`एनर्जी' आणि `टॉनिक'!
हेलिकॉप्टरने हवेत झेप घेतली आणि काळी पट्टी डोळ्यावर बांधून साहेब सीटवर मागे रेलून बसले. बाजूलाच बसलेल्या कार्यकर्त्याने डोळ्यांनीच खूण केली आणि हेलिकॉप्टरमधल्या तीन-चार जणांनी खिडकीतून बाहेर नजर लावली. आता पुढच्या गावात पोहोचेपर्यंत साहेब आराम करणार होते.
... अर्ध्या- पाऊण तासातच खालून धूर दिसू लागला आणि हेलिकॉप्टर घिरट्या घालू लागले. सभेचे गाव खाली दिसत होते. एका मैदानावर जमलेली गर्दी हळूहळू ठळक होत होती. कार्यकर्त्याने हळूच साहेबांना स्पर्श केला आणि क्षणात साहेब जागे झाले. डोळ्यावरची पट्टी बाजूला करून खाली डोकावत ते स्वतःशीच हसले. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरले होते.
मिसळपाव
डोंबारी १
डोंबारी २