Skip to main content

समाज

गोरीच बायको हवी !

लेखक शितल यांनी सोमवार, 28/04/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
गोरा र॑ग हा आता सै॑द॑र्याचा एक मुख्य भाग बनला आहे. ज्याला त्याला आपली गोरीच बायको हवी असते, आता एवढ्या गोर्‍या मुली आणायच्या कोठुन आणि ह्या आणि सावळ्या मुली॑॑ची लग्न कशी होणार ? सध्या लग्नाचा सीझन चालु आहे, लग्नातच लग्नाला आलेल्या उपवर मुला- मुलीची ही लग्ने ठरतात, सु॑दर मुली॑ना पटकन मागणी येते, आणि बाकीचे ज्या॑णी स्वतःचे जमविले नसेल त्या॑चे पाय वधुवर सुचक म॑डळाकडे वळतात. मग सुरू होते अपेक्षा॑ची ला॑ब लचक यादी , आपले स्वतःचे रुप आरशात न पाहता साथीदार अत्य॑त सु॑दर शोधला जातो. यातील पहिली इच्छा गोरी, नाके डोळी सरळ, अमुक अमुक उ॑ची, आणि क॑सात असते चष्मा नको.

आपली बस

लेखक हेरंब यांनी रविवार, 27/04/2008 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
या संवादात बायकांवर टीका करण्याचा अजिबात हेतू नाही. एकूण सामाजिक व्यवस्थेवर मात्र आहे. गैरसमज नसावा. सदू आणि दादू बसस्टॉपवर उभे असतात. एका जुन्या नाटकातले संवाद पुटपुटत असतात. सदू : बस आली बस. दादू : कुठाय बस, आपली नाही ती बस! (तेवढ्यांत त्यांची बस येते. बसमधे चढल्यावर सदू डावीकडच्या पहिल्या सीटवर बसायला जातो.) दादू : अरे, थांब थांब, ती सीट अपंगांसाठी आहे. सदू : मग दुसर्‍या सीटवर बसु या का ? दादू : नको रे, ती पण अपंगांसाठीच आहे. सदू : अरेच्चा, एवढ्या सीट खाली असताना का नाही बसायचं ? दादू : अरे लेका, हा आरक्षणाचा जमाना आहे. तिसरी सीट तान्ह्या बाळांना पाजणार्‍या आयांसाठी आहे.

एका उपक्रमाची ओळख

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 24/04/2008 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीच्या हितसंवर्धनासाठी अनेक लोक वेगवेगळ्या पातळींवर काम करतांना दिसत आहेत. कुणी संस्था काढतं, तर कुणी व्यक्तीगत पातळीवर काम करतं. आपापल्या कार्यक्षेत्रात काम करतांना सोबतच हे मराठीचं काम करणारे हे लोक. कुणाकडूनही कसलीच अपेक्षा न ठेवता मौन साधकासारखे यांचे काम आहे. अश्या लोकांपैकी काही लोकांना एक त्यांच्या कामाची दखल घेतल्याची जाणीव करून देण्यासाठी मराठीसाठी काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते श्री द्वारकानाथ कलंत्री यांनी अश्या लोकांना मानपत्र देण्याचे ठरवले. मानपत्र सोबतच इतरही अश्याच वेगवेगळ्या उपक्रमी लोकांची माहिती देण्यात आलेली आहे. जेणे करून अश्या लोकांची माहिती समाजाला व्हावी.

* सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा *

लेखक मनस्वी यांनी गुरुवार, 24/04/2008 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
* सचिनला ३५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा *
सचिन उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्या व्यतिरिक्त सचिनबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असल्यास जसे काही किस्से / त्याचा स्वभाव / आठवणी असल्यास कृपया इथे शेअर कराव्यात.

अपयशाचे व्यवस्थापन

लेखक विकास यांनी गुरुवार, 24/04/2008 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांचे व्हार्टन इंडीया इ़कॉनॉमिक फोरम मध्ये भाषण झाले. (२२ मार्च २००८) ते सर्वच वाचण्यासारखे आहे. पण त्यातील खालील भाग मला विरोपातून मिळाला. आवडल्यामुळे त्याचे स्वैर भाषांतर करून येथे देत आहे: प्रश्नः आपण सांगू शकाल का की नेतृत्वाने अपयशाचे व्यवस्थापन कसे करायचे असते ते? डॉ. कलामः मी तुम्हाला माझ्याच अनुभवावर आधारीत याचे उत्तर देतो. १९७३ साली मी इस्रोचा एसएलव्ही-३ प्रकल्पाचा डायरेक्टर झालो.

सारे प्रवासी गाडीचे

लेखक भोचक यांनी सोमवार, 21/04/2008 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
परशुरामची झोप मोडू नये म्हणून भुंग्याने पार मांडी फोडली तरी कर्णाने हु की चू केले नव्हते, असे म्हणतात. तद्वतच मध्य प्रदेश नामे राज्यात सार्वजनिक प्रवास करण्यासाठी कमीतकमी एवढी तरी सहनशीलता हवीच. सहनशीलतेची परीक्षा वा कसोटी पाहणारे प्रसंग आपल्या आयुष्यात अधून मधून येत असतील, पण या बाबतीत आपल्या लोकांना अधिक मजबूत करणेसाठी मध्य प्रदेश सरकारने कायमस्वरूपी सोय केली आहे, ती वाहतुकीच्या खासगीकरणाच्या रूपाने. आपल्याकडे 'यष्टी'च्या खासगीकरणाची आरोळी आली की सगळे कर्मचारी एकत्र येऊन शड्डू ठोकून उभे रहातात.

भाषा आणि प्रमाण

लेखक नीलकांत यांनी रविवार, 20/04/2008 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं? 'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.