Skip to main content

समाज

जोगवा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 08/02/2011 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती.

कल्पना सरोज --रोपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा.

लेखक कापूसकोन्ड्या यांनी शनिवार, 05/02/2011 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
कमानी ट्यूब ची मालकीण कल्पना सरोज रुपरखेडा या अकोला जिल्ह्यातील एक हीरा. मुंबई जवळच्या औद्योगीक आजाराने जर्जर (एकूण ₨ १६० कोटी कर्ज) झालेली बि आय एफ़ आर लिस्टेट कंपनी त्याब्यात घेणारी सरोज एक दलित समाजात जन्माला आलेली अत्यत खडतर प्रवास करत आलेली एक धडाडीची इन्ट्र्प्रुनर --तीन हजार कोटी रूपयाची मालकीण असलेल्या कल्पनाची कहाणी चित्तथरारक आहे. सुमारे ४८ वर्षांचे वय असलेल्या कल्पना ताईंचा एक मुलगा पायलट आहे आणि मुलगी उच्च शिक्षण घेत असलेली आहे.

रिक्षावाले

लेखक अर्धवट यांनी शुक्रवार, 04/02/2011 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही शहरातले रिक्षावाले यांचं माझ्याशी नक्की नातं काय हा प्रश्न मला अजून सुटलेला नाहीये. माझ्या चेहरयावर केवळ ह्या लोकांनाच वाचता येणाऱ्या भाषेत कायमचा एक यडबंबु भाव कोरून ठेवला असावा, किंवा त्यांना केवळ माझा चेहेरा पाहून 'हा येणारा इसम अगदीच ‘हा’ असून ह्याला गंडवलं नाही तर संघटना आपल्याला वाळीत टाकेल' अशी भीती वाटत असावी. नेमका मी गेल्यावर ‘ह्याला आपल्या घरी आज फुकट जेवायलाच घेऊन जायचंय’ असे चेहरे करून बघतात लेकाचे. त्रास ‘नाही’ म्हणल्याचा होत नाही हो, ते ज्या हलकट्ट सुरात म्हणतात त्याचा होतो.

प्राचीन ग्रंथांचे ऑनलाईन ग्रंथालय: विश्वास भिडे यांचा उपक्रम

लेखक यकु यांनी मंगळवार, 01/02/2011 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, दासबोध, एकनाथी भागवत आणि सार्थ वाल्मिकी रामायण, महाभारताचे जवळपास सर्व खंड, ऋग्वेद, जोनाथन लिव्हींग्स्ट्न्स सीगल आणि असे सुमारे दीडशे ग्रंथ एकाच वेळी, तेही फुकट आपल्याला मिळू शकतात? होय. सांगली येथील श्री. विश्वास भिडे यांनी स्वत:च्या स्वेच्छानिवृत्तीच्या काळात पुरातन ग्रंथांना डिजीटलाईज्ड करण्याचे काम हाती घेतले आणि सुमारे दीडशे ग्रंथ अंतर्जालावर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. म.टा.

असंच, आपलं कहीतरी.....

लेखक नरेशकुमार यांनी मंगळवार, 01/02/2011 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलगा होता. असाच कुठेतरी भटकत असताना त्याला एक सुंदर बगीचा दिसला. त्यात काही मुले आनंदाने खेळत बागडत होती. मुलाची सुद्धा इच्छा झाली कि तिथे जाऊन आपण खेळावे. त्याने त्या बागेत प्रवेश केला. थोडा वेळ खेळून झाल्यावर त्याचे कुणाबरोबर तरी भांडण झाले. मुलगा हिरमुसले तोंड करू परत घरी आला. त्याची बागेत खेळायला जाण्याची इच्छा होती. पण आता कसे जायचे याचा तो विचार करू लागला. काही वेळाने त्याला त्याच्या एक मित्राने एक सुप्पर आयडिया दिली. दुसर्याच दिवशी तो पुन्हा बागेकडे निघाला. वाटेत जाताना त्याने एक मुखवटा विकत घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर चढविला.

हा मराठी माणसा बद्दल आकस का ?

लेखक मराठी_माणूस यांनी रविवार, 30/01/2011 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळि खालील लेख वाचनात आला. हे एका पुस्तकाचे परीक्षण आहे . त्यात बासू चटर्जींनी त्यांचे काही अनुभव सांगीतले आहेत. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7386077.cms त्यात बासुदानी चीत्रपटात राजा परंजपे ना घेतल्या बद्दल , ताराचंद बडजात्यानी खालील हीणकस शेरा मारला आहे ' आप किसको लाये है ये मराठी से?' कोणतीही गुणात्मक टीका नसुन फक्त मराठी म्हणुन ईतकी टोकाची भुमीका ? तीही मराठीतील इतक्या गुणी अभीनेता आणि दिग्दर्शका बद्दल ?

एक धागा...

लेखक दिनेश५७ यांनी रविवार, 30/01/2011 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याचा धागा... लातूर जिल्ह्यातल्या भीषण भूकंपाने हजारो संसार उद्ध्वस्त केले. शेकडो बालके अनाथ झाली आणि असंख्य कुटुंबांच्या डोक्यावरची छपरे नष्ट झाली. या भूकंपाने देश हादरला. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी शेकडो हात सरसावले. सोलापूरच्या एका शाळेतील काही शिक्षकांनीही भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी धाव घेतली. अजित जोशी नावाचा मुलगा तेव्हा दहावीत होता. त्याचे वडील सोलापुरात शिक्षक होते. त्या मदतकार्यात तेही सामील झाले.