Skip to main content

संस्कृती

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 21/06/2020 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा:~ भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या अभिवाचनाचा गाभा आहे... पण तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः) नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे समजावे!

डोक्याला शॉट [तृतीया]

लेखक गड्डा झब्बू यांनी गुरुवार, 18/06/2020 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली. "चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली. सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.

व्हिडिओ अभिवाचन:-गुरुजींचे भावविश्व-प्रस्तावना व भाग १

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 18/06/2020 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
खुला-सा:- हे व्हिडिओ अभिवाचन फेसबुक वर सुरू केलेले आहे.ते इथे देत आहे. फेसबुक वर केलेले असल्यामुळे त्या हिशोबानी मनातून आलेली ही प्रस्तावना आहे. आपण मिपाकरांनी माझ्या गुरुजींचे भावविश्वला अलोट प्रतिसाद दिलात. आता या वरील प्रस्तावनेसह केलेल्या पहिल्या भागाच्या अभिवाचनासाठी आपल्या अभिप्रायांच्या प्रतीक्षेत आहे.

अस्पर्शिता..

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 15/06/2020 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अस्पर्शिता एक राधा मानसीं दडून आहे.. रिक्त रुक्ष ओंजळीच्या रसतळीं भरुन वाहे.. वठला जरी तरु तो वैशाख अग्निदाहे.. नि:शब्द भावनांचे तृण-अंकुर गर्भि वाहे.. वनवास वाटचाल पायातळीं निखारे.. अंतरी परि चित्ताच्या श्रीहरी नित्य पाहे.. होरपळे तनु विरहाचा वैशाख-दाह साहे... हृदयी परि गोविंद मीलनाची आस आहे..
काव्यरस

हॅरी पॉटरच्या भाषेतलं पत्र!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 04/06/2020 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! इतकी मुलं सगळं काही बाजूला ठेवून तासन् तास हॅरी पॉटर कसे वाचू शकतात असा प्रश्न मला पडला होता. इतकं त्यामध्ये काय आहे असं‌ वाटायचं. आणि असंही वाटलं की, मुलांसोबत चांगला डायलॉग करायचा असेल तर हॅरी समजून घ्यायला पाहिजे. शिवाय जगामधलं जर सर्वाधिक वाचलं जाणारं साहित्य ते असेल, तर मग तर समजूनच घ्यायला पाहिजे असं वाटलं. त्यातून हळु हळु हॅरी जगाची ओळख झाली. आणि माझ्या हॅरी भक्त परायण बहिणींच्या मदतीने अक्षरश: अखंड हॅरी नाम सप्ताहातील हॅरी पॉटाप्रमाणे सलग आठही दिवस आठ चित्रपट बघितले (लॉकडाउनचा सदुपयोग करून). शिवाय पुस्तकही वाचायला सुरुवात केली. आणि खूप छान जग उलगडत गेलं.

अल्टर्ड कार्बन- वेबसिरीज ओळख

लेखक कपिलमुनी यांनी रविवार, 17/05/2020 02:26 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मा अमर आहे, माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आत्मा हे शरीररुपी वस्त्र सोडून नवे रूप धारण करतो असे तत्वज्ञान आपण बऱ्याच वेळी ऐकलेले असते. पण नवे शरीर असले तरी आत्मा फॉरमॅट झालेला असतो, त्यामुळे गतजन्माची काहीही आठवण नसते. ते नवा गडी नवे राज्य असा प्रकार आहे. पण ...... पण जर नवे शरीर आणि तोच आत्मा असेल तर ? अर्थात पन्नाशीचा आत्मा लहान शरिरात राहून बोअर होईल, त्यामुळे शरीर सुद्धा योग्य वयाचे हवे. त्यातही सिलेक्शन असेल तर उत्तम ! जन्मत: केआरके असेल तरी नंतर एसआरके चे शरीर मिळेल . अल्टर्ड कार्बन ही याच कल्पनेवर आधारित वेब सीरिज आहे.

अस्वस्थ करणारे उत्तर रामायण

लेखक आकाश खोत यांनी रविवार, 10/05/2020 02:34 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात (लिंक: पुन्हा एकदा रामायण) मी रामायण मालिकेचा मुख्य भाग संपल्या नंतर मनात घोळत असलेले विचार अगदी त्याच रात्री मांडले. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पासुन उत्तर रामायण सुरु झालं, आणि ते संपल्यावर मात्र लगेच काही लिहायला हात उचलला नाही. शेवटचे काही भाग इतके भावुक आणि व्यथित करून गेले कि मनात नेमकं काय चाललं आहे हे मला स्वतःला कळायला, विचार थोडे तरी स्पष्ट व्हायला काही दिवस जावे लागले.

योगक्षेमं वहाम्यहम्‌..खरा अर्थ.

लेखक Jayant Naik यांनी गुरुवार, 30/04/2020 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
योगक्षेमं वहाम्यहम्‌..खरा अर्थ. काही दिवसापूर्वी मी भगवदगीतेमधील कर्मण्ये वाधिकारस्ते ..या दुसऱ्या अध्याया मधील श्लोकाबद्दल हा श्लोकाचा कसा विपर्यास होत गेला या बद्दल लिहिले होते. आता नवव्या अध्यायामधील एक श्लोकाचा विचार करू. हा सुद्धा एक विपर्यास झालेला श्लोक आहे.किवा आपण असे म्हणू शकतो कि अनेक लोकांनी आपल्या आळशीपणा किवा नाकर्तेपणा याचे समर्थन करण्यासाठी या श्लोकाचा आधार घेतला आहे. १.० मूळ श्लोक आणि त्याचा अर्थ. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌ ॥ ९-२२ ॥ भावार्थ.

शेंगोळी

लेखक बबु यांनी गुरुवार, 02/04/2020 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
लॉक आऊटच्या दिवसात भाजीपाल्याची कमतरता असताना काय करायचे हा गृहिणींना पडणारा एक यक्षप्रश्न. आमच्या सौने आज हुलग्याची शेंगोळी करून तिच्या नियोजन कौशल्याची पावती दिली. शेंगोळी, बाजरीची भाकरी, पापड, कांदा, लसणाची चटणी हा मेनू म्हणजे शेतकरी कुटुंबातून आलेल्या चाकरमान्यांसाठी मेजवानीच असते. माझ्या लहानपणी ऐन उन्हाळ्यात बैलजोडीने नांगरट केली जायची, त्या दिवसांची आठवण येते. रहरखत्या उन्हात राबणाऱ्या घरधन्यासाठी कारभारीण जी न्याहारी घेऊन जायची त्यात शेंगोळी आवर्जून असत. प्रथिनांचा पुरवठा करणारे मोड आलेले हुलगे, मठ यांचाही समावेश जेवणात असे.

राम गाण्यांतला आणि राम आपल्या आतला

लेखक निखिलचं शाईपेन यांनी गुरुवार, 02/04/2020 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
Ram जगमे सबसे उत्तम है | मर्यादा पुरुषोत्तम है || सबसे शक्तिशाली है | फिर भी रखते संयम है || पर उनके संयम की अब आने को है सीमा | रावण, समय है मांग ले क्षमा || माझ्यामते भारतीय मनांतल्या रामाचं हे सर्वात सुंदर वर्णन असावं.