Skip to main content

संस्कृती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 12/02/2015 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग..यातल्या प्रेम आणि वात्सल्याच्या या आहुतीला.. सांगता कधिच नसते.असूही शकत नाही. कारण ज्या दिवशी ह्याची सांगता होइल..त्या दिवशी लौकिक अर्थानी हे जग संपलेलं असेल.! पुढे चालू.... ============================= तर असं हे आमचं प्रतिवार्षिक अनुष्ठान. आमच्या निरनिराळ्या गमती जमती, गुरुजिंचे आणि त्यांच्या आलेल्या मित्रांचे वादविवादांचे नाना प्रकार..धर्म अधर्माच्या चर्चा..आणि एखादा कार्यक्रम शिस्तबद्ध रितीने कसा करावा? याचं आंम्हाला एक प्रकारचं प्रशिक्षण.., असं सर्वकाहि देऊन संपायचं.

पाकीस्तानातील व्हॅलेंटाईन डे

लेखक माहितगार यांनी बुधवार, 11/02/2015 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नित्या प्रमाणे व्हॅलेंटाईन डे आपला का बाहेरचा वगैरे चर्चा रंगतीलच, विरोध आणि विरोधाच्या काट्या मधूनही गुलाब लाल रंगाची उधळण होत राहील. भारतात तर भारतात पण पाकीस्तान सारख्या इस्लामी देशांमध्ये सर्व कडक कायदे आणि अतीरेकी हाताशी असूनही व्हॅलेंटाईन डे संस्कृतीने बर्‍या पैकी आव्हान उभ केल आहे. सनातनी लोक हिजाब डे अथवा मॉडेस्टी डे म्हणून व्हॅलेंटाईन डे साजरा करू पहात आहेत. तर कुणी केवळ गझलांच्या कार्यक्रमांवर भागवतात पण मोटरसायकला बांधून लाल हृदयी फुग्यांच्या विक्रीचे फोटोग्राफ काही पाकीस्तानच्या तरुणाईच वेगळ चित्र उभे करतात.

त्या फुलांच्या गंधकोषी....सांग तू आहेस का?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/02/2015 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल पासून हे शब्द माझ्या मनाला अनंत यातना देत आहेत. अर्थ मी लावावा,तर अभिप्रेत अर्थ सुटून ..होणार्‍या अनर्थाचे भय. आणि तरिही लावला,तर मूलार्थाचे काय? याची चिंता! मला प्रतीत होणारा असा एक अर्थ आहेच..प्रतिबिंब म्हणून आलेला..! पण मूळ बिंबाचे काय मग??? ते कसे आहे??? तर कविने ते मानले आहे..मानवाच्या अज्ञेयवादाचे बीज असलेल्या परमेश्वरी स्वरूपात..! मानवाच्या अस्तित्वाचा (त्यानीच मानलेला..)काल्पनिक सहभागिदार:- परमेश्वर्,देव ,भगवंत,सखा ,सोबती,निर्मिक..सारे काहि! (मग मी म्हटलं.की आपण आज आधी "हे" पाहू! आणि आपल्या तडफडिचं बीज कशात आहे?

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.

