मेरे अवगुन चित ना धरो...
लेखनविषय:
- Read more about मेरे अवगुन चित ना धरो...
- 26 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
कोण गती जगलो हे जीवन? केली किति पापे?
हरि, हरि आता सगळ्या दु:खा, शिणलो भवतापे |
आयुष्याची गाडी उताराला लागली आणि मागे वळून पाहिलं तर दिसलं ते अविचारानं जगलेलं जीवन. आनंदाच्या क्षणी धुंद-मत्त होऊन तुला विसरलो, दु:ख झालं तेव्हा माझं कर्म न पाहता तुलाच विचारले की "हाच का तुझा न्याय?"
सुख-दु:खांच्या लाटांमध्ये हेलकावे घेत, मन नाचवेल तसा नाचलो पण काही केल्या मला माझं वागणं तपासून पहावंसं वाटलं नाही. मी माझ्या चुका मात्र पाहिल्याच नाहीत.तुला विसरलो रे मी!