. त्यातला हा थोडासा अस्ताव्यस्त पण गंमतीचा कप्पा. माझ्या सर्वात जुन्या आठवणीतले कपडे मला स्पष्टपणे आठवतात.. (ओरिजिनली) हाफ शर्ट आणि हाफ पँट -- पूर्वाश्रमीच्या फुल पँटची आमच्या शेजारच्या टेलरच्या दुकानातून निघालेली दुसरी आवृत्ती. त्यानंतरची आठवण म्हणजे दिवाळसणाला गावी जमलेल्या सर्व भावंडांना एका रांगेत उभे करून घातलेले, टेलरने त्याच्या टेलिपॅथीने अंदाज घेऊन शिवलेले, नवीन कपडे. साम्यवादाचं अगदी छोटं घरगुती उदाहरण.

मान गए पंतवैद्य...

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 14/09/2017 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला.

हाफ चड्डी गँग (पार्ट -२)

लेखक बाजीप्रभू यांनी रविवार, 10/09/2017 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
हाफ चड्डी गँग (पार्ट -१) संध्याकाळचे सात-साडेसात झाले असतील. देवापुढे दिवा लावून आज दिवसभरात लावलेल्या दिव्यांची उजळणी करत होतो. मला अगदी स्पष्ट आठवतंय शुभंकरोतीच्या एकूण शृंखलेतील शेवटचा श्लोक गात(वाचा रेकत) होतो. मी म्हणत होतो की, "सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो" पुढला कलंक लागण्याआधीच आयमीन ऊच्चारण्याआधीच एका सृजनाचं वाक्य कानी पडलं. माझा सख्खाशेजारी 'राजेश' होता तो. ये बाजी!! कुणीतरी तुला शोधतंय बहुतेक. ते ऐकून माझ्या काळजात धस्स-बिस्स अजिबात झालं नाही कारण एव्हाना माझा गजनी झाला होता.

हाफ चड्डी गँग (पार्ट -१)

लेखक बाजीप्रभू यांनी शुक्रवार, 08/09/2017 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
पोर्तुगीज भाषेत एक म्हण आहे "ए ओकासीआओ फाज ओ लाडराओ" आपल्या मराठीत त्याचा अर्थ होतो कि, "चोर संधी निर्माण करतो आणि संधी सापडली तर सगळेच चोर होतात" याच भाषेत अजून एक म्हण आहे, ती अशी कि "क्यूएम कॉन्टा उम कॉण्टो, आऊमेन्टा उम पोण्टो" अर्थात, गोष्ट सांगणारा आपली भर घालतोच, आपल्या पदरचं, आपल्या बाजूनेच सांगतो.

एक संध्याकाळ..

लेखक दिपक लोखंडे यांनी बुधवार, 06/09/2017 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
" अहो ऐकताय ना?.." " नाही.. कानात तेल ओतलयं मी.." " काय ओ, कधीतरी प्रेमाने बोलत जावा माझ्याशी.." " अगं आज खूप कंटाळा आलाय.. मी एक झोप काढू का?" " ओ.. झोपताय काय?.. आज काय आहे माहीत आहे ना?" " काय आहे?..." " अहो, ती मागच्या गल्लीतली कविता आहे ना, आज तिच्या बहिणीचा साखरपुडा आहे.." " मग?.." " मग काय?.. चला ना जाऊया आपण पण.." " छ्छे... काय गं... कोण कविता आणि कोणाची बहीण?.. मला कंटाळ येतो बाई ह्या सगळ्याचा.." " काय ओ, सगळ्या बाया वाट बघतील ना माझी.." " बरं मग, तू जाऊन ये " " मी एकटी नाही जाणार.." " मग सोड ना, काय बिघडणार आहे.. लग्नाला तर जाणारच आहे ना आपण.." " पण?.." " हे बघ राधा..

