Skip to main content

वाङ्मय

बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/05/2014 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावरील जुने व्यक्तिमत्त्व, मिसळपावचे पहिल्या दिवसापासुनचे सदस्य, बे एरियातील मुरलेले कट्टेकरी आणि माझे परममित्र श्री बेसनलाडू सद्ध्या मुंबईत आले आहेत. येथील गँगचा आणि त्यांचा परिचय व्हावा म्हणून शनिवार दि. 24 रोजी दादर पुर्व स्थानकासमोरील ऋषी हॅाटेल येथे सायंकाळी ६ वाजता भेटण्याचे ठरवले आहे. तुर्तास मी, रामदास काका, प्रास, सुड, किसन आणि कस्तुरी इतके मेंबर इन्न आहेत. इतरांना कळावे म्हणून हा धागा. समन्वयासाठी मोबाईल क्रमांक हवा असल्यास व्यनी करावा.

गमभन.ऑर्ग - ऐकू आनंदे

लेखक ॐकार यांनी सोमवार, 19/05/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्‍या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास.

गुढी उभारनी

लेखक माहितगार यांनी सोमवार, 05/05/2014 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
गुढी उभारनी (कवियत्री बहिणाबाई चौधरी ) गुढीपाडव्याचा सन आतां उभारा रे गुढी नव्या वरसाचं देनं सोडा मनांतली आढी गेलसालीं गेली आढी आतां पाडवा पाडवा तुम्ही येरांयेरांवरी लोभ वाढवा वाढवा .........उर्वरीत कविता: http://www.transliteral.org/pages/z70717225241/view ......... बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद - डॉ. सुधीर रा.

साजण / काही चोरोळ्या

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 03/05/2014 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या) (१) लपत छपत तो बिछान्यात येतो गोड गोड गाणी कानात म्हणतो कधी चुंबितो कधी चावतो सारी रात्र मला तो छळतो का सखी साजण? ना सखी डास. (२) कधी काळी येतो गोड गोड बोलतो खोटी वचने देऊनी सर्वस्व लुबाडीतो का सखी साजण? ना सखी नेता. (३) कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज

कलगीतुरा - पूर्वार्ध २

लेखक बबन ताम्बे यांनी बुधवार, 30/04/2014 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचा लेख खालील लिंकमध्ये वाचणे. कलगीतुरा - पूर्वार्ध कांतीशेठ गेल्यानंतर दार लावायला गेलो तर आमच्या सोसायटीतला त्रस्त समंध गोगटया गॅलरीतून कुचेष्टेने हसत ऊभा होताच. लगेच खवचटपणे " काय दिगूशेठ ? नवीन व्हेंचर का? " असे म्हणत खिदळलाच. या गोगटयाची गॅलरी आणि आमची खिडकी समोरासमोरच आहे. हरामखोराला आमच्या घरातली एकूणएक वित्तंबातमी गॅलरीत बसून कळते. या थेरडयाचे मी शंभर अपराध भरायची वाट बघतोय. मला लगेच वाशाला गाठायचे होते, म्हणून मी गोगटयाकडे दुर्लक्ष केले. मी लगेच वाशाच्या घरी फोन लावला. फोन त्याच्या बायकोने ऊचलला.

विल्यम शेक्सपियर, कॉपीराईट आणि भारत

लेखक माहितगार यांनी बुधवार, 23/04/2014 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
विल्यम शेक्सपियर यांची आज पुण्यतिथी २३ एप्रिल, इ.स. १६१६ ला ते सहित्यिकांच्या स्वर्गात वास करण्यास गेले. त्यांची पुण्यतिथी जगभर जागतीक पुस्तकदिवस आणि कॉपीराईट दिवस म्हणून साजरी केली जाते.

गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 18/04/2014 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिप्रकल्पात मराठी विकिबुक्स नामे एक प्रकल्प आहे. या प्रकल्पात कुणा गीताईप्रेमीने विनोबा भावेंच्या गीताईचे काही वर्षांपुर्वी युनिकोडात टंकन केले. युनिकोडात टंकन करताना गीताई हा ग्रंथ कॉपीराईटेड आहे आणि आपली ही मेहनत वगळली जाऊ शकते हे सदगृहस्थांनी लक्षात घेतले नसावे. त्यांनी टंकन केले त्या काळात मूळस्वरूपातील ग्रंथ जतन करावयाचा विकिस्रोत प्रकल्प नव्हता.

मल्हार महुडे

लेखक शरद यांनी शनिवार, 12/04/2014 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
नाम्या आज निवांत बसला होता. काही दिवसांपूर्वी त्याची उठल्यापासूनच धावपळ चालू व्हावयाची. केव्हा सर्व आवरतो व देवळात विठूला भेटावयास जातो असे व्हावयाचे. त्याला डोळे भरून पहात बसावयाचे, त्याच्याशी घटकाघटका गुज बोलत बसावयाचे, वेळ कसा जायचा, कळतच नसे. घरची थोडी चरफड करावयाची, पण त्याची आता सवय झाली होती. देवळांत येणार्‍या लहानथोर भक्त मंडळीत वट वाढला होता. हा तर "देवाशी प्रत्यक्ष बोलणारा," मग येणारा जाणारा पायी लागत होता. मनातून सुखावत नाम्या त्यांना आशिर्वाद देत होता. एक दिवस आळंदीहून चार भावंडे आली. भावांनी चरणस्पर्श करून नमस्कार केला.