वै. विष्णुबुवा जोग महाराज

लेखक देवदत्त परुळेकर यांनी बुधवार, 04/02/2015 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
विष्णुबुवा जोग महाराज यांची आज पुण्यतिथी (गुरुप्रतिपदा) त्यांना भावपूर्ण आदरांजली. ते नाशिकला रामकुंडावर स्नानासाठी गोदावरीमध्ये उभे राहिले. तीरावरील तीर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला - " पापोहं पापकर्माहं पापात्मा पापसंभव: ॥ बुवा एकदम त्याच्यावर खेकसले. "मी पापीही नाही, पापकर्मीही नाही ! दुसरे काय म्हणायचे असेल ते म्हणा, एवढा हा संकल्प उच्चाराल, तर खबरदार !" कोण होते हे बुवा ? या दुर्लभ संत पुरुषाला विष्णुबुवा जोग या नावाने ओळखतात.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 03/02/2015 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. सगळे आनंदानी ओरडायचे:- "अग्नि नारायण भगवान की...........................जय!" पुढे चालू... ============================ आणि मग ते घमेलं यजमान पत्नी कडून पूजन करून घेऊन, अग्निमुख नावाचा यज्ञपूर्व होमंसंस्कार सुरु झाल्यावर कुंडात मध्यभागी ओतल जायचं. बास्स! आणि एकदा का हा मेनपॉइंट ऑफ दि गेम नीट झाला,की मग..माझी आणि सुर्‍याची चक्र फिरायला सुरवात व्हायची. मग होमकुंडाभोवती सर्वत्र आसने लावणे. त्यां'समोर यज्ञाची हविर्द्रव्य (आहुतींचे पदार्थ) नीट लाऊन ठेवणे.

मराठी दिनानिमित्त लघुकथा स्पर्धा

लेखक संपादक मंडळ यांनी रविवार, 01/02/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
दि. २७ फेब्रुवारी मराठी दिन. मायमराठीच्या उत्सवाचा सोहळा यथोचित साजरा करण्यासाठी मिसळपावने दोन उपक्रम आयोजले आहेत. एक म्हणजे मिपावरील नामवंत लेखकांच्या सशक्त लेखणीतून ‘मराठी भाषेतील समृद्धीस्थळे’ सांगणारे बहारदार लेख. ..आणि दुसरा म्हणजे, लघुकथा-स्पर्धा. मराठी दिनानिमित्त, मिसळपाववरील हौशी लेखक आणि सदस्य यांच्यासाठी लघुकथा स्पर्धा जाहीर करत आहोत. या स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे राहतील. १. मिसळपाव सदस्यांनी आपल्या कथा, शीर्षक व ‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ या उप-शीर्षकाने आजपासून दि. २५ फेब्रुवारीपर्यंत मिसळपाववरील ‘जनातले-मनातले’ या दालनात स्वत:च प्रकाशित कराव्यात. २.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २७ (यज्ञयाग विशेष!)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 31/01/2015 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. शिवाय.. दरवर्षी एका माजी विद्यार्थ्याला अनुष्ठानाचं यजमानपद लाभत असे. आणि तो नुकताच विवाहित झालेला असेल..तर गुरुजि अगदी हमखास त्यालाच बसवणार्,हे ही ठरलेलं असे. पुढे चालू... ======================= आमचा अनुष्ठानाचा महिना कोणता? तर पौष. दरवर्षीचा अगदी ठरलेला. मग आंम्ही रानातून सदाशिव दादा बरोबर जाऊन लाकडं/फाटी/गाठी आणि येता जाता जेव्हढ्या म्हणून गोळा होतील तेव्हढ्या शेण्या समिधा असं अगदी १ महिना आधिपासून आणून गोठ्यामागे रचायला लागायचो.

कृष्णमयी मीरा !!!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 30/01/2015 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
संत ज्ञानेश्वरांपासून ते गाडगेबाबांपर्यंत आपल्याकडे अनेक संत महात्मे होवून गेले. या सगळ्यांनी मराठीतील भक्तीसाहित्य समृद्ध केलेले आहे. पण मराठी भाषेच्या पलिकडे जावुन जर पाहिले तर इतर भाषांतही त्या त्या प्रांतातील संत महात्म्यांनी प्रचंड साहित्य निर्मीती केलेली आहे. मग ते संत तुलसीदासांचे 'तुलसी रामायण' असो, सुरदासाचे काव्य असो, कबीर्-रहिमचे दोहे असोत वा मीरेची पदे असोत. या सगळ्यांनीच भारतीय भक्ती साहित्याला एका विलक्षण उंचीवर नेवुन ठेवलेले आहे. मला स्वतःला मात्र यापैकी संत कबीर आणि संत मीराबाई यांच्याबद्दल एक विलक्षण आकर्षण आहे.