Skip to main content

समाज

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

लेखक विनायक बेलापुरे यांनी मंगळवार, 05/04/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा.

त्या 'यो'

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 05/04/2011 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला होणारा फायदा याचा विचार करून, ती यादी मला आधी कळवुन वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होते. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर ट्रेनिंग रूम मध्ये पोहोचलो.

उन्मन क्षण

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 05/04/2011 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
मुलाचा तमीळ सहकारी रुपेश आणि इतर मित्रही घरी आले होता गप्पा मारायला, क्रिकेट वर्ल्ड कपचा जल्लोष संपला तरी चर्चा चालूच होत्या. For a change, मी सीएनएन लावलं. Anderson Cooper चं AC 360 चालू होतं, जपान मधल्या हाहा:काराचं वर्णन संपून सुरु झालं ते मध्य-पूर्वेत आणि इतरत्र पसरतच चाललेल्या अशांततेचं सविस्तर कव्हरेज. ट्युनिशिया आणि इजिप्त पासून सुरु झालेली जन-क्रांतीची लाट पसरत चालली आहे.... सिरीया, बहारीन, जॉर्डन तसंच लिबिया आणि येमेन - वडवानलासारखा जनेच्छेचा रेटा प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देतोय, कुठे तरी एखादा ओळखीचा नेता, पण बराचसा निर्नायकीच संग्राम.

थोडेसे 'रंग'वणे

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/04/2011 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
वडापाव मिळणार असे समजून जावे आणि अचानक पुरणपोळी समोर यावी तसा मिसळपावावर 'थोडेसे शब्दवणे' हा लेख सामोरा आला. अलवार पुरणपोळीवर पातळ तुपाची धार पडून डाराडूर वामकुक्षीची दवंडी पिटणारा. शब्दनशब्द दवणीय रसाने ओथंबलेला. 'लिखाळ' हे दवण्यांचे टोपण नाव तर नव्हे असे वाटून मी नखे कुरतडतो! पुलाखालच्या कविता करण्यासाठीच खरेतर लिखाळाने कलम हाती घ्यावे. त्याच्या भेसूर कवितेचे जसे शब्द, तसे हे उंबराला आलेले फूल. लिखाळाच्या अनिर्बंध काळ गायब होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी प्रतिसाद कर्त्यांचे सर्व प्रयत्न. पण तो या सर्वांहून फार हुशार.

शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 04/04/2011 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
शेतकरी संघटक : वर्धापनदिनाच्या निमित्ताने ही गोष्ट आहे १९८६-८७ च्या सुमारातली. सुरेश चोपडे सकाळी ६ च्या सुमारास माझ्या वर्धेतील खोलीवर आला आणि आल्याआल्याच अगदी दारावरूनच हुकूम सोडला. “ए आवर रे पटकन, आपल्याला तातडीने निघायचे आहे.” मी सुद्धा कुठे,कशाला,कशाने वगैरे कोणताही उपप्रश्न न विचारताच तयारी केली आणि बाइकवर बसलो. तो येतानाच रवीभाऊ काशीकर यांचेकडूनच बाइक घेऊन आला होता. रस्त्याने निघालो आणि मग सांगायला लागला. “मुरलीचा (मुरलीधर खैरनार) फोन होता. ‘आठवड्याचा ग्यानबा’ अंक प्रिटींगला गेलाय पण कागदाला पैसे नाहीत म्हणून छपाई थांबली आहे.

यांना विसरुन कसे चालेल ?

लेखक कुंदन यांनी रविवार, 03/04/2011 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही आम्ही सर्व जनता विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद लुटत असताना , मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या मुंबई पोलिस दलाला प्रचंड तणावाखाली काम करावे लागलेले असणार आहे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सलाम. या संबंधीची एक बातमी "इथे"