Skip to main content

समाज

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

कागदाचा कपटा

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/11/2010 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
कागदाचा कपटा मिश्र माध्यम.

दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमांवरील निर्बंध

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 18/11/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत. उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ माणूस शोधतो. त्याकरीता मग एखादा अनोळखी माणूसही निवडू शकतो. किरण बेदी ठीक आहेत हो, त्या पोलीस अधिकारी होत्या. एखादा न्यायाधिश नाही तरी त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. पण न्याय देण्याकरीता राखी सावंत? आणि राखीचे बोलणे पाहून तर ती वाद मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतत आहे असेच वाटते.

चार्वाक - एक न-दर्शन

लेखक आळश्यांचा राजा यांनी बुधवार, 17/11/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
चार्वाक या दर्शनाला थोडंसं झुकतं माप देण्याचा एक ट्रेंड दिसतो. या दर्शनाला बंडखोर दर्शन मानले जाते. भाकडकथांवर विश्वास न ठेवणारे, परलोक न मानणारे, केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानणारे, शब्दप्रामाण्यावर विश्वास न ठेवणारे असे हे दर्शन आधुनिक वैज्ञानिक विचारधारेशी मिळतेजुळते आहे असे अनेकांना प्रथमदर्शनी वाटते. (भोंदू) वैदिक विचारांवर आघात (!) करणारे दर्शन म्हणून ब्राह्मणेतर (ब्राह्मणविरोधी) मंडळींमध्ये या दर्शनाविषयी प्रेम दिसते. जातीपातींचा विचार सोडून दिल्यासही एकूणच सुशिक्षित वर्गामध्ये अंधश्रद्धेच्या ठाम विरोधात असलेल्या या दर्शनाविषयी सॉफ्ट कॉर्नर असतो.

महाराष्ट्र दर्शन - अंबाजोगाई /भाग १

लेखक स्पा यांनी बुधवार, 17/11/2010 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
कल्याण स्टेशनातून "देवगिरी एक्स्प्रेस" सुटली, आणि आपण निदान एक आठवडा तरी मुंबईच्या मगरमिठीतून सुटलो , या भावनेने " हुश्श " केले...... कामाची आणि बाकीची सगळी " टेन्शन" सोडून फक्त धमाल करायची असं ठरवलंच होतं. गाडी सकाळी बरोबर ५ ला औरंगाबाद ला पोहोचली अनपेक्षितपणे वादळी गडगडाटासह "वरुण राजा" स्वागताला आला होता. मराठवाड्याच्या उष्णतेने पोळून निघण्याच्या तयारीने आलेल्या आम्हाला हा सुखद धक्काच होता. कडाक्याची थंडी पडली होती .. (बहुतेक रात्रभर पाऊस पडलेला असणार.....) आम्ही कुडकुडत बाहेर पडलो. MTDC बुक केलेलं होतंच, पण त्याआधी नातेवाईकांकडे उतरलो.

शाहीद - एक करूण कहाणी

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 16/11/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
भवानी तीर्थंकरच्या डायरीतील एक पानः लक्षवेधी: हे डायरीतील एक पान आहे. त्यामुळे इथे छायाचित्र टाकता येणार नाही. वास्तविक शाहीदला ते हवं होतं, पण डायरीतल्या पानासोबत छायाचित्र म्हणजे संपादकीय (तेच ते, अग्रलेख किंवा उग्रलेख) चौकटी असं वाटायला नको, असं आमच्या पत्रकार मित्राचं मत झालं.

शोंदेष, चोमचोम, मिष्टीदोई आणि रोशोगुल्ला

लेखक अर्धवट यांनी मंगळवार, 16/11/2010 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
*हे प्रवासवर्णन नाही, माझ्या आवडत्या शहराविषयीचा कृतज्ञतालेखच म्हणा हवे तर*
एका मुठीत लॅटपॉटची बॅग, दुसर्‍या मुठीत जीव आणि पोटाने सामानाची ट्रॉली ढकलत नेताजी सुभाषचंद्र विमानतळाच्या बाहेर आलो तेव्हा समोर गच्च गर्दीमधून भरधाव वेगाने पिवळ्या टॅक्सी जात होत्या, आणि एक टॅक्सी ड्रायवर तिथे माणसांना एका हाताने थोपवून गाड्यांना पुढे सोडत होता. मी ह्याचा अर्थ लावत असतानाच त्याचे शब्द कानावर पडले "जोल्दी जोल्दी जोल्दी... जोल्दी चोलो.. दो चार मर गया तो भी प्रोब्लेम नोई.. जोल्दी चोलो" माझं भारतातलं दुसरं सर्वात आवडतं शहर म्हणजे कोलकोता.

मी, बाटली आणि देशद्रोही

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 16/11/2010 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप! पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता.