Skip to main content

संस्कृती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 29/01/2015 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मग मी,गुरुजी आणि बाकिचे सर्व विद्यार्थी, तो परिक्षे आधीचा महिना-फुल्ल तयारी करून..परिक्षा द्यायला निघालो- ते महाराष्ट्राच्या एका महान शहरात...म्हणजे कुठे???? तर ................." पुढे चालू... ============================== म्हणजे कुठे???? तर होय हो!..तुमचे पुणे - "ते विद्येचे माहेरघर-पुणे !ते मंडईचे पुणे..ते गणपति मारुतिंचे पुणे!.. ते शनिवारवाडा आणि लालमहालाचे पुणे!" काय आहे ना? आमचा काका नेहमी म्हणायचा, "या पुण्याची तारिफ नाहि केली ना?

कबुतर जा जा जा

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 29/01/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या शनिवारी दिल्ली पब्लिक लायब्ररीत गेलो होतो. सहज म्हणून ऋग्वेदाचा एक खंड उचलला, काही पानें चाळली. एका सुक्तावर वर नजर पडली: वा: कपोत इषितो यदिच्छन् दूतो निऋर्त्या इदमाजगाम I तस्मा अर्चाम कृणवाम निष्कृतिं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे II शिव: कपोत इषितो नो अस्त्व नागा देवा: शकुनो गृहेषु I अग्निर्हि विप्रो जुषतां हविर्न: परि हेति: पक्षिणी नो वृणक्तु II (ऋ. १०/१६५/१-2) ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 27/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. गुरुजिंच्या या वागण्याचा पाठशाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर असा काहि जबरदस्त परिणाम घडलेला असायचा. कि तो विद्यार्थी कित्त्तीहि स्वच्छंदि वगैरे असला,तरीही...जर पड्लच काहि चुकिचं पाऊल,तर ते पडण्याआधी गुरुजिंचा चेहेरा त्याच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नसे! पुढे चालू... ============================== दिवसामागुनी दिवस चालले... ह्या गाण्यातील ओळींप्रमाणे त्यातला पुढचा जो भाग , तो जीवलगा..कधी रे येशील तू??? हा ही वेदपाठशाळेच्या-हरएक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातला समान धागा..

सरस्वती पूजन

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 26/01/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.

उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. विवेक पटाईत ह्यांच्या लेखात केवळ वसंतपंचमीचाच उल्लेख आहे. मात्र सुगी साजरी करण्याचे मार्ग अनेक आहेत! चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!

पोपटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 23/01/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/01/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे.. पुढे चालू... ======================================= पहिले सहा महिने संपले..दिवाळीची सुट्टीही झाली. आणि आंम्ही सर्व मुलं पळत पळत पाठशाळेत परत आलो. अगदी ठरल्या दिवशी! माझ्या घरून निघायच्या एक दोन दिवस अलिकडे तर.. आज्जीला, माझ्यावर शाळेतून कुणी चेटूक केलय की काय???

पालखी :: आजोळच्या गोष्टी - ४

लेखक गुळाचा गणपती यांनी सोमवार, 19/01/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजोळच्या गोष्टी - ८ सकाळची सी. एस. टी. फास्ट लोकल पकडून डोंबिवलीतून निघालो. तोच रोजच्या प्रवासी मंडळींचा भजनांचा आवाज सुरु झाला. मन लावून मी भजन ऐकले. खरा सांगायचं तर मला भजनाचे बोल ऐकूच येत नव्हते किंवा गाणारे, वाजवणारे लोकही दिसत नव्हते. ऐकू येत होता तो फक्त आवाज, जाणवत होता फक्त उत्साह, सभोतालचे पळणारे जग विसरून, ईश्वर स्मरणात हरवून थोडा वेळ का होईना स्वतःसाठी जगण्याचा एक मनापासून केलेला प्रयत्न. मृदुंगाच्या थापा ऐकून सैरभैर व्हायला झालं. टाळांच्या आवाजाने मन वेडं झालं, बावरं झालं आणि पोचलं थेट कृष्णेच्या काठाशी, उंबराच्या झाडाखाली आणि दत्तमाउलींच्या पायाशी.

क्रिसमसची रोषणाई

लेखक जुइ यांनी सोमवार, 19/01/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, जसे आपल्याकडे गौरी गणपतीची दुकानांमध्ये आणि घरोघरी धामधुम असते तशीच ईथे (म्हणजे अमेरिकेत) क्रिसमसची धामधुम असते. थॅकंसगिव्हिग डे झाला की क्रिसमच्या विविध सजावटीच्या वस्तू मॉल व दुकानांमध्ये दिसू लागतात. यामध्ये असतात क्रिसमस ट्रीज, कँडीज, रोषणाईच्या दिव्यांच्या माळा व लहान मुलांसाठी क्रिसमस व्हिलेज इत्यादी.