आरती सप्रेम..
"श्रींच्या आरतीस पाच मिनिटांत सुरूवात होत आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर मंडपात उपस्थित राहावे."
अशी 'अलाऊंसमेंट' नऊ ते साडेनऊ पर्यंत निदान चार-पाच वेळा तरी केल्याशिवाय कुणीही अजिबात मंडपात प्रकट होत नाही. आमच्या सोसायटीत हे असले एकेक नग आहेत.
"आरती ना, कधीं म्हणून होतें का ती साडेंनवाच्या आधीं? तूं जेवांयस वाढ तोंवर. मग जातों सांवकाश पावणेंदहा पर्यंत. कसेबसे कर्पूरगौरास आरती ओवाळण्यापर्यंत पोहोचलें असतील तोवर!" हे आमचे आपटेबुवा. "आरत्या म्हणाव्यात तर यांनी" असा यांच्या नावाचा डंका होता!
मिसळपाव
रोझा पार्क्स
(जन्म: ४ फेब्रुवारी १९१३ मृत्यू: २४ ऑक्टोबर २००५)
रोझा लुईस हे तिचं पाळण्यातलं नाव. अगदी सामान्य गरीब घरात रोझाचा जन्म झाला. रोझा जेमतेम दोन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.