Skip to main content

संस्कृती

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 06/12/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या.

निखळ विनोदाचा तारा निखळला

लेखक नाखु यांनी मंगळवार, 02/12/2014 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या संयत अभिनयाने व नर्मविनोदी भूमिकांनी परिचित "देवेन वर्मा" यांचे आज निधन झाले. त्यांना विनम्र आदरांजली. आजच्या ओढून-ताणून विनोदाच्या पार्श्वभूमीवर निखळ विनोदवीरांचे महत्व ठळकपणे समोर येते. त्यांच्याबद्दल आपल्या काही आठवणी (आवडत्या भूमिका/चित्रपट माहीती असल्यास) या आदरांजलीत समावेश करावी ही विनंती. मला त्यांचा "अंदाज अपना अपना" मधील छोटासा रोल पण लक्षवेधी अभिनय आवडला होता.

जमला मेळा संतसज्जनांचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/11/2014 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
जमला मेळा संतसज्जनांचा जमला मेळा संतसज्जनांचा पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू|| हाती घेवूनीया विणा आणि टाळ भजनात विसरती काळवेळ हरपली तहानभुक हरपले देहभान जमला मेळा...||1|| नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी माऊलीच्या घरी आलो माहेराला जमला मेळा... ||2|| विठूरायाचे सावळे मुख पाहूनिया झाले सर्वसुख ओलांडला पर्वत यातनांचा जमला मेळा...||3|| - पाषाणभेद

आम्ही अस्पृश्याची पोरे

लेखक देवदत्त परुळेकर यांनी गुरुवार, 20/11/2014 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
विठ्ठलाचा पुत्र रुक्मिणीचा बाळ संन्याशाचे पोर म्हणूनी अस्पृश्य   नका दे‌ऊ अन्न नका दे‌ऊ पाणी नका दे‌ऊ थारा पहा हा अस्पृश्य   सावली पडता दूर हो म्हणती शिव्या शाप देती म्हणती अस्पृश्य   दुषणे ठेविली भिक्षा नाही दिली मुंज नाही केली ठेविले अस्पृश्य   ज्ञानराज श्रेष्ठ भक्तराज श्रेष्ठ योगीराज श्रेष्ठ परि तो अस्पृश्य?   गीता उपदेशी बोले ज्ञानदेवी ज्ञान करी मुक्त परि तो अस्पृश्य?   विठोबाचा प्राण विसोबाचा गुरू नामयाचा बाप परि तो अस्पृश्य?   जनीची साजणी दीनांची मा‌उली संतांची सा‌उली तरी ती अस्पृश्य?
काव्यरस

कन्फ्यूजन /कम्युनिकेशन/कन्व्हिक्शन

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 18/11/2014 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, बर्‍याच दिवसाने मिसळ्पाव वर लिहितोय.. आणि सांगायची गोष्टही तशीच आहे.. साधारण ६ वर्षापुर्वी हा प्रवास सुरु झाला, आधी कोल्हापुरी दादा या टोपणनावाने आणि मग स्वतःच्या नावाने इथे लिहु लागलो. अनेकदा बालिश आणि क्वचित बरे असे त्या लिखाणाचे स्वरुप होते. पण या कालावधीत बर्‍याच मिपाकरांनी मला मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले. कित्येकदा चेष्टाही केली, पण या सार्‍यातुन खुप काही शिकायला मिळाले. महत्वाचे म्हणजे लिखाणाची उर्मी कायम राहिली. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आता हा माझ्या लिहिण्याचा प्रवास एका महत्वाच्या टप्प्यावर आलेला आहे .

भगवद गीतेतील ११४ वा श्लोक; श्रद्धा आणि अंधश्रद्धेचे महात्म्य

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 14/11/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या पाल्याच्या शाळेत अलिकडे परि़क्षेचे का कशाचे फॉर्म भरून घेताना विद्यार्थ्यांनी आपले वय वर्षे बरोबर काऊंट करावेत म्हणून एक छान शक्कल लढवली, भगवद गीतेचा श्लोकांमधील ११४ वा श्लोक कसा जादुई आहे पहा, ११४ मधून तुम्ही तुमच्या जन्मवर्षाची शेवटचे दोन आकडे मायनस केले की तुमचे वय वर्षे अचूक कॅल्क्यूलेट करता येतात. हा भगवद गीतेचा प्रसार केलेल्या वर्गातील विद्यार्थी, इ.स. २००० पुर्वीच जन्मलेले असणार होते. बर्‍याच विद्यार्थी विद्यार्थीनींनी आपली आपल्या आई वडलांची मित्र मैत्रिणींची वय वर्षे मोजून पाहिली आणि चकीत झाली.

ऐका सत्य नारायणाssssची कथा!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 14/11/2014 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी पार्श्वभूमी.... मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही.

वॉरेन अँडरसनचा मृत्यू आणि आमेरीकेची रासायनीक गोपनीयता

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 13/11/2014 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
भोपाळ गॅस दुर्घटनेची (कदाचित) जबाबदारी असू शकणार्‍या वॉरेन अँडरसनला भारतीय आणि आमेरिकी राजकीय वरदहस्तामुळे न्यायालयापुढे उभे टाकावे लागले नाही. अखेर २९ सप्टे २०१४ ला त्याला काळानेच वर नेले. त्याच्या मृत्यूची बातमीही काही आठवडे लपवून मग दिली गेली. आम्ही आजकालचे पांढरपेशे भौतीक प्रगतीच्या मीठाला एवढे जागतो की कशाचेच काही वाटत नाही. न्यायालयापुढे त्या माणसाने उभ टाकण्याची गरज नाही हे आमेरीकन लोकांपेक्षा भारतीय लोकांनाच अधीक पटलेल असतं. अर्थात अमेरीकन लोक फक्त परकीयांशीच असे वागतो समजून वागतात पण इतरांसाठी खोदलेले स्वतःसाठीच कामाला येते असे काहीसे आमेरीकेचे झाले.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- १७ (मंगलाष्टक स्पेशल)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 07/11/2014 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग-१६ आणि वधू एकदा श्टेजवर येऊन वरासमोरच्या पाटावर उभी राहिली,की मग सुरु होतो एक अत्यंत गंभीर (आणि तेव्हढाच इनोदी Biggrin ) असा कार्यक्रम.... तो म्हणजे मंगलाष्टकांचा! पुढे चालू... ================= खरं म्हणजे,विवाहसंस्कारातला मंगलाष्टकांचा कार्यक्रम,हा परंपरेप्रमाणे किंचितसा प्रसन्नतेचा पण त्याहून जास्त गंभीर स्वभावाचा असा आजही गृहीत धरला जातो. म्हणजे या जागी अगदीच विनोद होत नाहीत,असं नाहीये. पण विनोद होत असले/नसले तरी मुद्दाम कोणी मुलि'कडच्यांकडे आज हे रडतायत कि नै?