आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अॅप्स)
आजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण "तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले? " या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का?!
मिसळपाव
उद्या २३ एप्रिल अर्थात जागतिक पुस्तक दिन. या निमित्ताने मराठी ईपुस्तक प्रकाशक शैलेश खडतरे यांच्याशी मी (कौशिक लेले) संवाद साधला.