Skip to main content

समाज

... देवाचं घर !

लेखक दशानन यांनी शनिवार, 24/10/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.

(बहुधा)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/10/2009 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल बहुधा वाचुन लिहण्याचा मोह आवरला नाही :( त्यांना त्याचे मोहरणे रुचलेच नसावे त्यांचे त्याचे बंध कधी जुळलेच नसावे बंधाचे हे नाव ठाकरे, गोजिरवाणे, भावा- र्थाचे बीज इथे रुजलेच नसावे भावांनी तोडली, जपावी, असली नाती, नेते मन त्यांचे, महाभारतच बघावे !
काव्यरस

बाबा कदम कालवश झाले.

लेखक नरेन यांनी बुधवार, 21/10/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सकाळ वाचताना बातमि कळाली मराठि साहित्यातील थोर कादम्बरीकार बाबा कदम कालवश झाले आमचि विनम्र आदरान्जली.

दाम करी काम येड्या....

लेखक ऋषिकेश यांनी बुधवार, 21/10/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
घटना १: गावचे पाहुणे थोड्यावेळा पूर्वी आले आहेत.. हातपाय धुवून, चहा मारून फ्रेश झाले आहेत आणि गप्पा टप्पा सूरू आहेत.. यजमानः काय मग? काय म्हणते तुमच्याकडली निवडणूक पाहुणे: मुख्यमंत्री आमचाच! यः हो तुम्ही त्यांच्या गावचे ना! त्यांना फाईट कशी आहे? पा: कसली फायीट, इरोधी बावीस आहेत.. येक बी कामाचा नाय.. यजमान नुसतेच हसतात पा: आता बघा कसंय.. सम्द शेटिंग हाये.. सेटिंग म्हटल्यावर आणखी चार कान टवकारले जातात. यजमान चेहर्‍यावर उसनं प्रश्नचिन्ह आणतात पा: आता बघा.. बावीसातला येकबी मराठा न्हायी.. शिवशेनेनं बामण दिलाय.. त्याला काय मतं मिळणार..

व्यर्थ न हो त्यांचे बलिदान....

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 20/10/2009 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो. उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल.

जालिय लेखनाची दखल...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 17/10/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरजालावर बरीच मराठी संस्थळं भरभराटीला येत आहेत, मराठी युनिकोडसुविधेमुळे मराठी टंकन सुलभ झाले आणि ब्लॉग्जचे पेव फुटले... त्यामुळे ज्या लोकांनी आयुष्यात आपण कधी लिहू असे कल्पिलेही नसेल असे लोक लिहू लागले, मराठी वाचन कमी झाले म्हणता म्हणता या नवीन तंत्राविष्कारामुळे मराठी वाचनच नव्हे तर लेखनही वाढते आहे. एकूणातच... एक नवीन जग आकारास येत आहे. आणि आपण आजचे नेटकर या विश्वाचे सुरूवातीचे दिवस आणि वाढ अगदी पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत. तर जालिय दिवस असे सुखासमाधानात जात असताना, साधारण तीनेक आठवड्यांपूर्वी अचानक रामदासांचा व्यनि आला. एखाद्या सदस्याचे सगळे लेखन बघायचे असेल तर काय करायचे?

सदुभाऊ

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 16/10/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
`राजकारण असंच असत... माणसांचा वापर करून घेणारेच इथे जास्त. हे माहित असूनही मी हे करतोय.. खाज म्हणा हवं तर... काय मिळतं म्हणाल, तर... समाधान... ते सगळ्यात मोठंय्‌' ... सदुभाऊ बोलत होते, आणि आतून त्यांची बायको कुत्सित हुंकार देत होती... "कसलं समाधान?... घरचं खाऊन लष्कारच्या भाकऱ्या भाजायचे नस्ते उद्योग!' ती आतूनच म्हणाली, आणि सदुभाऊंनी मला जोरदार टाळी दिली. "वयनी.. पण तुम्हाला नवऱ्याचा अभिमानच वाटत असणार'... मी मुद्दामच म्हणालो... "अज्जिबात नाही.. मी खमकी आहे, म्हणून चाल्लयं...