Skip to main content

समाज

तू तर माझी बायको, शारदा.....

लेखक भानस यांनी मंगळवार, 24/11/2009 03:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी पुण्याला सासूबाईकडे गेले होते. एक दिवस संध्याकाळी सोसायटीच्या सुंदर मोठ्या बागेत-क्लबहॉऊस मध्ये फिरत होते. बरेच ज्येष्ठ नागरिक एका गोल टेबलाभोवती बसून ब्रिज, पोकर खेळत होते. टेबल टेनिस भोवती तर खूपच गर्दी होती. अगदी लहान मुले जसे ओरडाआरडा करत खेळतात तसेच दृश्य होते. काही आज्या साड्या खोचून तर काही पंजाबी ड्रेसमध्ये ..... काही आजोबा अगदी इरेला पेटून जिंकायचेच असे खेळत होते. दोघेतिघे तरणतलावामध्ये थोडावेळ व्यायाम करून आभाळाकडे पाहत रिलॅक्स तरंगत पडून होते. एका कोपऱ्यात कॅरमचा अड्डा जमला होता. चौघेजण अटीतटीचा सामना लढत होते.

प्रिझनर्स डिलेमा

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 23/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्यबळ विकास व्यवस्थापनाचा (एचआरएम) अभ्यास केलेले आणि "नेतेगिरी" (मराठी- लिडरशिप) चा अभ्यास केलेल्यांना कदाचित माणसाच्या ह्या मानसिक द्वंद्वाची, कलाची माहिती असेल. मला जेव्हा ह्या थेअरीची तोंडओळख झाली तेव्हा मी हरखून गेलो होतो व पटले की, ही एक बहूव्यापी थेअरी आहे. - असे मी का म्हणतो आहे, ते नंतर सांगितलेले आहेच. प्रथम ह्या थेअरीची पार्श्वभूमी (उगम) पाहू व तीचा नेतेगिरीत कसा वापर होतो ते पाहू. "प्रिझनर्स डिलेमा" ला आपण ह्या गोष्टीपुरते "कैद्यांचा पेच" असे म्हणू. गृहीत धरा की, एका मोठ्या गुन्ह्यात दोन (अ आणि ब) संशयितांना पकडले आहे. पोलिस त्यांना वेगवेगळ्या कैद-खोलीत डांबून ठेवतात.

जेहूटीनाक्थची कबर

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 20/11/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच मॅसॅचुसेटस मधील म्युझियम ऑफ फाईन आर्टस मध्ये सहकुटुंब गेले होते. मला स्वतःला या म्युझियममध्ये जायला खूप आवडते. खरे तर सुटीच्या दिवशी घरी कोणी येणार नसण्याचे, किंवा बाहेर कुठे जायचे नाही आहे असे दिवस आमच्या वाट्याला सध्या कमीच येतात. अशा कुठच्यातरी दिवशी नुसतेच घरात कोंडून बसण्यापेक्षा बाहेर भटकून येण्यात गंमत असते. पण आमच्याकडे बाहेर पडायचे त्याआधी बाहेर हवा कशी असेल हे पहावे लागते. एक म्हणजे कडाक्याची थंडी किंवा पाऊस हे इथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेले आहे.

ईआयडी

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 20/11/2009 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी पोस्ट ऑफिसात गेलो होतो. गाडी लावून आत जाऊन पहातो तर ढीगभर गर्दी. दोनच सेल्स क्लर्क, त्यामुळे रांग हळूहळू पुढे सरकत होती. तेंव्हाचा संवादः जोडीने आलेले एक चिनी वंशाची वाटावी अशी स्त्री आणि तिच्याबरोबरचा कॉकेशियन तरूण त्यांचा नंबर आल्यावर एका काउंटरपाशी जाऊन थांबले. त्यांनी आणलेले पार्सल हातावेगळे झाल्यावर क्लर्क ने त्यांना विचारले, "Any stamps with that?" त्या दोघांनी मान हलवली, "Sure, give us a couple of booklets." "Which ones?

सुखांत

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 19/11/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.

