Skip to main content

विज्ञान

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-३ (अंतीम)

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 23/05/2013 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे भागः चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१ चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२ -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अपघातानंतर लगेचच जमिनीवर आणि समुद्रात शोध कार्य हाती घेतले गेले. त्यावेळी ही सर्वात मोठी शोध मोहीम होती मात्र अवकाशातून यानाचे मोठे अवशेष कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन विमाने आणि जहाजांना एक तासापर्यंत रोखून ठेवण्यात आले होते.

सत्याचा विजय - विज्ञान विरुद्ध श्रद्धा

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 22/05/2013 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन 1600. फेब्रुवारी 17. रोममधल्या एका तुरुंगात सात वर्षं खितपत पडलेल्या एका कैद्याला पोलिसांनी बाहेर काढलं. रोममधल्या एका मोठ्या चौकात त्याला एका खांबाला बांधलं. 'दुष्ट/विकृत शब्द बोलते' म्हणून त्याच्या जिभेला एक खिळा ठोकला. त्याच्या पायाशी भरपूर लाकडं आणि त्याचीच पुस्तकं ठेवली. आणि त्यांना आग लावली. ज्वाळांनी होरपळून त्याचा अत्यंत हाल हाल होऊन मृत्यू झाला. त्याचं नाव होतं ज्योर्दानो ब्रूनो. आताच्या काळात असता तर आपण त्याला शास्त्रज्ञ म्हटलं असतं. पण त्यावेळी शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक अशी अधिकृत पदवी नव्हती. बहुतेक अभ्यासक आपल्या जबाबदारीवर अभ्यास करायचे.

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 20/05/2013 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग पहिला प्रत्यक्ष उड्डाणाचा दिवस २८ जानेवरी उगवला. अजूनही उड्डाण नक्की होईल किंवा नाही याबाबत काही अंशी साशंकताच होती. कारण आदल्या रात्री उणे आठ इतके कमी तापमान नोंदवले गेले होते. २८ ला सकाळी +१ पर्यंत तापमान सुधारले होते. मात्र यापूर्वी १२ अंश सेल्सियश पेक्षा कमी तापमानात स्पेस शटल कधीही झेपावले नव्हते. अशा परीस्थितीत कधीही उड्डाण पुढे ढकलता येते.

चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१

लेखक लाल टोपी यांनी शुक्रवार, 17/05/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ मध्ये अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्राने एक महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. अंतराळात पुन्हा पुन्हा वापरता येण्यासारखे मनुष्य घेऊन जाणारे अंतरीक्ष यान बनवण्याची ही कल्पना त्यावेळी फारच नाविन्यपूर्ण होती, नासाने या प्रकल्पाला 'स्पेस शटल' हे नांव दिले होते. अनेकांना ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती मात्र पांचच वर्षात 'कोलंबिया' या स्पेस शटलने उड्डाण केले ५४ तांस पृथ्वीच्या कक्षेबाहेर भ्रमण करून नियोजित कार्यक्रमानुसार फायर इंजीनाचा वेग कमी करून हळूहळू पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आणि एखाद्या ग्लायडर प्रमाणे नियोजित तळावर सुखरूप उतरले. एक स्वप्नवत प्रवास मानवाच्या आवाक्यात आला होता.

अगदी सोपी 'फिटनेस टेस्ट'

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 28/04/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणालाही, केंव्हाही, कुठेही पटकन करता येइल, अशी ही फिटनेस टेस्ट: खाली (जमिनीवर) बूड टेकवून बसायचे, आणि कुठेही हात न टेकता, कसलाही आधार न घेता उठून सरळ उभे रहायचे. बस, एवढीच ही टेस्ट आहे. ही अगदी साधी क्रिया देखील कित्येकांना जमत नाही, असे दिसून येते. याची कारणे खालील पैकी असू शकतातः १. लठ्ठपणा, फाजील वजन. २. पाठीचा कणा आणि गुडघे कमकुवत असणे. ३. स्नायूंमधे पुरेशी शक्ती नसणे ४.

अ‍ॅन्ड्रोईड: संस्थापक आणि स्थापना

लेखक लंबूटांग यांनी बुधवार, 03/04/2013 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
टीपः माझा विडंबनाशिवाय काहीही लिहीण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सुधारणा अवश्य सुचवा. २००३ च्या शेवटी शेवटी असाच एक दिवस. स्टीव्ह पर्लमन -एक हुशार, यशस्वी अभियंता आणि भांडवल पुरवठा/ गुंतवणूकदार - याचा दूरध्वनी खणखणला, पलीकडे होता जुना मित्र आणि सहकारी अ‍ॅन्डी रुबीन जो तिथून जवळच्याच एका भाड्याच्या जागेत आपली कंपनी चालवत होता. अ‍ॅन्डी: मी कफल्लक झालोय, पैशाची गरज आहे. स्टीव्ह: कधी पाहिजेत? अ‍ॅन्डी: आत्ताच्या आत्ता! स्टीव्हने जवळच्याच बँकेत जाऊन १०० डॉलरच्या १०० नोटा काढल्या. ते १०,००० डॉलर एका साध्या पाकिटात घालून तो अ‍ॅन्डीच्या ऑफिसात गेला आणि त्याच्या टेबलावर ते पाकीट ठेवले.

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

आणखी एक टायटॅनिक-३

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी मंगळवार, 26/03/2013 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहिला भाग दुसरा सत्तर ते ऐंशी अंशात कललेलं जहाज आता किनाऱ्याजवळ एका ठिकाणी येऊन स्थिर झालेलं. काही लोकं अजूनही जहाजावर होते.मेयर मेरीको पेल्लेग्रीनी आणि कोस्टाचा डॉक्टर दोघे मिळून सर्व लोकांना बाहेर पडण्यास मदत करत होते. मेरीकोला मदत करण्यात काही क्रू मेम्बर्स होते. थॉमस मेंडोसा या सफाई विभाग प्रमुखाने बऱ्याच लाईफ बोटी सोडण्यात मदत केली. पाण्यात पडून हायपोथर्मियाने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कॉर्पोरेटिझम, समाज आणि संशोधन

लेखक नगरीनिरंजन यांनी बुधवार, 20/03/2013 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
“It is one of the great ironies of corporate control that the corporate state needs the abilities of intellectuals to maintain power, yet outside of this role it refuses to permit intellectuals to think or function independently.” ― Chris Hedges तुमचा भुतांवर विश्वास आहे का? तुमचा भानामतीवर विश्वास आहे का? तुमचा देवावर विश्वास आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या चालीवर तुमचा ग्लोबल वॉर्मिंगवर विश्वास आहे का असा प्रश्न लोक एकमेकांना विचारताना पाहिले की विज्ञान ही एक श्रद्धा-अंधश्रद्धा ठेवण्याची गोष्ट आहे की काय असे वाटू लागते.