Skip to main content

वाङ्मय

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ३

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 10/02/2014 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 ३) मै जानता हू के तू गैर है मगर यूही आठव्या इयत्तेत तुकड्यांची सरमिसळ होवून नवीन तुकड्या बनल्यावर अपर्णा आणि अजित एका वर्गात आलेत. वर्गातील अनेक मुली अजितसाठी नवीन होत्या. मुलींबद्दल खूप आकर्षण वाटावं असंच ते वय होतं. अजितला सुध्दा काही सुंदर मुली आवडू लागल्या. पण हळूहळू इतर मुलींचा विसर पडून फक्त अपर्णाच आवडू लागली. ती सर्वात सुंदर नक्कीच नव्हती. पण आकर्षक होती.

विचित्रवीर्याची चित्र-विचित्र कहाणी (महाभारत भाग-३)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 08/02/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
विचित्रवीर्याची विचित्र कहाणी . चित्र १: विचित्रवीर्याची विचित्र मिरवणूक (चित्रकार: जेम्स गुर्ने) यापूर्वीची कथा: कुणी घडवून आणले 'महाभारत'? (भाग १) मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) मदनकेतु उवाच: मुनिवर, तुम्ही शांतनुच्या मुलांची नावे ‘चित्रांगद’ आणि ‘ चित्रवीर्य’ होती म्हणून सांगितलेत, परंतु मी तर ‘विचित्रवीर्य’ असे नाव ऐकत आलेलो आहे? नारदमुनी उवाच: अरे, ती तर एक मोठी कथाच आहे.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 05/02/2014 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता.

संत मीराबाईची विराणी

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 03/02/2014 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाते जोडले नामाशी, कधीच मी तोडणार नाही|| पिवळ्या पानावानी दिसे मी जरी, नसे हा पंडूरोग| चोरून करीते उपवास, देईल रामभेटीचे योग|| पकडून माझी भुजा, वडिलांनी वैद्य बोलवला | कळे ना त्या मुर्खाला, हृदयात माझ्या पीळ पडलेला|| जावो वैद्य आपुल्या घरी, माझे नाव काढू नको| विरहाने जळालेली मी अशी, औषध मला देऊ नको|| अंगावरील मांस उतरले, उरला हाडांचा सापळा| बोटाच्या अंगठीत घुसेल, झाला बारीक दंड आगळा|| राहून राहून पापी कोकीळ, समोर प्रियाचे नाव आळवतो| विरहात सांभाळते स्वःताला, प्रियासाठी जीव जाळवतो||
काव्यरस
Taxonomy upgrade extras

फेब्रुवारी महिना, मराठीची लेणी, ज्ञानकोश आणि ज्ञानकोशकर्ते

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 31/01/2014 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी महिना येतो, तोच मुळी मराठी भाषेच्या मुकूटातील काही महत्वपूर्ण क्षणांचे आणि हिर्‍यांचे स्मरण देत. ६ फेब्रुवारी (१९३३) अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपट प्रदर्शित झाला. आणि त्याच वर्षी ९ फेब्रुवारीला सानेगुरुजींनी श्यामची आईचे लेखन चालू केले.

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

काय..? कुठे..? कधी..? (पुणे)

लेखक मोदक यांनी बुधवार, 22/01/2014 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
काय..? कुठे..? कधी..? (पुणे) अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर..

संक्रांति ऋतू परिवर्तन

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 18/01/2014 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक: १८.१.२०१४. संक्रांति दरवर्षी जनवरीच्या १४ किंवा १५ तारखेला येते. त्या पूर्वी दिल्लीच्या कुडकुडत्या हिवाळ्यात माणूस काय लेखणी ही जमून जाते. जवळपास महिन्याभरा पासून बिछ्यान्यात दडून बसलो होतो.संक्रांति पासून मोठा होणारा दिवस जाणवू लागतो. सकाळी थंड वर आणि दुपारी सूर्याच्या उन्हात थोडी उष्णता जाणवते. पर्वतांवर बर्फ वितळू लागते. उत्तरेकडून येणारे वारे सुरु होतात ते शिवरात्री पर्यंत ४० दिवस राहतात याला ‘चिल्ला जाडा’असे म्हणतात. धुक्याचा परदा दूर होतो. शेतांत सरसोंला(मोहरी) फुले येतात. दूरपर्यंत पिवळा गालीचा पसरलेला सहज दिसतो.

हजार चुराशीर मा – महाश्वेतादेवी (अनु. अरुणा जुवेकर)

लेखक Atul Thakur यांनी रविवार, 12/01/2014 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
एखादे तत्वज्ञान आपल्याला पटत नसल्यास त्यावर आधारीत कलाकृतीचा आस्वाद घेता येतो काय? ते पटत असल्यास त्याचा आस्वाद जास्त चांगल्या तर्‍हेने घेता येईल काय? हा प्रश्न मला सुरुवातीला “हाजार चुराशीर मा” पुस्तक वाचण्याआधी पडला होता. मात्र महाश्वेतादेवींचे हे पुस्तक हाती पडल्यावर हे सारे प्रश्न विरुन गेले आणि एक अतिशय सुंदर पुस्तक वाचल्याची अनुभुती मिळाली. मला मिळालेले पुस्तक अनुवादीत होते मात्र त्याने फार काही फरक पडला असे वाटले नाही. अनुवाद केलेल्या अरुणा जुवेकर यांचा प्रत्यक्ष परिचय असल्याने आणि त्यांचा बंगाली भाषेचा प्रदीर्घ व्यासंग माहित असल्याने अनुवाद उत्तम असणारच याची खात्री होती.

साहित्यिक ख़ज़ीना

लेखक शुचि यांनी मंगळवार, 07/01/2014 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला. http://www.belvalkarhousing.com/ या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे. लहानपणी चिवड़ा लाडूचे बोकाणे भरत भरत वाचलेले साहित्य परत वाचावयास मिळते आहे. पुनर्वाचनाचा अत्यंत उच्च आनंद अनुभविण्यास मिळत आहे.