जेव्हा मी घराबाहेर पडले, तेव्हा मला घराचा अर्थ समजला.
जेव्हा मी मित्रांबाहेर पडले तेव्हा मला, मैत्रीचा अर्थ समजला.
जेव्हा मी शहराबाहेर पडले तेव्हा मला, ओळखीच्या रस्त्यांचा अर्थ समजला.
जेव्हा मी राज्याबाहेर पडले तेव्हा मला, भाषेचा अर्थ समजला.
जेव्हा मी देशाबाहेर पडले तेव्हा मला, देशप्रेमाचा अर्थ समजला.
जेव्हा मी मृत्युबाहेर पडले तेव्हा मला, जीवनाचा अर्थ समजला.
पण मी जेव्हा स्वतःच्या बाहेर पडले तेव्हा सुद्धा मला जातीचा अर्थ समजला नाही. - मी एक जात (जात नाही ती जात)
**********************************************************************************
मी आयुष्यात खुप वाईट दिवस पाहिले आहेत,
जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही.
मी आयुष्यात एवढे मित्र कमावले आहेत,
जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही.
मी आयुष्यात एवढे धोके खाल्ले आहेत,
जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही.
मी एवढा विचारी माणुस आहे,
जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही.
मी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळाच माणुस आहे,
जगात असा दुसरा कुणी असुच शकत नाही.
***********************************************************************************
सगळं नश्वर आहे, माहित आहे,
पण तरी एक शाश्वत आधार हवा आहे.
मृत्यु हा अटळ आहे, माहित आहे,
पण तरी निरंतर जीवनाची एक आशा आहे.
उन लागणार आहे, माहित आहे,
पण तरी वळवाची सर येईल असा विश्वास आहे.
काळोख पसरतोय, माहित आहे,
उजेडाचा एक कण चमकेल अशी एक प्रार्थना आहे.
शांतता कानाचे पडदे फाडतेय, माहित आहे,
पण तरी, प्रेमाची एक हाक येइलच असा पाठीवर एक हात आहे, एक हात आहे.
*************************************************************************************
आपला,
मराठमोळा
याद्या
2881
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान! पहिला पॅरा आवडला.
अरे बाबा!
उन लागणार आहे, माहित आहे, पण
एक पहाटेच्या प्रतिक्षेत ....
छानच.
छान
म. मो. काय मोळी बांधुन समोर
हा परत गुढघ्यात गेलाय.. अरे
राघवा......
In reply to हा परत गुढघ्यात गेलाय.. अरे by राघव
छान! तीसरा पॅरा आवडला.
आवडले