Skip to main content

समाज

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.

बाल-दिन

लेखक पर्नल नेने मराठे यांनी रविवार, 14/11/2010 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपणा सर्वांना बालदिनाच्या शुभेछ्हा!!! आपण वयाने जरी वाढलो असलो तरी मनाने अजुन बालकेच आहोत ;). त्यामुळे बालदिनावर आपला हक्क आहे. सो एन्जॉय !!!

निशाण

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 12/11/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो सारे जेत्यांचेच लिखाण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी वचन गुरुंचे महान आहे एका अंगठ्याच्या कर्जापायी गुरुधर्म तो गहाण आहे सूताघरी सूर्यपुत्र दानी वंचनाच नियतीचे दान आहे धर्माची चौकशी करतो ईश्वर उरी भावाचाच बाण आहे जरी सुयोधन अंधपुत्र तू राजपदीही अपमान आहे सत्तालोभ धर्माधर्म कधी कमरेखालीच प्रहार आहे कर्मयोगाची करुनि भलामण हरला गुरुचाच प्राण आहे सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे चिरंजीव विराण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
काव्यरस

बाहुल्यांच्या विश्वात : बाहुलीनाट्यकार सुषमा दातार यांच्याशी संवाद

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/11/2010 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
''प्रौढत्वी निज शैशवास जपणे'' ह्या आपल्या बाण्याशी प्रामाणिक राहून गेली दोन दशके लोकरंजनाबरोबरच सामाजिक जागृती, पर्यावरण प्रबोधन व मूल्यांची जाणीव करून देणाऱ्या कठपुतळीकार आणि ''संवाद''शिल्पी सुषमा दातार यांच्याशी त्यांच्या कठपुतळी कलेविषयी व हातमोजांच्या कठपुतळ्यांचे खेळ करण्याविषयी केलेला हा खास संवाद! वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर मास् कम्युनिकेशन्, पत्रकारिता व कम्युनिकेशन् मिडिया फॉर चिल्ड्रन् या विषयात उच्चशिक्षण घेणाऱ्या सुषमा दातार यांचा बायोडेटा वाचतानाच त्या किती विविध क्षेत्रांमध्ये लीलया संचार करतात याची कल्पना येऊ लागते.

तीन वेगळेच अनुभव!!

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 10/11/2010 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा मी घराबाहेर पडले, तेव्हा मला घराचा अर्थ समजला. जेव्हा मी मित्रांबाहेर पडले तेव्हा मला, मैत्रीचा अर्थ समजला. जेव्हा मी शहराबाहेर पडले तेव्हा मला, ओळखीच्या रस्त्यांचा अर्थ समजला. जेव्हा मी राज्याबाहेर पडले तेव्हा मला, भाषेचा अर्थ समजला. जेव्हा मी देशाबाहेर पडले तेव्हा मला, देशप्रेमाचा अर्थ समजला. जेव्हा मी मृत्युबाहेर पडले तेव्हा मला, जीवनाचा अर्थ समजला. पण मी जेव्हा स्वतःच्या बाहेर पडले तेव्हा सुद्धा मला जातीचा अर्थ समजला नाही.

नेटकर्‍यांचे साहित्य संमेलन

लेखक अनुप्रिया यांनी मंगळवार, 09/11/2010 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
14 November 2010 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या वर्षी दिनांक २५ ते २७ डिसेंबर या काळात ठाणे येथे होत आहे. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनात असलेला तरूणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरूण साहित्यिक हे संमेलन गाजवतील अशी अपेक्षा आहे. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन असणार आहे. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी चालू आहे. दहाहजारांहून अधिक तरूण मंडळी या संमेलनात सामिल होतील.

मॅड

लेखक यकु यांनी रविवार, 07/11/2010 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळीची धामधूम. लोक गल्लीत फटाके, फुलबाज्या वाजवत आहेत. बहिणी भावाला ओवाळत आहेत, उत्सवी वातावरण! जीव कसा हरखून जातो ना?? माझाही जात होता. पण काल-पर्वाचे अ‍ॅटमबॉम्ब तसेच पडलेले असूनही मला ते वाजवावे वाटेनात. उगाच फालतू आवाज कशाला काढायचे. नुकताच गाडीवर दीड-दोनशे किलोमीटर जाऊन आलो होतो. त्यामुळे आपल्यालाही शरीर आहे हे जाणवत होते. आ:!!!! आई ~!!!! अर्धाकप चहा दे बरं ! खिडकीतून गल्लीतला फटाक्यांचा नजारा पहात-पहात आपसूकच मातोश्रींना ऑर्डर गेली. तेवढ्यात बाहेर वेगळेच आवाज होऊ लागले होते. धाड्ड...धाड्ड.. फड्ड्ड...फड्ड्द.. काय आहे म्हणून बघायला बाहेर पडलो.

मराठी संकेतस्थळे व दिवाळी अंक

लेखक दशानन यांनी शनिवार, 06/11/2010 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मराठी वाचक विविधता असलेल्या लेखाकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेचे, भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटं लावलं व हळू हळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भुक पुर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या.

बुरा ना मानो दिवाली है!!

लेखक यकु यांनी शनिवार, 06/11/2010 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
उगाच आपापल्या नादात जगत असणार्‍या लोकांना, लहान-सहान लेकरांना भडडाम्म!!! असा आवाज करून दचकवणं वाईटच! भलेही मग तुम्ही लक्ष्मीपूजन करीत असाल की दिवाळीत फटाक्यात हजारो रूपये जाळून स्वत:चा माज दाखवत असाल. पर ये नहीं हो सकता मेरी जान! लोक जसं वागतात तसंच आपणही वागलं पाहिजे. पागल म्हणतील ना नाहीतर लोक. अख्खं शहर फटाक्यांच्या धुराने न्हाऊन निघत असताना इथे कुणाला शुध्द आहे? दिवाळी आहे ना.. बजाव फटाकाऽऽऽ अ‍ॅटम बॉम्ब लावा‌‍ऽऽऽ पाच-पाच हजारांच्या लडी लावाऽऽऽ लोकांच्या कानाच्या पडदे फुटले तर फुटले! सहा सव्वा सहाची वेळ. छाट्छूट फटाक्यांचे आवाज गल्लीत सुरू झाले होते. त्यांचा काही त्रास होत नाही.