Skip to main content

संस्कृती

पुस्तकं

लेखक मितान यांनी रविवार, 23/04/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकं जिवंत असतात. जन्माला यायच्या आधीच लेखकाच्या हृदयात ती धडधडत असतात. एखादं नवजात पुस्तक हळुवार जवळ घेतलंत तर जावळांचा वासही येतो. अनोळखी हातात ती आधी फडफडतात पण एकदा त्या हातानी आपलं म्हणलं की त्याच्या नजरेखाली शांत निवांत होतात. काही पुस्तकं वाढतात,विकसित होतात, थोर होतात आभाळएवढी; काही खुरटी च राहतात. अधलीमधली सामान्य माणसासारखी आयुष्यभर अजून एक पायरी वर चढायची धडपड करत राहतात.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग १)

लेखक Anand More यांनी शनिवार, 22/04/2017 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘संस्कार’ कादंबरी वाचली ती दहावी अकरावीत असताना. चाळीतल्या शेंडे काकूंनी त्यांच्या संग्रहातील प्रत वाचायला दिली होती. नंतर कित्येक वर्षे त्यांना ती कादंबरी परत करायला टाळाटाळ करत होतो आणि परत केल्यावर हातातून काहीतरी महत्वाचं निसटून गेलंय अशी भावना मनात सलत होती. पुढे पैसे मिळवू लागल्यावर लेखकाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारी ही कादंबरी विकत घेतली. सुखांत किंवा दुःखांत नसलेली पुस्तके आधी वाचली होती. पण शेवटी उत्तर न देता प्रश्न पाडणारी आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगणारी ही कादंबरी वाचल्यानंतर यू आर अनंतमूर्ती या लेखकाबद्दल आदराशिवाय दुसरी कुठलीही भावना मनात येऊ शकत नाही.

नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 22/04/2017 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजु लागले होते.

मायानगरी

लेखक ज्ञानदेव पोळ यांनी गुरुवार, 20/04/2017 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतल्या घरांना पत्र्याचा सोफा नाही कि सोफ्यात चूल नाही. चूल असली तरी त्या चुलीत विस्तवाचा फुललेला आर नाही कि चुलीत भाजलेल्या शेंगा नाहीत. इथल्या घरांना आंगण नाही कि अंगणात तुळस नाही. दारात कुरड्या सांडग्याची वाळवण नाहीत कि वाळवणाला काठी हलवत राखण बसलेली म्हातारी नाही. मुंबईतल्या घरासमोर गुरांचा गोठा नाही कि "गोठ्यात चिळ चिळ वाजणारा धारेचा आवाज नाही. दाराला राखण करीत आडवा पडलेला राजा कुत्रा नाही कि उकिरंडयावर पायानं उकरणाऱ्या कोंबडया नाहीत. नातवडांना जत्रेला घेऊन निघालेला धोतर पटक्यातला म्हातारा इथल्या रस्त्यावर नाही कि मधल्या लेकीकडं साखरचं गठुळ घेऊन निघालेली लुगडया चोळीतली म्हातारी नाही.

लॉन-वरचं लगीन!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 20/04/2017 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17991585_1325052557581027_2522918732284372163_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=87b7fe7cee10ef8de3ed78cb4dfac684&oe=59985CF0 नाटकापेक्षा आमच्या धंद्यात, नेमका उलटा खेळ आहे. तिथे भेळेला खाणारा आहे. इथे खाणाय्राला-भेळ "आहे! " स्टेज लागून तयार आहे. नेपथ्यंही सज्ज आहे. वधूपार्टी येऊन गरम, आणी .. वरंपार्टी थंड आहे.

ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन!

लेखक मार्गी यांनी बुधवार, 19/04/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्या. म्हणून हे आधी लिहिलेलं पत्र नावं व किरकोळ संदर्भ बदलून आपल्यासोबत शेअर करतो आहे. आपल्या आयुष्यातले ताण, स्ट्रेस मॅनेजमेंट, संघर्ष ह्यावर एक मुक्तचिंतन! दि. ३ जुलै २०१६ प्रिय लोकेश आणि तेजश्री वहिनी! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आज सकाळी उठल्यापासूनच लोकेशशी बोलणं सुरू होतं. तेव्हा म्हंटलं चला थोडं सविस्तर बोलू. त्या दिवशी आम्ही भेटलो असतानाही भेटायचं चाललं होतं. तेव्हा आता इथे पत्रातूनच भेटावं म्हंटलं. आणि मला पत्रातून भेटायला खूप आवडतं. जेव्हा प्रत्यक्ष भेटतो; तेव्हा खूप वेळ फॉर्मल बोलण्यात- हाय हॅलोमध्ये जातो किंवा जनरल बोलण्यात जातो.

