Skip to main content

संस्कृती

डेली सोप.... एक कथा वाचन -१

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 17/08/2016 05:03 या दिवशी प्रकाशित केले.
रघु: ओके मन्या. काय म्हणालास? कोण येतंय? मन्या: ( फोनवर) अरे तो कास्टिंग डिरेक्टर येतोय. बालाजी फिल्म्स चा रघु: कास्टिंग डिरेक्टर? कशाला? मन्या: अरे वहिनीना त्यांच्या सिरीयल साठी घेतोय म्हणे. रघु: पण ती इथे कुठे आहे. मन्या : तेच तर म्हणतोय मी. सुप्रिया मॅडम घरी नाहीत म्हणून मी सांगितलय. तो मॅडमच्या सेक्रेटरीशी बोलायला येतोय. रघु: मग. मी काय करु? मन्या: हे बघ मी पण आज बाहेर आहे. त्यामुळे तू त्याला सुप्रिया मॅडमचा सेक्रेटरी म्हणून भेट. रघु: मी मॅडमचा सेक्रेटरी? मन्या: हो रे ....आजच्या पुरता तरी बन. रघु: आणि सेक्रेटरी म्हणून काय करायचे? मन्या: काहीही कर. टाईम पास कर.

आशय - भाग ५

लेखक किंबहुना यांनी मंगळवार, 16/08/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना आणि भाग १ आशय - भाग २ आशय - भाग ३ आशय - भाग ४ मी तसा वर्गातला हुशार विद्यार्थी म्हणून गणला जात होतो. जरी कधीही मी वर्गाच्या मेरिटलिस्टमध्ये आलो नसलो, (त्यात नेहमी मुलीच असायच्या) तरी गणित, संस्कृत, विज्ञान वगैरे विषयात असलेल्या गतीमुळे, तसेच माझ्या भावाच्या तसेच वडिलांच्या रेप्युटेशनमुळे तसी माझी इमेज चांगली होती. याचा मला बर्‍याच ठिकाणी त्याचा फायदा मिळायचा.

उंच उंच झोका

लेखक जागु यांनी मंगळवार, 16/08/2016 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
झुला, झोपाळा, पाळणा प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. सुगंधी, रंगीबिरंगी हारा-फुलांनी सजून, फिरत्या भिंगरीच्या खेळण्याच्या गमतीत, ठरलेले नाव फुला-रांगोळ्यांसह गुपित सांभाळत, कुणी राम घ्या, कुणी लक्ष्मण घ्या च्या सुरेल लयीत, बाळाचे नाव पाळण्याच्या कुशीत, पाळण्याच्या साक्षीने बाळाच्या कानात ऐकवून प्रचलित केले जाते. पाळणा गीताच्या सुरांवर बाळाच्या उंच झोक्यांची सुरुवात इथूनच होते. अशा प्रकारे अगदी बालपणापासूनच पाळण्याची संगत प्रत्येकालाच लाभलेली असते. वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे पाहण्यात येतात.

कठोपनिषद (२)

लेखक शरद यांनी शनिवार, 13/08/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

अवधूत (भाग-७)

लेखक प्रभास यांनी बुधवार, 10/08/2016 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
दुपार आता उतरत आलेली होती. दिवसभर चांगलंच ऊन तावल्याने सगळं कसं कोरडं ठणठणीत झालेलं होतं. वाटेत एका घरातून त्याला मूठभर फुटाणे आणि रेवड्या मिळाल्या होत्या. रात्री खाता येतील… सध्या थंडीचे दिवस… थोड्याच वेळात अंधारुन येईल. रात्रीपुरता मुक्काम कुठे करायचा? वाटेत कुठे निवारा मिळेल का? रात्री खूप थंडी असणार. नाहीच निवारा मिळाला तर? त्याला थोडी भीतीच वाटली. काल तर केवढा ताप होता! आज तरी सुरक्षित रहावं निदान! इतर वेळी कुठे फारसा विचार करतो आपण? पाय झपाझप चालतच राहिले. सूर्य एव्हाना मावळलेला होता. वेगानं अंधारुन येऊ लागलं होतं.

रेनफॉरेस्ट

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 09/08/2016 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
आज जिथे आहे सहरा म्हणजेच वाळवंट, रेग, सैफ़, बरचन (म्हणजे काय हे गुगलून घ्या) वगैरे भूवैशिष्टये असणारे, तिथे होते लॉन्ग लॉन्ग एगो (म्हणजे रियल लॉन्ग लॉन्ग एगो सहस्रावधि नव्हे लक्षावधि नव्हे कोट्यावधि वर्षांपूर्वी) सहस्र योजन विस्तार असलेले ओलेचिंब, घनदाट, निबिड रेनफॉरेस्ट! रोज दुपारी दोनतीन वाजता गड़गडाट करायचे अजस्र काळेकभिन्न क्युमुलोनिम्बस् ! अन् झरझर बरसायचे जीवनामृतरस! त्या विशाल निबिड़ जंगलात होते अथांग एक सरोवर शतशत योजन विक्राळ.. होत्या विशाल राक्षसी मगरी आणि हत्तीचे चिमुकले पूर्वज आणिक होते चित्रविचित्र प्राणी झाडेझुडुपे,नद्यानाले,डोंगरदऱ्या........ दिवसरात्र चालायच्या अद्भुत निसर्गलील

कठोपनिषद (१)

लेखक शरद यांनी शनिवार, 06/08/2016 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== उपनिषदे : (१)...

एन्टरप्रेन्युअर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 31/07/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.