Skip to main content

विज्ञान

विज्ञान आणि चमत्कार - ग्रंथ परिचय

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/11/2013 01:25 या दिवशी प्रकाशित केले.

ग्रंथ परिचय –

विज्ञान अणि चमत्कार

भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान?

या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे?

बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौतशास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?

मंगलयान - उत्तरार्ध

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 23/11/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.

अवकाशाच्या निर्वात पोकळीत इतर काही नसले तरी निरनिराळ्या ग्रह आणि ता-यांच्या गुरुत्वाकर्षणाचा जोर (फोर्स) एकमेकांना आकर्षित करत असतो. या जोराचा प्रभाव अंतराच्या वर्गाच्या (स्क्वेअरच्या) व्यस्त प्रमाणात कमी होत जातो. म्हणजे अंतर दुप्पट झाले तर तो पावपट होतो आणि अंतर वाढून दहापट झाले तर तो जोर एक शंभरांश इतका कमी होतो.

सावधान ! येत्या काही आठवड्यात सूर्य उलथतोय !!

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 17/11/2013 01:04 या दिवशी प्रकाशित केले.

शात्रीय वर्तुळात सध्या चर्चेत असणार विषय म्हणजे येत्या काही आठवड्यात सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण धृवांची अदलाबदल होणार आहे ! सूर्य म्हणजे अतिगरम उकळणाऱ्या वायूचा (पृष्ठभागवर ५,५०५ अंश आणि मध्यभागी १.५ कोटी अंश सेल्सिअस) गोळा आहे हे आपल्याला माहीत आहेच...

इतक्या गरम वायूंच्या कणांच्या अवस्थेत त्यांचे भारीत कणांमध्ये (plasma) रूपांतर होते आणि सूर्याचे चुंबकीय क्षेत्र तयार होते...

आपण ग्रेट आहोतच !

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 05/11/2013 12:18 या दिवशी प्रकाशित केले.

१५ ऑगस्ट २०१२ चे पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचे भाषण मला आठवते. बहुदा विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या घोषणा लक्षात राहतात. कारण या दोनही क्षेत्रातल्या माझ्या देशाच्या घोडदौडीचे मला नेहमी कौतुक वाटते. १७५० साली ब्रिटन मध्ये सुरु झालेली औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची सुरुवात मानली तर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे सुमारे १९५० साली आपल्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. डॉ भाभा, जमशेदजी आणि नेहरू या त्रिकुटाचे प्रत्येक स्वकीयाने आभारच मानले पाहिजेत.

विकीपंडीत किंवा गूगलपंडीत ?

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 21/10/2013 15:36 या दिवशी प्रकाशित केले.

सध्याच्या इंटरनेटप्रणित युगात, इंटरनेट हे माहितीचे मायाजाल न राहता माहितीचा अफाट स्रोत झाले आहे. त्याचा वापर करून कोणीही कुठल्याही विषयाची माहिती मिळवून, त्या माहितीचा यथायोग्य वापर करून, त्या माहितीचा मानवजातीसाठी योग्य उपयोग करू शकतो. जसे विज्ञान हे शाप किंवा वरदान होऊ शकते त्याचप्रमाणे इंटरनेटवरच्या अफाट माहितीचा हा सागर त्याचा वापर कसा करू त्याप्रमाणे उपयोगी किंवा दुरुपयोगी ठरू शकतो. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अबलंबून आहे. कोणाला अर्धा भरलेला ग्लास 'अर्धा रिकामा' असा दिसू शकतो किंवा 'अर्धा भरलेला' दिसू शकतो.

Gas Cylinder सुरक्षितता उपाय

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 15/10/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रहो
आपण सर्वांनी Gas Cylinder च्या बाबतीत जागरूक असले पाहिजे या दृष्टीने मी आज एक गोष्ट महित झालि आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. आपण स्वतः बरोबर इतरांनाहि जागरूक करावे.
आपल्या रोजच्या वापरत येणारा Gas Cylinder हा कोणत्या दिवसा पर्यन्त कार्यक्षम राहाणार आहे हे कसे ओळखावे ते पहा.
१) Cylender च्या volve च्या भोवती ज्या 3 पट्ट्या असतात त्यावर A B C D अशा खुणा असतात आणि ज्या वर्षी Cylender expire होणार त्याचे वर्ष छापलेले असते.

आकृती मध्ये पिवळ्या वर्तुळातील खुणा पहावी.

म्हणजे जसे कि A /१२, किंवा D/१५ यापैकी पहिले A B C D म्हणजे वर्षाचे चार भाग केलेले असतात.

तिन कविता तिन ठिगळे

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 08/10/2013 16:09 या दिवशी प्रकाशित केले.

पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता प्रलय

शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे

अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे

निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो

मग

ढळतो संयम मातेचाही
बाबांची ती जागा घेई
हलाहल ते पचवित सांगा
पोळीवरती तुपही नाही

मोनार्क - १

लेखक किलमाऊस्की यांनी मंगळवार, 17/09/2013 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

कॅनडातल्या एका छोट्या गावात रेल्वेलाईन शेजारच्या घरात खिडकीत बसून, रुळावरुन थडथडत धावणार्‍या मालगाड्यांची वाट बघत बसणं हा पाच वर्षाच्या छोट्या फ्रेडीचा आवडता छंद. मालगाड्यांची वर्दळ जेव्हा कमी होत असे तेव्हा रेल्वेलाईन पलिकडे पसरलेलं मोठ्ठ्च्या मोठ्ठं माळरान न्याहाळत बसणं हे फ्रेडीचं अजून एक काम. हिरव्यागार गवतात उगवलेली पिवळी-पांढरी रानटी फुलं,त्यावर घोंघावणार्‍या मधमाशा, रंगीबेरंगी फुलपाखरं, मधनूच भिरभिरणारे चतुर, फ्रेडी आपल्या पिटुकल्या डोळयांनी तासनतास निरखत बसे. एके दिवशी मांजरीच्या पिल्लासारख्या मऊमऊ अंगाच्या मधमाशीला पाहून अगदी न रहावल्याने फ्रेडी धावतच तिला पकडायला गेला.

स्वत्वाचा शोध

लेखक arunjoshi123 यांनी मंगळवार, 10/09/2013 15:19 या दिवशी प्रकाशित केले.

स्वत्वाची संकल्पना -

मनुष्य स्वतःला 'मी' म्हणून संबोधतो. त्यात दोन भाग आले. मनुष्य एक जीव म्हणून कसा आहे याचे वर्णन हा पहिला भाग. अनेक शास्त्रांनी या भागावर चिकित्सा करून अधिकाधिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. आपल्या असा एक जीव असण्याचे श्रेय सहसा कोणी विवेकी मनुष्य आपल्याकडे घेत नाही. म्हणजे मी अमुकराव आहे 'म्हणून' माझ्याकडे विचार करण्याची शक्ती आहे, अन्न पचवण्याची शक्ती आहे, असे कोणी मानत नाही.