जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा आपल्याला माहिती देखिल नसते की त्याला बनवताना किती जणांचे हात लागले आहेत.
सर्व प्रथम मान जातो तो बळीराजाला.महाराष्ट्रात कापसाचे पीक विदर्भ, मराठवाडा, खानदेश व माणदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे खरीपाचे पीक असून त्याची पेरणी जून -जुलै मध्ये केली जाते. साधारण ९० दिवसात पहिली
वेचणी होवून, पुढे ३-४ महिने क्रमाक्रमाने वेचण्या होतात. परदेशात यंत्रांच्या साहाय्याने वेचणी केली जाते. परंतु यंत्रवेचणी पेक्षा हातवेचणीचा कापूस जास्त स्वच्छ असतो, यांत्रिक वेचणीच्या कापसातजास्तट्रॅश(कचरा)असतो.