Skip to main content

तंत्र

कॅमेरा कोणता खरेदी करायचा ?कॉम्पॅक्ट की एस एल आर ?

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 02/05/2012 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला प्रकाशलेखनाची उर्फ फोटोग्राफीची उर्फ छायाचित्रणाची आवड बहुतेकाना असते. त्यापासून मिळणार्‍या फोटोच्या गुणवत्तेची प्रत्येकाची अपेक्षाही वेगवेगळी असते व या छंदावर पैसा तरी किती उधळावा याचीही प्रत्येकाची तयारी वेगवेगळी असते. बाजारात फक्त ४ एक्स च्या डिजिटल झूमपासून ते ४२ एक्स च्या ऑप्टीकल झूमपर्यंत आवाका असलेले कॅमेरे विकत मिळतात. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारचे कॅमेरे मिळतात . ते प्रकार म्हणजे १) कॉम्पॅक्ट कॅमेरे २) एस एल आर उर्फ सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरे .

'क्लाउड कंप्युटिंग' - म्हणजे काय रे भाऊ ?

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 26/04/2012 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
ढग किंवा क्लाउड ह्याला कवींनी, 'काळा काळा पिंजलेला कापूस' असे आपल्याला लहानपणीच समजावलेले असते. तरूणपणी दादा कोंडक्यांनी 'ढगाला कळ लागल्यावर काय होते' ते समजावून सांगितले. तर अंडरवर्ल्डवाल्यांनी गेम केल्यावर माणूस 'ढगात' जातो हे समजावून सांगितले. इतके, इतक्या जणांनी ढगाबद्दल समजावले तरीही 'क्लाउड' कंप्युटिंग ही काय भानगड आहे हा प्रश्न पडतोच. :) संगणक विश्वात झालेली क्रांती ही, 'संपुर्ण जगासाठी चार संगणक खुप झाले' असे म्हणणार्‍या IBM च्या एके काळच्या सिनीयर मॅनेजमेंटच्या मतापासून सुरू होऊन आज ती 'क्लाउड कंप्युटिंग'पाशी येऊन पोहोचली आहे.

जंगल घडवणारा माणूस: जादव पायेंग

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी रविवार, 22/04/2012 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल! परमेश्वराने अगदी मुक्तहस्ताने सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं! जंगल म्हटलं की वाघोबाच्या डरकाळीपासुन ते टारझनच्या आरोळीपर्यंतच्या आठवणी मनात घर न करतील तरच नवल. अवघ्या जीवसृष्टीला आकार देणा-या या जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्यासाठीचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपण जंगालाचंही काहीतरी देणं लागतो हे मात्र आपण सामान्य माणसं सोयिस्करपणे विसरतो. जादव पायेंग मात्र विसरभोळा नाही. सोयिस्करपणे विसरणे तर त्याच्या गावीही नाही.

प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक आणि विस्तव वल्ल्यायण - एक परिचय

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 20/04/2012 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
कांदा संस्थान - भारताची अग्नि ५ ही चाचणी यशस्वी होणार याचे भाकित तीन महिन्यांपूर्वीच मी केले होते असे जाहीर करून प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक यांनी संस्थानात खळबळ माजवलेली आहे. प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा हा वृत्तांत. "माझ्याकडे इमेल्स आहेत. आमच्या मित्रांना पाठवलेल्या." पुरावा म्हणून हातातले प्रिंटाउट फडफडवत प्रा. डॉ. श्री. चं. पी. कर्तक म्हणाले. "त्यात मी स्पष्टपणे लिहिलंय" आपला चष्मा लावत ते वाचायला लागले. 'मग, विस्तव पेटणार का पाच?' "हे माझ्या मित्राने विचारलेलं आहे.

डुप्लिकेट आयडी : एक मार्गदर्शन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 19/04/2012 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमर :- १) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही. २) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही. मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्‍याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले.

आय आय टी रामैय्या

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी मंगळवार, 17/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
पंचवीस-सव्वीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे आपल्या जवळच्याच आंध्रप्रदेशातली. तेलंगणातल्या विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना गणित शिकवत आयुष्य घालवलेला चुक्का रामैय्या नावाचा एक हाडाचा शिक्षक होता. शिक्षकी पेशा एक व्रत म्हणुन स्विकारण्यापुर्वी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेला, गांधींजींच्या सत्याग्रह आंदोलनात तुरूंगवास भोगलेला एक देशभक्त! वारंगळमधल्या आपल्या गुडुर या मुळगावी अस्पृश्यता विरोधी चळवळ चालवून आपल्याच ब्राम्हण समाजातून वाळीत टाकल्या गेलेला एक पुरोगामी विचाराचा माणुस.

भस्सकन् ..

लेखक अन्नू यांनी गुरुवार, 12/04/2012 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला... कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार.. कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या... पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज.. कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा.. काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही... मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती... मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!