मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

९९ वर्ष्यानंतर

आंद्रे वडापाव ·
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे.

हा गणितसंबंधित प्रश्न क्रुपया सोड्वुन द्यावा

शानबा५१२ ·
एक गणित संबंधित प्रश्न आहे जर एका प्रकारच्या पाच वस्तूंची किंमत १२५ रुपये आहे तर त्याच प्रकारच्या बारा वस्तूंची किंमत किती असेल? हे गणित आपण खालीलप्रमाणे सोडवतो, ५ = १२५. मग १२ =? म्हणून ? = १२५ X १२ भगिले ५ म्हणजे ३०० असे उत्तर येते. या अशाच प्रकारच्या गणितामध्ये मोडणारा एक प्रश्न होता. ही गणितीप्रक्रिया शेअर मार्केटशी संबंधित आहे. समजा मी २५ च्या संख्येमध्ये पहिले ३०० च्या भावाने कॉन्ट्रॅक्ट घेतले.

पुस्तक परिचय : हू मूव्ह्ड माय चीज : डॉ स्पेन्सर जोन्सन

विजुभाऊ ·
हू मूव्हड माय चीज. : डॉ.स्पेन्सर जॉन्सन खरे तर हे एक अगदी छोटेखानी पुस्तक यातली गोष्ट तर इतकी छोटी की या पुस्तकाला कथा म्हणावे की लघु कादंबरी असा प्रश्न पडतो. पण एकद अका हे पुस्तक वाचायला घेतले की सगळे प्रश्न सम्पतात आणि एक प्रवास सुरू होतो. सम्वाद सुरू होत स्वत:चा स्वतःशी. डॉ. स्पेन्सर जॉन्सन हे एक लाईफ कोच. मनोचिकित्सक .पुस्तकाची सुरवात होते त्यांच्या एका मित्रपरिवाराच्या कार्यक्रमात सांगितलेली गोष्ट सांगतात. एका कोड्यात ( मेझ ) रहाणार्या चौघां जणांची ही गोष्ट.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

स्वप्नपूर्तीचा दुसरा दिवस!

पराग१२२६३ ·
रायसीना त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.

खंडाळ्याच्या घाटासाठी...

पराग१२२६३ ·
Rajmachi point यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.

आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

पराग१२२६३ ·
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.

विनिपेग डायरीज

राजेंद्र मेहेंदळे ·
जवळपास १६ -१७ तासांच्या विमान प्रवासानंतर कॅलगरी एअरपोर्टवर पुढच्या विमानाची वाट बघत बसलो होतो. मागचे ७-८ दिवस फारच धावपळीत गेले होते. या आधीही परदेश प्रवास केला होता , त्यामुळे त्याचे नावीन्य नव्हते. परंतु एखाद्या देशात दीर्घ काळ राहण्याचा हा पहिलाच अनुभव असणार होता. मुंबईहून निघाल्यापासून झोप नीट न झाल्याने थकवाही जाणवत होता. पुढच्या विमानाला चांगला ३-४ तासांचा वेळ असल्याने लाउंजमधला एक निवांत कोपरा बघून बसलो.सामान आजूबाजूला ठेवले आणि स्टॉल वरून कॉफी घेऊन आलो. कॉईन फोनवरून एक दोन जणांना फोन करायचा प्रयत्न केला पण ते काही जमले नाही.त्यामुळे निवांत कॉफी पीत बसलो.

एका (शैक्षणिक) सहलीची सांगता

सर्वसाक्षी ·
महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आ‌ईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी. तर सांगायची गोष्ट अशी की सहलीची खुमखुमी सर्वांना आली. नुकतीच सहल हो‌ऊन गेल्यामुळे पुन्हा सहलीला घरचे पाठवणं शक्य नव्हतं. मग काय करणार? ना‌ईलाजानं शैक्षणिक सहल आयोजित करावी लागली. कार्य सिद्धीस नेण्यास सदस्य उत्सुक होतेच.