कताई शास्त्र ७

लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राचीन व मध्ययुगीन काळात कताई हा एक कुटिरोद्योग होता. कापूस उत्पादक शेतकरी, लोकर उत्पादक धनगर, स्वतः सूत कातत्,व विणकर कोष्ट्यांना देत. विणकर त्यांचे कापड विणून परत देत. हा सर्व व्यवहार बलुत्यावर चाले.त्या काळी कताई तकली वर चाले,व सायंकाळी घरोघरी हा उद्योग चाले. महात्मा गांधींना अशा प्रकारची स्वयंपूर्ण खेडी अभिप्रेत होती. त्या मुळे, एकाच यांत्रिक कारखान्यात कापड बनवून विकणे त्यांच्या कल्पनेत बसत नव्हते.

कताई शास्त्र ६

लेखनविषय:
लेखनप्रकार
. कापूस एक नैसर्गिक वनस्पतीज तंतू असुन त्याचे वातानुकुलन व शोषकता हे गुणधर्म इतर कोणत्याही तंतूंना नाहीत. कापसाच्या पेशीत ८०-९०% सेल्युलोज, ८-९% पाणी,व उरलेले प्रथिन्,वॅक्स असते.कापसाचा तंतूचा क्रॉस सेक्शन एखाद्या पाईप प्रमाणे दिसतो. समजा त्या पाईपच्या भिंतींची जाडी (wall thickness) जास्त (म्हणजेच जर आतिल पोकळ भाग कमी असेल) तर तो परिपक्व(mature) व कमी असेल तर अपरिपक्व(immature) आहे असे समजतात. परिपक्व कापसाचे बल, लकाकी जास्त असते व पुढील प्रक्रियांमध्ये सुरळीत चालते.

कताई शास्त्र ५

लेखनविषय:
लेखनप्रकार
वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात आपला भारत प्राचिन काळापासून अग्रेसर आहे. कोंकणातील बंदरे इसवीसन पुर्व व इसवीसनोत्तर प्राचिन काळात कापडाच्या मध्य पुर्व तसेच युरोपीय देशाशी व्यापारामुळे संपन्न झाली होती. मध्य युगात भारतीय कापडाच्या आयातीसाठी युरोपीय देशांनी इस्ट ईंडिया कंपन्यांसारख्या संस्था ही काढल्या होत्या. औद्योगिक क्रांती नंतर मात्र चित्र बदलले. भारतातून मँचेस्टरसाठी कच्चा माल (कापूस) निर्यात होवू लागला. तयार कापडास भारतासारखी हुकुमी बाजारपेठ मिळाली. मँचेस्टर संपन्न झाले,व एतद्देशीय कारागिर बेकार ,निर्धन झाले.कपाशीच्या लागवडीस प्रोत्साहन दिले गेले.

कताई शास्त्र ४

लेखनविषय:
लेखनप्रकार
जिनिंग मध्ये कापसाच्या बोंडातील सरकी तंतुंपासून विलग केली जाते. साधारणपणे १०० किलो कपाशी मध्ये ६६ किलो सरकी व ३३ किलो रुई मिळते. १ टक्का घट असते. सरकीचा वापर तेल व पशुखाद्य निर्मितीसाठी होतो. . भारतात नाईफ रोलर जीन जास्त प्रचलित आहे. यामध्ये कापसाच्या तंतूंची खराबी ( fibre rupture) कमी होते. कापसाला घनता कमी असल्याने त्याचे आकारमान जास्त असते.

कताई शास्त्र ३

लेखनविषय:
लेखनप्रकार
जेव्हा आपण कपडे वापरतो तेव्हा आपल्याला माहिती देखिल नसते की त्याला बनवताना किती जणांचे हात लागले आहेत. सर्व प्रथम मान जातो तो बळीराजाला.महाराष्ट्रात कापसाचे पीक विदर्भ, मराठवाडा, खानदेश व माणदेशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कापूस हे खरीपाचे पीक असून त्याची पेरणी जून -जुलै मध्ये केली जाते. साधारण ९० दिवसात पहिली वेचणी होवून, पुढे ३-४ महिने क्रमाक्रमाने वेचण्या होतात. परदेशात यंत्रांच्या साहाय्याने वेचणी केली जाते. परंतु यंत्रवेचणी पेक्षा हातवेचणीचा कापूस जास्त स्वच्छ असतो, यांत्रिक वेचणीच्या कापसातजास्तट्रॅश(कचरा)असतो.

