Skip to main content

वाङ्मय

वसंत पंचमी - एक आनंदोत्सव

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 25/01/2015 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
काल वसंत पंचमी होती, सकाळी गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने सुर्वर्ण गालिचाच पांघरलेला आहे. ते अद्भुतरम्य, अस्मरणीय दृश्य पाहून रात्रभर थंडीने कुडकुडनार्या प्रवासींचे चेहरे ही आनंदाने उजळून निघाले.

मुसाफीर

लेखक यमन यांनी गुरुवार, 15/01/2015 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी "मुसाफीर "वाचायला मिळालं . परत एकदा गोडबोले सरांची "range "बघून अवाकलो . त्यांचं प्रत्येक पुस्तक मराठी माणसाला घडवतंय . त्यांना आणि त्यांच्या व्यासंगाला आपला कुर्निसात . किमयागार , अर्थात ,बोर्डरूम ,मनात, मुसाफिर हि पुस्तकं प्रत्येक मराठी घरातल्या कुंकवाच्या करंड्या इतकीच महत्वाची आहेत . आधी "बालकांड" आणि आता "मुसाफीर "एकूणच "मनुवादी "(म्हणजे आडनावाने "मनुवादी"… विचारांनी नाही म्हणत मी)आत्माचारीत्रांना बरे दिवस आलेत असं दिसतंय . एवढ्या सगळ्या गोष्टी शिकताना ,अनुभवताना वेळ कसा मिळतो ? हे मला खरोखरच इंजिनीरिंग च्या कित्येक विषयान सारखं अनाकलनीय आहे .

देव तिळीं आला

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 14/01/2015 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सण साजरे करतो ते केव्हा? सण विशीष्ठ दिवशी साजरे केले जातात. त्याचा संबंध कालगणनेशी आहे. वर्षाची सुरवात चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढी पाडवा, फाल्गुन पौर्णिमेला होळी, आश्विन शुद्ध दशमीला दसरा, आश्विन अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. पण संतांच्या घरचे सण काही वेगळेच आहेत. तुकाराम महाराज म्हणतात दसरा दिवाळी तोचि माझा सण । सखे हरिजन भेटतील ॥ सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण.

उड उड रे

लेखक शरद यांनी बुधवार, 31/12/2014 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
उड उड रे, उड उड रे, म्हारा काला रे कागला माझ्या एका राजस्थानी मित्राच्या घरी गेलो असतांना त्याने एक राजस्थानी लोकगीत लावले होते. अस्सल ग्रामीण ढंगाचा ठेका वगेरेमुळे लक्ष वेधले गेले. भाषा माहित नसल्याने अर्थ कळेल असे वाटत नव्हते पण एकदम वाटावयास लागले की, "अरे, हे गाणे आपल्या परिचयाचे आहे," मित्राच्या मुलीला सांगितल्यावर तिने ते लिहून दिले व वाचल्यावर लगेच लक्षात आले कीं असे कां वाटत होते !

मराठी कविता

लेखक पुस्तकमित्र यांनी रविवार, 28/12/2014 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! थोड्याच शब्दात मोठा आशय सांगण्याची किमया फक्त कवितेत असते. मराठी भाषेला काव्याची अतिशय सुंदर परंपरा आहे. अमृतानुभव असू दे, तुकारामाची संतवाणी, अभंग पंत तंत काव्य ते केशवसुत, रे. टिळकांचा जमाना. त्या नंतरचा सावरकर, पुढे कुसुमाग्रज, बोरकर, बापट, विंदा, पाडगावकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे ते ढसाळ, नायगावकर, म्हात्रे, संदिप खरे अश्या अनेक प्रकारच्या कवींनी मराठी वाङमय समृध्द केलंय. त्यातल्या तुम्हाला आवडणार्‍या कविता कोणत्या ते या भागात सांगायचंय. जमलं तर का आवडली कविता हे पण. आणि हो, नुसतेच कवितेचे नाव न देता थोड्या ओळी लिहु शकलात तर उत्तम! चला तर मग काव्यास्वाद घेऊ या.

सारे तिचेच होते

लेखक शरद यांनी रविवार, 21/12/2014 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
उदंड रसिकता असलेल्या, जीवनावर रंगून जाऊन प्रेम करणार्‍या, एका साठीतल्या व्यक्तीच्या, आपण त्यांना रंगराव म्हणू , व त्यांच्या एका तरुण मित्राच्या गप्पागोष्टी चालल्या होत्या.

चुन्नी मियां आणि बकरा

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 13/12/2014 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
तीस -बत्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही जुन्या दिल्लीत नई बस्ती या भागात राहत होतो. शाळेला दसर्याच्या सुट्या सुरु होताच आम्ही भावंडे चुन्नी मियां केंव्हा आमच्या घरी येणार याची वाट पाहायचो. इंच टेप आणि घेतलेली मापे लिहिण्यासाठी एक जुनी फाटलेली वही घेऊन चुन्नी मियां घरी आले कि आमच्या आनंदाला उधाण येत असे. कारण वर्षातून एकदाच दिवाळी साठी नवीन कपडे मिळणार. शिवण्यासाठी कापड ते स्वत:च आणायचे, त्या मुळे कपडे शिवून आल्यावर, चुन्नी मियां यांनी शिवलेले कपडे घालणारे पोरें दुरूनच ओळखता येत होती. सर्वांचे कपडे एक सारखेच.

निमंत्रण- पुण्यातल्या एका पुस्तक प्रकाशनाचे

लेखक खेडूत यांनी बुधवार, 10/12/2014 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शाळेत जावं. पाचवीच्या पुढील हाताला लागेल त्या पोराला विचारावं, ‘'भीती वाटते असा तुझ्या अभ्यासातला विषय कुठला?'' समोरून ‘गणित’ असं उत्तर आलं नाही तर आपल्याला त्या पोराचीच भीती वाटू लागेल ! गणित-भूमिती सारख्या ‘डेंजर’ विषयांनी आपलं कोवळं बालजीवन किती खडतर केलं होतं, हे प्रत्येकाने आठवून पाहावं ! ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ म्हणतात त्याप्रमाणे आम्ही गणित-भूमिती विषयांना घाबरून त्यापासून दूर पळत राहिलो. गावाकडच्या विद्यार्थ्याना जणू विज्ञान -इंग्रजी व गणित म्हणजे पारंपारिक शत्रूच वाटत.

कवितेचे रसग्रहण..... एक आनंदोत्सव

लेखक शरद यांनी रविवार, 07/12/2014 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे रसग्रहण.. एक आनंदोत्सव संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे अपूर्व:कोsपि कोषोsयं विद्यते तव भारती ! व्ययतो वृद्धीमायाति क्षयमायाति संचयात् ! विद्या वाटल्याने वाढते व स्वत:पाशीच साठवून ठेवली तर कमी होते. पण विद्याच कां ? आनंदाचेही तसेच आहे. एखादी कविता वाचल्यावर मला जर आनंद झाला तर मला वाटते हा आनंद माझ्या मित्रांनाही मिळाला पाहिजे. कवितेतून मला आनंद कसा मिळाला ते सांगावयास कविता व तिचे रसग्रहण. मिपावर कविता-रसग्रहणाला चांगले दिवस येत आहेत असे दिसते. श्री.आदित यांनी पहिल्यांदीच लिहून चांगली सुरवात केली. असेच आणखी लेखक मिळाले तर हे दालन समृद्ध होईल.