"शेंडी लावणे"

लेखक विदेशी वचाळ यांनी रविवार, 03/09/2017 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्याला किंवा एखादीला किंवा समस्त जनतेला, "शेंडी लावणे", हा बहुदा आपला सगळ्यांचा जन्म सिद्ध हक्क असावा. आणि तो तसा नसेल, तर जगातल्या सगळ्या लोकशाही देशात घटना दुरुस्ती करून मान्य करून घ्यावा, अशा एका निर्णयाप्रत आम्ही सध्या पोहोचलो आहोत. तसे असले अनेक निर्णय आम्ही तडकाफडकी घेत आणि सोडत असतो तेव्हा त्याचे फार मनावर घेऊ नये. तर त्याचे झाले असे कि आमचे मन उगाचच भरकटत आमच्या विद्यार्थी जीवनात डोकावते झाले आणि आमच्या काळी आम्ही लोकांना आणि लोकांनी आम्हाला लावलेल्या शेंड्यांची आठवण झाली. तसा मी एका ख्यातनाम संस्थेत शिकायला होतो. ते थोडेसे टेकाडावर वसवलेले होते.

खरेदी एक भोग!

लेखक sudhirvdeshmukh यांनी सोमवार, 14/08/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
खरेदी एक भोग ! जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला खरेदी करावी लागते. ज्याने आयुष्यात कधीच खरेदी केली नाही असा व्यक्ती कदाचितच असेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या जश्या मुलभूत गरजा होत तशीच खरेदी सुद्धा मुलभूत गरज आहे. किंबहुना खरेदी मुळेच ह्या गरजा भागू शकतात. मानवी उत्कांतीचा इतिहास हा खरेदीचाच इतिहास आहेे. खरेदी प्रकियेत ग्राहक व विक्रेता हे दोन मुलभूत घटक जसे अंतर्भूत असतात तसेच ईतर अनेक घटक देखील यामधे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अंतर्भूत होत असतात. आजच्या काळात माणूस हा माणूस आहे का नाही हे खात्रीलायक रीत्या सांगणे धाडसाचेच होईल. पण माणूस हा ग्राहक मात्र आहे.

ती मला आवडते

लेखक निओ यांनी शुक्रवार, 11/08/2017 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
ती मला आवडते जेव्हा लाडिकपणे अंगाशी झोंबते तेव्हा ती मला खूप आवडते जेव्हा किरकोळ गोष्टीला खट्याळपणे Oh My God म्हणते तेव्हा ती मला खूप आवडते माझ्या टोमण्यांवर गुद्द्यांचा प्रसाद देते तेव्हा ती मला खूप आवडते मी टकाटक आवरून बाहेर जाताना हूं...

ऐसी भी क्या जल्दी है !

लेखक sudhirvdeshmukh यांनी बुधवार, 09/08/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सर्वाना पुढे जायची घाई आहे. परंतु काहि महाभागांना मात्र जरा जास्तच घाई दिसते. ही सतत व्यस्त, त्रस्त आणि काहिशी अत्यव्यस्त असणारी मंडळी भेटणार्यांची अनेक ठिकाणे आहेत. प्रामुख्याने ATM, पेट्रोल पंप, ट्राफिक सिग्नल्स, टिकिट खिडकी इत्यादी ठिकाणी ही मंडळी हटकुन भेटतात. गर्दीच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने पळवनारे कुशल वाहन चालक याच जात कुळीतले. बहुतेक सर्वाना रेल्वे स्टेशन वर जायचे आहे व पोहचले नाहीतर यांची गाड़ी सुटनार, अर्थातच गाडी सुटली तर यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार, असेच आपल्याला वाटावे एवढ्या सुसाट वेगात ही मंडळी जात असतात.

#कटींग_पाटली_व_हिप्पीकट

लेखक sudhirvdeshmukh यांनी मंगळवार, 08/08/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
#कटींग_पाटली_व_हिप्पीकट लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे.