Skip to main content

समाज

व्हॉट्स राँग विथ यू मि. राज?

लेखक इनोबा म्हणे यांनी शनिवार, 16/02/2008 01:45 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ताच्या राजू परुळेकर यांनी घेतलेली राज ठाकरे यांची मुलाखत. राज यांनी उपस्थीत केलेल्या परप्रांतीयांच्या मुद्दयावरुन मिडीयावाल्यांनी केलेला पक्षपातीपणा,गुंड उत्तर भारतीय आणि त्यांचे गुंड नेते.महाराष्ट्राला मिळणारी सापत्न वागणूक...आणि बरेच काही (कट्टर मराठी) -इनोबा

स्वप्नातील पदर धुक्याचा (१)

लेखक मनमीत यांनी शुक्रवार, 15/02/2008 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटच्या वर्षाची परिक्षा संपली. रुद्रला हलकं हलकं वाटू लागल. महत्वाकांक्षी तो कधीच नव्हता, त्यात त्याला शिक्षण सुरू असतांच शेवटच्या वर्षी नोकरी मिळालेली. वडीलांचा व्यवसाय साधारणच व शेतीवर आधारीत असल्याने खात्रीशीर उत्पन्नाचा नव्हता, त्यामु़ळे पुढे काय ह्याचा फारसा प्रश्न त्याच्यापुढे किंवा त्याच्या मात्यापित्यांपुढे नव्हता. परिक्षेचा शेवटचा दिवस आणि नोकरीचा पहिला दिवस ह्यात साधारण ८ दिवसांचा अंतराळ होता. नोकरीच शहर पुण्यापासून बरच दूर होतं, येऊन-जाऊन ३६ तास लागत.

लहान मुलांनी विचारलेले प्रश्न

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 14/02/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुले प्रश्न विचारून भंडावून सोडतात हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच. आपण चकित होतो की हा विचार ते कसा करतात - जो साधा, सोपा, थेट आणि जिज्ञासेने भरलेला असतो - आपली असा विचार करायची शक्ती कुठे आणि केव्हां बरं हरवली?

महामानवाला प्रणाम!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 09/02/2008 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिसळपाव परिवारातर्फे बाबा आमटे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आदरांजली! या महामानवाला आमचे कोटी कोटी प्रणाम! बाबा आमटे ही व्यक्ति नसून एक संस्था होती. व्यक्ति येतात, जातात, परंतु संस्था ही नेहमी कायमस्वरुपी असते/असावी! आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! (नतमस्तक) तात्या.

शेजारचे जातियवाद व राजकारण

लेखक सतीश वळीव यांनी शनिवार, 09/02/2008 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्‍यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार.

कुठली खिडकी? कितवा मजला?

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 08/02/2008 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
कुठली खिडकी? कितवा मजला? निळ्या पांढर्‍या भिंती दिसल्या बावरलेल्या नजरा वळल्या शब्दांनीही खाटा धरल्या प्रश्न तेवढा एक राहिला कुठली खिडकी? कितवा मजला? मित्र,सोयरे सगळे जमले नव्या घरी येताना दिसले बंद लिफ्ट पाहून म्हणाले किती पायर्‍या चढावयाला? कुठली खिडकी? कितवा मजला? मध्यरात्रीचा प्रहर नेमका हेरून गेलो तसा बेरका व्यवहारी मी मदन नेटका पैसे मोजत खांद्यावरती हात टाकला कुठली खिडकी? कितवा मजला? रिक्तहस्त मी अलिप्त आणि एकभुक्त मी विषय, वंचना, व्यसनांपासून पूर्ण मुक्त मी मीच देव, मी दानव अन माझाच भक्त मी झोपायाला जमीन, अंबर पांघरायला कसली खिडकी! कसला मजला! -ॐकार

ही बातमी वाचून मन विषण्ण झाले.

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 07/02/2008 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या स्वातंत्र्यवीरांनी देशापायी आपल्या घर-संसाराची राख केली, त्यांच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही बंदिवास यावा हे त्यांचं दुर्दैव नसून आपला करंटेपणा आहे! ह्याला माफी नाही!! काँग्रेसचा बुळेपणा आणि 'निधर्मी' असणे म्हणजे नेमके काय ह्याबद्दलचा गोंधळ ६० वर्षांनंतरही कायम आहे असेच अजून दिसते. www.esakal.com/esakal/02072008/National467F25B420.htm

तूच आहेस तुझ्या र्‍हासाचा शिल्पकार

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 06/02/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कृपया ही बातमी वाचा. आपल्याला काय वाटते? इच्छुकांनी या संदर्भात कृपया येथे चर्चा करावी असा मानस आहे..

नातेसंबंध लाख मोलाचे - सचिन

लेखक बापु देवकर यांनी सोमवार, 04/02/2008 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्‍य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. ....... कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता.