Skip to main content

समाज

.... उचल ना फोन..

लेखक ५० फक्त यांनी सोमवार, 07/03/2011 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात जाताना असं होतं, कधी कधी माझा आणि बायकोचा वाद झालेला असतो, आम्ही तसेच ऑफिसला जातो, चेहरा लगेच कार्पोरेट झालेला असतो, पण आत काहीतरी बोलायचं राहिलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं डोक्याच्या बाहेर निघायला तयार नसतं. टेबलवर फोन वाजत असतो, टॅण टॅ धॅन टॅ . voice call from **** टॅण टॅ धॅन टॅ .. मी फोन उचलत नाही तर सायलेंट करुन ठेवतो, पुन्हा ४-५ मिनिटांनी फोन टॅण टॅ धॅन टॅ . voice call f******* टॅण टॅ धॅन टॅ , आता चिडणारा दुसरा कोणितरी असतो पण डायलॉग तोच -'अरे उचल ना फोन ' . मी तरी ही फोन उचलत नाही.

"माफ कर, अरुणा.....पण नाही तुला दयामरण !"

लेखक इन्द्र्राज पवार यांनी सोमवार, 07/03/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
कायद्यातील तरतुदीपुढे न्याय पीठासनदेखील हतबल होते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आणि गेली ३७ वर्षे जिवंतपणीच 'मरण' भोगत असलेल्या अरुणा शानबाग यांच्यावतीने लेखिका पिंकी विराणी आणि अनेक वकिलांनी केलेल्या "दयामरण" अर्जातील विनंती सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू आणि ग्यान मिश्रा यांच्या खंडपीठाने "कायद्यात तरतूद नाही" या मुद्द्यावर फेटाळून लावली. "दयामरण" हा भारतातच नव्हे तर जगात अनेक देशात वारंवार चर्चेला येणारा विषय आहे. त्याची कारणमीमांसा करण्याअगोदर आपल्या कायद्यातील एका तरतुदीकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

शब्दांच्या पलिकडले !

लेखक स्पंदना यांनी रविवार, 06/03/2011 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा! बरचस सांगता येत नाही! बरचस बोलताही येत नाही ! ना डोळ्यातून डोकावण्याची मुभा असते या 'बरचस' ला! पण हे ' बरचस ' तुटत ही नाही, मिटत ही नाही ! मंडळी कल्पना करा, पन्नास वर्षापुर्वी गुंतलेल्या दोन जीवांची! बरचस जीवन उंबर्‍याच्या आत व्यतित करणार्‍या तुमच्या माझ्या आज्जीच्या वेळच्या काळाची! कुठ काहिस वादळ उठल , पण त्या वादळाला बाहेर येण्याची मुभा नसल्यान मनाच्या आतच; त्यान तांडव मांडल्यान व्याकुळ 'ती 'अन व्याकुळ 'तो'!

बिलोरी आरसा

लेखक sneharani यांनी मंगळवार, 01/03/2011 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी वेळ असाच बसून राहिलोय..! काय करावं? झोपावं म्हंटल तर झोप येत नाही अन् नुसत रिकामं बसूनही वेळ जात नाही. जावं का नदीच्या घाटावर फिरत फिरत...पण सांजकाळी कोणी फिरकत नाही तिकडं! कातरवेळ! तशातही तो एकटाच...सोबतीला स्वत:च मन! बस! आणखीन कशाची गरज होती भुतकाळ जगायला? सुर्याची किरणं कमी कमी होत होती.पाखर परतत होती त्यांच्या घरट्यांकड..! घरट्याकडं परतायची एवढी गडबड? माझ घर...! घर म्हणाव का त्याला? "म्हण ना घर!का ते घर नाही...घरात कोणी नाही म्हणून?

ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे

लेखक कापूसकोन्ड्या यांनी मंगळवार, 01/03/2011 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेट भेट-- उत्तुंग यश आणि किर्ती मिळवलेले मराठे प्रख्यात पत्रकार आणि मराठी इ-पत्रकारितेमधील एक अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणून श्री. निखील वागळे यांची ओळख आहे. त्यांच्या आय बी एन लोकमत या वाहिनी वर प्रत्येक सप्ताहांतराला प्रसारीत होणाया ग्रेट भेट या कार्यक्रमाचा मी फ्यान आहे. हो अगदी अठ्ठेचाळीस इंची. भारतात असेन तेव्हा मी हा कार्यक्रम जरुर पाहतो, अन्यथा मिळाला तर तू नळी वर (काही भाग मिळतच नाहीयेत.) या मुलाखतीं मध्ये पाहुण्यांची निवड करताना त्यांचे मराठी असणे आणि वेगवेगळ्या विषयामध्ये किर्ती आणि स्वत:ची एक स्वतंत्र ओळख असणे हे सुत्र बहुदा असावे.

''उत्तरच नसलेले कोडे''

लेखक पूनम १ यांनी सोमवार, 28/02/2011 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्टुडिओतुन एके दिवशी फोन आला ,'' काम अर्जंट आहे या'' गेल्यावर कळल कि एक documentry लिहायची आहे, महिला व बाल कल्याण खाते महाराष्ट्र ह्यांच्यासाठी. shoot अगोदर करुन झाल होत आणि झालेल्या १३ तासांचे shooting footage बघुन मला लिहायच होत. screeptwriters ना चौकटीत काम करावच लागत , पण इथे चौकट अजुन छोटी झाली होती.कल्पनेच्या आकाशात इथे विहरता येणार नव्हत. पण १३ तास अरेरे प्रचंड कंटाळ्वाण ,वाट्ल एकदा नाही म्हणाव ,पण नंतर ठरवल बघु विषय भावला तर लिहु ,अस म्हणुन दुसर्‍या दिवशी सकाळीच dvs बघायला बसले, dv tape सुरु झाली आणि त्यातल्या चल चित्रणाने मी आतुन हादरुन गेले.