''उत्तरच नसलेले कोडे''
स्टुडिओतुन एके दिवशी फोन आला ,'' काम अर्जंट आहे या''
गेल्यावर कळल कि एक documentry लिहायची आहे, महिला व बाल कल्याण खाते महाराष्ट्र ह्यांच्यासाठी. shoot अगोदर करुन झाल होत आणि झालेल्या १३ तासांचे shooting footage बघुन मला लिहायच होत. screeptwriters ना चौकटीत काम करावच लागत , पण इथे चौकट अजुन छोटी झाली होती.कल्पनेच्या आकाशात इथे विहरता येणार नव्हत.
पण १३ तास अरेरे प्रचंड कंटाळ्वाण ,वाट्ल एकदा नाही म्हणाव ,पण नंतर ठरवल बघु विषय भावला तर लिहु ,अस म्हणुन दुसर्या दिवशी सकाळीच dvs बघायला बसले,
dv tape सुरु झाली आणि त्यातल्या चल चित्रणाने मी आतुन हादरुन गेले.
मिसळपाव