Skip to main content

समाज

न्यायाचा पुतळा

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 08/07/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
एक आटपाट नगर असतं. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात असे. आपले नित्यनेमाचे उद्योगधंदे आटोपुन तो नगरीचा फेरफटका करत असे. नगरीत अनेकांशी गप्पा मारत असतांना तो आपल्या वैयक्तिक आयुष्याला विसरत असे. नगरीत अनेक विद्वज्जन, मान्यवर भल्या भल्या विषयांवर चर्चा, वाद करत असत. पण हा त्यापासुन बरेचदा दुर रहात असे. लोकांशी बोलावं, विनोद करावा, टवाळी करावी असाच याचा खाक्या असे. वैयक्तिक आयुष्यात ज्यांना विचार करायचा नसतो ते चव्हाट्यावर येवुन विचार केल्याचे नाटक करतात असा त्याचा सरळ सरळ विचार होता. नगरातील नगरपालाने काही काळ बदली नगरपाल नेमल्यानंतर ब्राह्मणाची साडेसाती सुरु झाली.

हाच आपला ढंगु आहे...

लेखक घाटावरचे भट यांनी गुरुवार, 08/07/2010 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
टायम मोठा झकास आला आवळा नाड्या सावरा चड्डी दारू कोंबडी हिरवा गांधी सुरू नव्याने रोज कबड्डी धोंडे फेकू गोळ्या झाडू स्वत: स्वत:चे कपडे फाडू 'कैसी जनता भूखी नंगी' म्हणत आपणच गळेही काढू लाठ्या काठ्या अश्रूधूर अन् कधि एखादी गोळी आहे थांबायाला वेळ कुणा पण भाजायाची पोळी आहे पिचले रडले कुणी भरडले कैवाराला आपण आहे फोटो बाईटा काळे झेंडे चुलीत अपुल्या सरपण आहे शरम बेशरम नीती अनीती जुन्या बुकातील फंदा आहे राजकीय रंडीबाजीचा खुल्लमखुल्ला धंदा आहे कुबड्यांचेही शॉर्टेज झाले जो तो साला पंगु आहे 'अपनेकू क्या करना यारों?' हाच आपुला ढंगु आहे...

प्रवास

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 07/07/2010 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, रोजचा ऑफिसला येण्याजाण्याचा सोडला तर सर्वांना आवडतो तो म्हणजे प्रवास. लहानगं मुल सुद्धा भुर्र जायचं म्हंटल की आनंदाने उड्या मारायला लागतं. मग हा प्रवास कोणत्याही कारणाने केलेला का असेना, लग्नकार्य, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, सहल, किंवा कामानिमित्त केलेला प्रवास. प्रवासात बरोबर ४ जण असले तर मग विचारायलाच नको, नुसती धमाल, मग बरोबर घरची मंडळी असो किंवा मित्र-मैत्रिणी. आपण केलेला प्रत्येक प्रवास आपल्या मनावर एक कायमचं चित्र कोरुन जातो. कधी कधी एकट्याने सुद्धा प्रवास करावा लागतो आणी माझ्या मते यावेळेत झोपेची वेळ सोडली तर उरलेल्या वेळात आपल्याला विचार करायला खुप सारे विषय मिळतात.

||ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल||

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
ससा, मधमाशा आणि मासे सारे ॥झाडून॥ अर्थात- मळ्यातले बोल तळ्यात फ़ोल आधूनिक मिपाप निती कथा एकदा एक ससा रानातील हिरव्या गार गवतावर उड्या मारत खेळत होता. रानफ़ुलांच्या गंधानी थोडे जास्तच मोहित होऊन त्याने एक टुणकन उंच उडी मारली. त्या उडीने नेमके तिथले एक मधमाशांचे मोहोळ उठले. त्यातल्या मधमाशा ह्या बेफ़ाम उडीने दंग होऊन “ सुटल्या ”. त्यातल्या काहींनी सशाच्या कानाभोवती गुणगुणून त्याला गुदगुल्या केल्या. सशाची जरा करमणूक झाली. ते स्मित विरते न विरते तोच सशाला असे वाटले की एखाद-दोन माशांनी त्याला दंश देखील केला की काय. कदाचित खेळात असे अभावितपणे झाले देखील असेल.

थँक्स मा

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 04/07/2010 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात बर्‍याच महत्वाच्या गोष्टी आपल्या नजरेतुन निसटतात, तसेच काही उत्कृष्ट चित्रपटसुद्धा पहायचे राहुन जातात, किंबहुना ते कधी आले कधी गेले हे सुद्धा माहित नसतं आपल्याला. कमी भांडवलाचे, छोटे कलाकार असलेले आणी मार्केटींग न करु शकलेले हे चित्रपट असेच कुठेतरी हरवुन जातात. गेल्या वीकांतला एका मित्राने आग्रह केला म्हणुन पाहिलेला, मन हेलावुन टाकणारा, डोळ्यात पाणी आणणारा आणी खोल विचार करायला लावणारा हा एक चित्रपट - "थँक्स मा".

पावनखिंडीतली लढाई - ३५०वा स्मृतीदिन - २७ जुलै २०१०

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी रविवार, 04/07/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी ही माहिती कळली. ती इथे प्रसिद्ध करायची विनंती झाली म्हणून हे प्रकाशित करत आहे. *** नमस्कार, येत्या २७ जुलैला पावनखिंडीतील रणसंग्रामाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मी पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड असे पालखी घेऊन पदभ्रमण करायचे ठरविले आहे. आपल्या सहकार्यानेच हा ३५० वर्षांपूर्वींचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे. ह्या मोहिमेत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करूया. सानथोर सर्व शिवप्रेमी ह्या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. सर्वांनाच तो ऐतिहासिक प्रसंग अनुभवता यावा असेच मोहिमेचे नियोजन केलेले आहे. तसेच आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ह्या कार्यक्रमाची माहिती द्यावी.