कातरवेळ

लेखक निखिल देशपांडे यांनी सोमवार, 16/11/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

घेतली उडी अशी वेडी (वीर तात्याराव सावरकरांचा पोवाडा)

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 15/11/2009 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यसिंह गर्जला गोरा हाकला फार माजला रेटा त्याच्या देशाला ब्रिटीशाला......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ जनसागर ये उधाणाला वीरामागे जमला विनायकी रमला एकाच सावरकरी हाकेला......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ शंका कोणीना काढी सोडली घोडी घेई आघाडी दावली सावरकरी धडाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ सायबाची करी नासाडी घातल्या धाडी आवळली नाडी वीर तो इंग्रजास नाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ तोडगा साहेब काढी बनवले बंदी शृंखला बाधी बोटीने अंदमाना धाडी......हो जीरह जी जी जी...जीजीजी ........ कचकडी भासली कडी संकल्प सोडी योजना वेडी कुपाचे तळही तो फोडी......हो जीरह जी जी
काव्यरस

आय.आय.एम. अहमदाबादमधून

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 15/11/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, गेल्या अनेक दिवसांपासून मला आय.आय.एम. अहमदाबादमधील विद्यार्थीजीवनावर मिपावर लेख लिहायचा होता. तो आता लिहिता येत आहे याचे समाधान आहे. लेखाच्या निमित्ताने इतरही थोडी माहिती लिहित आहे. भारतीय प्रबंध संस्थान (आय.आय.एम) सर्वप्रथम कलकत्याला १९५९ मध्ये सुरू झाले. त्यासाठी कलकत्ता विद्यापीठ आणि भारतीय संख्याशास्त्र संस्था (Indian Statistical Institute) मधील ज्येष्ठ प्राध्यापकांना अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील बिझनेस स्कूलमध्ये ’बी-स्कूल’ संबंधी प्रशिक्षणासाठी पाठवले होते आणि त्यांनी परत आल्यावर आय.आय.एम कलकत्त्यात प्राध्यापक म्हणून अध्यापन करायला सुरवात केली.

बुधिया, पा आणि आपण

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 14/11/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
काहि वर्षांपूर्वी आपण सगळ्यांनीच बुधिया या (तेव्हा) चार वर्षाच्या मुलाच्या धावण्यासंबंधीत बातम्यांनी भरलेले रकाने वाचले. ज्या वयात रेकॉर्ड म्हणजेच काय हे कळत नाहि त्यावयात त्याला एका रेकॉर्डसाठी त्याला ६५ कि.मी धाववलं गेलं होतं. त्यावेळी त्या मुलाला प्रसिद्धी बरोबरच सहानूभूती मिळाली होती. त्याच्या प्रशिक्षकांना बहुदा दंड/शिक्षा झाल्याचेही आठवते. आज बालदिनाच्या निमित्ताने त्या बुधियाची पुन्हा आठवण झाली. अशी अचानक आठवण होण्यामागे म्हटलं तर काहिच कारण नाहि आणि म्हटलं तर बरीच आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या भोवती मला सतत दिसणारे बुधिया. एक नाहि तर अनेक बुधिया.

`वादळ' आणि `वादळग्रस्त'...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 14/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
`वादळ' आणि `वादळग्रस्त'... दुष्काळाचे सावट दूर करूनच मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला, आणि राज्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. आता सारे काही सुरळीत झाले, याची खात्री देणारे, स्थिरतेचे वारेदेखील वाहू लागले आणि काही दिवस जाणवणारी एक अस्वस्थता संपुष्टात आली. राज्याला गुलाबी थंडीचे वेध लागले. कपाटातले ऊबदार स्वेटर, मफलर, शाली बाहेर आल्या, आणि पावसाने कोंदटलेल्या छ्त्र्या, रेनकोटांनी कपाटातल्या त्या जागेत दडी मारली. हवेत एक नवा उत्साह वाहू लागला. या उत्साहाने भारलेली मने `नवनिर्माणा'च्या या चाहुलीने मोहरू लागली. पण मध्येच अचानक हवामान बदलून गेले.