कणेकरसाहेब.... तुमनेच हमको बिघडव्या !
वो क्या है.... हमारे लहानपणी... जर वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका... वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका. ऐसा. लेकिन... मगर (येस्स्स्स.. दोन्हीही).. उन दिवसोंमें पुस्तकोंमे जरा वरण भात जैसा लिखाण होता था.
मला नक्की काय म्हणायचंय ते तुमच्यासारख्या interpretative analytical in-depth reporting करणार्या माणसाला एरवीच कळालं असेल. आमचं बालपण - आम्ही टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर, फुले नाही... पण आम्ही पुण्याचे असल्यामुळे आम्ही टोणगेपण किंवा कार्टेपण वगैरे पार करून डायरेक्ट बालपणाला क्वालिफाय होतो. तर आमचं बालपण गेलं पुण्याच्या पेठांमधे. आमचा पुस्तकांचा खुराक म्हणजे पु.लं, द.मा. मिरासदार, भा.रा.
मिसळपाव
आज सकाळी सकाळीच आपल्या बावळट बाळूला कळलं की आज पुस्तक दिन आहे ते. सकाळी सकाळी म्हणजे असं की त्याच्या फेसबुक क्रश मातकट माऊने रात्रभरात कुठकुठल्या पोस्टला लाईक केले हे बघायला त्याने गोपाळमुहुर्तावर फेस्बुक उघडल्यावर. पण ही ‘प्रोसेस’ आम्ही जितकी सांगितली तितकी सहज नसते. ती समजण्यासाठी त्याआधी त्याने काय केलं हेही जाताजाता बघून घेऊ.
म्हणजे झोपेतून उठल्यावर त्याने आधी डोळे उघडले हे महत्वाचं.