Skip to main content

विनोद

भाग मिल्खा भाग!!

लेखक बाजीप्रभू यांनी सोमवार, 07/08/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
टेक-१, वर्ष १९६०. रोम ऑलिम्पिक्सचे दृश्य. पिळदार शरीरयष्टीचा मिल्खा सिंग "द फ्लाईंग सिख" एखादया बाणासारखा सुटतो. पण फिनिशिंग लाईनजवळ आल्यावर, रेस ट्रॅकवर त्याला फाळणीच्या वेळी दिसणारी पळापळ दिसते. 'भाग मिल्खा भाग' च्या आरोळ्या मिल्खाला विचलित करतात. जुने काही तरी आठवते आणि शर्यतीतील लक्ष उडते. मिल्खा जिंकता जिंकता मागे पडतो, हरतो. देशभरात नैराश्य, संतापाची लाट येते. मिल्खा नुसता हरत नाही तर मनाने देखील खचतो. संपूर्ण देशामधे मिल्खाच्या हरण्याची चर्चा होते. "मिल्खा लॉस्ट" अशी "भाग मिल्खा भाग" चित्रपटाची रोमांचक सुरुवात सगळ्यांना आठवत असेल.

गटारीगाथा

लेखक सौन्दर्य यांनी सोमवार, 17/07/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
२०११ साली लिहिलेली हा लेख येणाऱ्या गटारीच्या स्वागतासाठी पुन: पोस्ट करीत आहे. गटारीगाथा तसे आपले खास असे महाराष्ट्रीयन सण पुष्कळ आहेत, पण ज्या सणाची महाराष्ट्रीयन पुरुष आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे 'गटारी अमावस्या'. ज्या प्रमाणे गणेश चतुर्थी, दिवाळी वगैरे सणांची तयारी काही दिवस अगोदरच सुरु केली जाते, त्याच प्रमाणे ह्या दिवसाची तयारी देखील पुष्कळ दिवस आधीपासून सुरु होते. आधी पुरुषवर्ग मनातल्या मनात मांडे खाऊ लागतो, गटारी जवळ आल्यावर हळू हळू गटारीचे सुतोवाच बायकोसमोर केले जाते.

ही कविता फॉरवर्ड करा

लेखक vcdatrange यांनी बुधवार, 12/07/2017 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता फॉरवर्ड करा ही कविता फॉरवर्ड करा, नाही तर पाप येईल रात्री झोपल्यानंतर, तुमच्या घरात साप येईल पाच जणांना फॉरवर्ड करा, हरवलेली वस्तु सापडेल नाही केली तर, भुत तुमच्या कानाखाली झापडेल दहा जणांना फॉरवर्ड करा, सोन्याचा हार मिळेल नाही केली तर, पाठीवर मार बेसूमार मिळेल पंचवीस जणांना फॉरवर्ड करा, स्टॉक मार्केट चढेल, नाही केली तर कावळ्याचं शिट डोक्यावर पडेल पन्नास जणांना फॉरवर्ड करा, नोकरीत प्रमोशन होईल नाही केली तर, सकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल शंभर जणांना फॉरवर्ड करा, लॉटरी मिळून जाईल नाही केली तर, बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाईल

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

मेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 25/06/2017 03:57 या दिवशी प्रकाशित केले.
काडीचा सरडा ही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते. होती शुष्क एक काडी झाडावरती तुटूनी पडली खाली धरणीवरती जणू ओढावले तिचे मरणचकी वय होवोनी मातीत मिळाली वेगळी झाली मग तिचे व्हावे काय? धुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय प्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे पण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे डोके छोटे वरती बघे मान उंचावूनी पुढील पाय लांब केले खाली रेटूनी लांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती उडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी निसर्गाचा चमत्कार हा पहा या छायाचित्रात काडी मोडोनी वृ्क्षाची रुप बदलले सरड्यात
काव्यरस

कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी रविवार, 18/06/2017 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
१. आयला ऑफिसला जाण्याआधी कश मारावा या हेतूपोटी नागेशने सिगारेट बाहेर काढली. पण लायटर पेटवताच त्यातून हिरवट रंगाचा चमकदार धूर बाहेर पडला. थोड्याच वेळात धुराचा छोटासा ढग तरंगू लागला अन ढगातून जिन प्रकट झाला. “हॅपी न्यू इयर मेरे आका. बोलीये क्या हुक्म है “ नागेश आश्चर्याने पाहू लागला “तू जिन आहेस ?!!” “हो हुजूर.” नागेशने स्वतःला एक चिमटा घेतला. “हे स्वप्न नाहीये मालिक.” “पण तू लायटरमधे कसाकाय ? जिन तर जादूच्या दिव्यात सापडतो ना” “बरोबर. तो मोठा जिन… बड़े भाईजान. मी छोटा जिन.” “आयला असंही असतं का ?” “जी हाँ.” “तू माझ्या इच्छा पूर्ण करशील न पण ?” “बेशक.

बकरी ने पैसे का खाल्ले ?

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 16/06/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. . कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right संदर्भ : नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.

३-१३ आणि १७६० .......

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 08/06/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्लेमर =====> खालील लेख हा निव्वळ टाईमपास म्हणून लिहिला आहे. आमच्या एका गुरुंच्या कृपेने, आम्ही बर्‍याचदा (खासकरून शनिवारी रात्री) सुक्ष्मात जातो. गेली ३०-३२ वर्षे गुरु शोधण्याची खूप पराकाष्ठा केली. सुरुवातच फार दणक्यात झाली. आमच्या काकांच्या कृपेने घरात बाटलीबंद गुरु बरेच असायचे. काळ्या कपड्यातला चालणारा जॉनी, लाल कपड्यातला चालणारा जॉनी, पांढरा घोडा, सोनेरी गरूड हे त्यापैकीच. तसे हे सगळेच गुरु उत्तम पण हे रोज-रोज भेटायला आम्हाला भेटत नाहीत.असो..... पुढे लंडन मधील पिल्सनर येथे राहणार्‍या गुरुंची ओळख झाली.

साधूने केला वर्षाव 'अमृतधारां'चा!!!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 28/05/2017 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या वर्षावात न्हायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण मी तुम्हाला आता एक असा खरा घडलेला प्रसंग सांगणार आहे, ज्यात अशा एका गोष्टीच्या वर्षावात काही जणांना न्हायचा योग आला होता, ज्याची कोणी स्वप्नातसुद्धा कल्पना करू शकणार नाही. त्याचे असे झाले, की मी एकदा लोकलट्रेनने सकाळी साधारण सात साडेसात वाजता गर्दीच्या उलट दिशेने प्रवास करीत होतो. अशावेळी गाडीत अगदी तुरळक माणसे असतात. त्यातले बरेचसे रात्रपाळी करून, डुलक्या काढत घरी जाणारे असतात. आणि जे जागे असतात तेही पेंगूळलेल्या डोळ्यांनी खिडकीबाहेर बघत शांत बसलेले असतात. गाडी सुसाट पळत असते. नुकताच सूर्योदय होत आलेला असतो.

कटप्पाने ...... जानरावची परेसानी

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 10/05/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
दोन बरस माणसाले येकच गोष्ट सतावत होती 'कटप्पाने बाहुबलीको क्यू मारा.' आता आपल्याले परेशान्या का कमी रायते का जी. अमदा तूरीन पार खाउन टाकल. दरसाली अळी तूरीले खाते अमदा तूरीने आपल्याले खाल्ल. त्येच्यात हे परेसानी आणखीन कायले ठेवाची. बाहुबली येनार अस समजल तवाच म्या फोन करुन माया साडभावाले सांगतल मायासाठी दोन टिकिटा काढून ठेवजो. ज्या तारखेच भेटेन त्या तारखेच काढजो, म्या येतो. मी आन माया ढोरकी धन्या, त्याले मायासारखाच पिक्चरचा भारी शौक हाय. बायको पोरायले घेउन यवतमाळेले गेली. म्या बी मायी वावरातली काम आटपून घेतली. नाही कणच्या दिसाच टिकिट भेटन काही सांगता येत नाही न भाउ. रोज फोनची वाट पाहात होतो.