Skip to main content

समाज

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

चर्चिलची "शापवाणी"

लेखक तळेकर यांनी मंगळवार, 29/01/2008 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती . "स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील.

आधार कुणाचा?

लेखक तळेकर यांनी रविवार, 27/01/2008 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
आधार कुणाचा? चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने मुलं परदेशी जातात ते परतीचे दोर कापूनच. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळतही नाही. एकदा तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात. 'इथे सगळं ठीक आहे,' असं सांगितलं जातं तब्येत बरी नसली तरी. मुलं तिथे दूर अमेरिकेत, आपली दुखणी त्यांना काय सांगणार? भारतात यायचं, तर खर्च ! रजा पाहिजे? नातवांच्या आठवणीन व्याकूळ होनं आहेच.

नामवंत कवी प्रवीण दवणे यांचा एक आशयगर्भ लेख

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 23/01/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांपूर्वी वाचनात आला होता. फारा दिवसांनी काही कारणाने त्याची आठवण जागी झाली. मि.पा.करांनाही त्याचा आस्वाद घेता यावा ह्या कारणाने तो लेख येथे देत आहे.

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 10/01/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

आयसीसी चे नवे नियम :

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 09/01/2008 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.

नुतन वर्षाभिनंदन (काही नववर्ष अवतरणे)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 01/01/2008 03:01 या दिवशी प्रकाशित केले.

नवीन वर्षा संबंधी काही अवतरणे वाचनात आली त्यांचे मुक्त भाषांतरः

"तारुण्य म्हणजे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जागणे, आणि प्रौढत्व म्हणजे रात्रभर जागे राहावे लागणे"

"एक हितदर्शी (ऑप्टिमिस्ट) नवीन वर्षाची रात्र पुढील वर्षाचं स्वागत करण्यासाठी जागतो आणि अहितदर्शी (पेसिमिस्ट) जुने वर्ष गेल्याची खात्री करायला"

"अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांना जुन्या सवयी नव्याने चालू करायच्या असतात ना!"

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 28/12/2007 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?