कताई शास्त्र २

लेखनविषय:
लेखनप्रकार
सुताचे परत ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. १) तंतूंना पीळ देऊन केलेले सूत ( स्पन यार्न) , २) सलग तंतू ( फिलॅमेंट यार्न) यातील स्पन यार्न जास्त प्रचलित आहे, कारण छोट्या छोट्या तंतूंना दिलेल्या पिळात हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे परिधान करणाऱ्यास सुखद वाटते. कापसापासून निर्मित वस्त्रे देशात तसेच विदेशात जास्त लोकप्रिय आहेत कारण कापसाप्रमाणे गुणधर्म असलेला कोणताही तंतू किंवा कापसाला अद्याप पर्याय मिळालेला नाही. त्यामुळेच कापसाला वस्त्रांचा राजा (King of Textiles) असे संबोधले जाते. आपण मुख्यत्वे कापसाच्या कताईची माहिती घेऊ. सूत निर्मितीत कापसाच्या प्रतीचा सिंहाचा म्हणजे जवळजवळ ८०% वाटा असतो.

कताई शास्त्र १

लेखनविषय:
लेखनप्रकार
अन्न ,कपडा, व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पैकी अन्ननिर्मिती ( कृषी तंत्रज्ञान), व गृह अभियांत्रिकी वर बरीच माहिती मराठीत उपलब्ध आहे . परंतु वस्त्रनिर्मिती शास्त्राबद्दल तितकीशी उपलब्ध नाही.

एक साधन - दोन कलाकार - भाग १

दोन वेगवेगळे कलाकार एकाच साधनाचा वापर करुन जेंव्हा कलाकृतींचं निर्माण करतात तेंव्हा माझ्यासारख्या कलेच्या क्षेत्रात अघोर अज्ञानी माणसाचे डोळे दिपुन जातात, अशाच डोळे दिपवणा-या दोन कलाभांडारांना भेट देण्याचा योग गेल्या महिन्यात आला, अतिपरिचयात अवज्ञा होउ नये म्हणुन थोड्या उशीरानं त्या कलाभांडारात काढलेली छायाचित्रं इथं प्रदर्शित करतो आहे. तांत्रिक किंवा इतर माहिती फार नाही, पण पुर्वी गविंबरोबर झालेल्या चर्चेनुसार जाणं येणं आणि खाणं याची माहिती शेवटी दिलेली आहे.

कस्सा राव थांबू...

काव्यरस
प्रेरणा >>> कुणाची...ती काय सांगायला हवी...? ;) http://www.misalpav.com/node/22626 कस्सा राव थांबू,कित्ती मी थांबू आतून प्रेशर येतय आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! मधेच घुसुनी दांडी गुल बाहेर माला प्रेशर फुल्ल टुरटुरण्याचा अन् डबड्याचा मंजुळ आतुन येइ अवाज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! जरी थांबलो 'दाबुन' नीट आतल्या आत,तरी पडते पीठ पिळ-वटलेली अतडी अशी ही लवकर ये रे...कित्ती हा माज ताडी कच्ची मारुन आलोय आज...! ''जाऊ दिलं...'', नी फसलो मी तू आत मेल्या शिगरेटी पी...! पेपर वाचायची एकच जागा कशी विसरू मी शिकलो आज ताडी कच्ची मारुन आलोय आज...!

Samsung विरुद्ध Apple

लेखनप्रकार
नमस्कार मिपा करहो. बरेच वर्ष मी मिपा वर वाचनीय होतो. पण आज न राहावून.. निमित्त काढून लिहिता झालो.
Subscribe to तंत्र