एक मुक्तक

लेखक रामदास यांनी सोमवार, 17/04/2017 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी घाईघाईत बुटाच्या लेसा बांधताना, खण्णकन आवाज करत तो चौकोनी बिल्ला पोराच्या खिशातून लादीवर सांडला तेव्हा... गजराचं घड्याळ वाजल्या सारखा मी दचाकलो. पुन्हा एकदा तो लखलखीत तुकडा खिशात ठेवत पोरगा समंजस हसला... म्हणाला , तुमचाच आहे , काल तुमच्या जुन्या शर्टाच्या खिशात सापडला आईला , बोहारणीला कपडे देताना. "फेकून दे "म्हणाली "अवलक्षणी आकाशाचा तुकडा ", तोच दाखवून तुम्ही म्हणे तिला भूलवणीला लावलंत वगैरे वगैरे... आणि तुम्ही तरी कुठे बघता आजकाल उद्याचा दिवस या तुकड्यात , सारखे हातावर हात चोळता आणि तळहातावरच्या रेषा वाचता , असू दया आता ते माझ्याकडे, I am old enough .... वगैरे वगैरे ....
काव्यरस

मराठी स्त्री-गीतातील स्वप्नातीत रामायण

लेखक माहितगार यांनी रविवार, 16/04/2017 06:35 या दिवशी प्रकाशित केले.
वाल्मिकी रामायणासहीत विवीध रामायणांचा परिचय असतोच, शिवाय गीत रामायण सोबतीला रामायणासंबधीत पॉपकॉर्नसारखे अधे मध्ये चघळायला वाद विषय, खरे म्हणजे हल्ली तोच तो पणा नकोसा झाल्याने कधी मधी गीत रामायणातल्या एखाद -दोन गीतांपलिकडे रामायण बद्दल मजल जात नाही. पण http://ccrss.org वर असलेल्या ओवी गीतांना सहज चाळता चाळता हाती आलेले मराठी स्त्री लोकगीत रामायणाच्या या अनोख्या रूपाने लोकगीतांतलं रामायण आजही खिळवून ठेऊन पुन्हा एकदा वाचावे वाटेल असे आहे - कुठे कुठे काव्यशास्त्र विनोदाचा धाट आहे असे वाटावे, काही वेळा रामायण आहे कि राधा-कृष्णाच्या लीला असेही वाटून जाईल.

सत्यमेव न जयते, कल्याणमस्तु!

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 14/04/2017 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारताचं ब्रीदवाक्य आहे - सत्यमेव जयते. या ब्रीदवाक्याचा मला खूप अभिमान आहे आणि त्याचा अवमान मला सोसवत नाही हे प्रथम नोंदवतो. आजपावेतो लोकांनी माझ्या विधानाचा असा अर्थ घ्यावा, तसा घेऊ नये असं डिस्क्लेमर मी कधी टाकलं नाही, पण इथे विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन लेखातील चिकित्सेचा अर्थ राष्ट्रद्रोह इ इ नाही असे पुन्हा नमूद करतो. ============================================================== सत्यमेव जयते चं शब्दशः भाषांतर "सत्यच जिंकते" असे आहे. सत्यम् = सत्य, एव = च जयते = जिंकते. च वर जोर.

श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १

लेखक aanandinee यांनी शुक्रवार, 14/04/2017 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ हरिः ॐ अध्याय १, भाग १. भावार्थ- नेहमी केल्या जाणार्या या गणेशवंदनेतसुद्धा हेमाडपंतांचे सद्भक्त असणे उठून दिसून येते. त्यांनी केवळ गणपतीला वंदन केले नाही तर गणपतीमध्येच त्यांनी त्यांच्या सद्गुरू साईनाथांना पाहिले. हिंदू धर्मात आपल्या अनेक वेगवेगळ्या देवता, त्यांचे वेगवेगळे सण , साजरे सर्व काही केले जाते पण मग त्यामध्ये कधीकधी "आपली निष्ठा नक्की कुठे आहे? मग बाकीच्या गोष्टी मानायला हव्यातच का ? बाकीच्या देवांना नमस्कार करायलाच हवा का? न केला तर काही होईल का?