Skip to main content

संस्कृती

तेलणीशी रुसला वेडा - मानवी स्वभावाची सामुहीक असहकार चळवळ

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 04/11/2014 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
'अहं' बद्दल पुढेचर्चा करण्यापुर्वी या विषयावर बरच मंथन चिंतन करूनही मला स्वतःला याबाबत खुपसे सुधारता आलेले नाही ही माझी स्वतःची मर्यादा सुरवातीसच स्विकारून, समुहाचा घटक म्हणून मानवी समुह ते समुह सहसंबंधातील रुसवा फुगवा अभ्यासण्याच्या दृष्टीने काही लिहावे हा मनात विचार असतानाच संत तुकाराम महाराजांची खालील गाथा वाचनात आली.
तेलणीशी रुसला वेडा | रागेँ कोरडें खातो भिडा || 1 || आपुले चित्त आपण पाही | संकोच तो न धरी कांही || 2 || -संत तुकाराम (गाथा क्र.

काही प्रसंग

लेखक सुज्ञ यांनी बुधवार, 29/10/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रसंग. वेळ: तुमच्या मनात येईल ती … स्थळ: तुम्हाला वाटते तेच. प्रसंग पहिला सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात. एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं.

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

लेखक खोंड यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
"५ कटिंग दे रे…. " माझ्या कडून ऑर्डर गेली … "जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं … दोघे सिगरेटी घेऊन आले…. "च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता "काय झालं रे " मी सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला सगळे सावंत कडे डोळे लाऊन "सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … " "अर्रर्र ….

पुणेरी.......

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 18/10/2014 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी????????????? ह्ये काय म्हणायचं हो आता तुमचं नविन??? नेहेमीचं पुणं..पुणं..नावाचं नवं रडगाणं? कि बघा आमच्या पुण्याचं हे ठिकाण...म्हणून वाजवलेलं पिपाणं? की आणखि काही? तर नाही बरं का तसलं काही. पुणेरी हे आमच्या पुण्याच्या आत्म्यात वसलेलं एक छोटेखानी सूखं होतं. आणि होतं म्हणायचं म्हणजे अता त्याला बंद होऊन चार वर्ष झाली. तुंम्ही म्हणाल कित्ती छळ करताय आढे आणि वेढे घेऊन..? सांगा कि लवकर काय ते!? तर सगळं कळायला जरा तुंम्हाला माझ्या वेदपाठशालिन(किंवा कालिन!) जीवनात घेऊन जातो. (आलं कि नै ..पहिलं पुणेरी श्टाइलचं वाक्य!

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/10/2014 01:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग-१५ आणि श्टेजवरून खर्‍या अर्थानी एक्झिट होतात... पुढे चालू... =========================== मग सुरु होतो एक छोटा खेळ..सूनमुखाचा.पण हा ही तयार-झालेला एक विधी आहे. हल्ली एक भलामोठ्ठा आरसा(मंगल-कार्यालयातूनच!) दिला जातो. मग सासूबाई अगदी हौसेनी त्यात आपल्यासह मुलाचा सुनेचा चेहेरा बघतात.फोटुवाले त्यांच्या मागनं खास कलात्मक फोटु घेतात.

छायाचित्रणकलेची १७५ वर्षे: स्पर्धा क्रः३ ऋतु (Seasons) निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी मंगळवार, 14/10/2014 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! नेहमीप्रमाणेच तिसर्‍या स्पर्धेचा निकाल जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेला आधीच्या २ स्पर्धांपेक्षाही जास्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच आधीपेक्षा जास्त म्हणजे एकूण ४५ जणांनी आपली मते नोंदवली आहेत. यावेळीही एकाहून एक सरस चित्रे स्पर्धेत होती. आणि जवळपास सर्वांनाच कोणा ना कोणाची पसंती मिळाली आहे. तरीही आतापर्यंत तुम्हाला अंदाज आलाच असेल की प्रथम क्रमांकाचे चित्र कोणते असावे. बहुमताने क्र.

<लवंग>

लेखक अनुप ढेरे यांनी मंगळवार, 14/10/2014 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा माझाच आवाज सतत हरवतो तुझ्या दुकानी . . . कोसळणारे लाल धबधबे चारीठायी . . . झटणारा मी तांबुल-इच्छुक गर्दीमधला . . . सुपारी कातर चुना पानभर किमाम दरवळी . . . बंद करण्या लवंग टिचभर अडकवलेली . . . लाल भडक तृप्तीचे वैभव मन आनंदी.

अश्वत्थामा -3

लेखक निलरंजन यांनी रविवार, 12/10/2014 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मागील लेख इथे वाचा * अश्वत्थामा * अश्वत्थामा भाग-2 अश्वत्थामाच्या राज्यकारभाराबद्दल आणि त्याच्या विवाहाबद्दल महाभारतात कुठल्याही प्रकारचे भाष्य केलेले माझ्या वाचनात नाही द्रोणाचार्यांनी पांचाल राज्याचे तुकडे केल्याने द्रुपदाचा तिळपापड झाला आणि त्यातच त्यांनी द्रोणवधाचा प्रण केला आणि त्यासाठी केलेल्या यज्ञातून जन्म झाला पांचाली द्रौपदीचा आणि दृष्टिध्रुम्नचा... पांडव आणि कौरवांच्या शक्ती प्रदर्शनात मध्येच आलेल्या कर्णाला अर्जुनाशी युद्ध करण्याची इच्छा होती पण भीष्मांनी त्याला तुझ्यासारख्या सु

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 11/10/2014 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१४ हे वरती सर्व आलं. ते माझ्या भावविश्वातला गुरुजी आज बाहेर-आला म्हणून! पण एरवी आमची ही सप्तपदी म्हणजे ..विचारू नका...!!! ... पुढे चालू... =============== अगदी एक,दोन,तीन असे सावकाश गतीनी आकडे उच्चारले तरी सगळे मिळून एका मिनिटात पूर्ण होतात. तशी वधुला वराकडून झरं..झरं..झरं..झरं..चालवून एका मिनिटात शेवटच्या पावलाला आणावी लागते.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.