समाज
पुणे पासपोर्ट ऑफिसचा त्रास
मानसिक त्रास
काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती.
१.व्यवस्थित भरलेला फॉर्म
२.रीसीट
३.आधार कार्ड
४ पॅन कार्ड
५. शाळा सोडल्याचा दाखला
६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट
७. अॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी)
८.अॅनेक्चर ए ( जन्मगाव )
९. लाइट बिल
१०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने)
वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते.
प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले .
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३७
मागिल भाग..
"तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो.
पुढे चालू...
=====================
"गगन...सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश.... देई अभय...गगन...सदन..."
"आत्मू... अरे तुझी ती गाणी किती वस्तू कुठे कुठे विसरायला लावतात रे........!!!
कर्तृत्व
माझी मुलगी ११ वर्षांची आहे, काल तिच्याशी बोलताना सहज काही विषय निघाला आणि तिला मी २-३ मिनिटात एक एक करून जयदेव पायेंग , बाबा आमटे, प्रकाश आमटे, बंकर रॉय, पोपटराव पवार यांच्या गोष्टी सांगीतल्या. त्यांनी काय काम केले, कशा परिस्थितीत केले, त्याने कोणाला काय फायदा झाला इत्यादी इत्यादी. हेतू हा की तिला सध्या वेगळे काम करणाऱ्या लोकांची ओळख व्हावी आणि थोडे इन्स्पीरेशन मिळावे.
या गोष्टी मी मला त्यांचे काम जसे आठवेल तसे सांगितले,त्यातील काही बरोबर,काही चूक तर काही अर्धवट असेल,पण तिला या गोष्टी आवडल्या. टेड वरचा बेअरफुट कॉलेजचा व्हिडिओ पण दाखवला.
कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे.
जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?
गनिमी कावा
विचारत इकडे तिकडे आले
आज पाहुणे घरात आले
अहाहा सदन धन्य झाले ..
निवांत खुर्चीवर ते बसले
मान डोलवत जरासे हसले
रुमालाने तोंडही पुसले ..
'कसे काय तुम्ही वाट चुकला
आठव आमचा कसा जाहला ?'
- गूळपाणी देत प्रश्न विचारला ..
ओशाळवाणे पाहुणे हसले
हळूच इकडे तिकडे पाहिले
प्रश्नाचे उत्तर देणे टाळले ..
पिशवीतून मोबाईल काढला
रुमालाने स्वच्छही पुसला
माझ्या हाती तो सोपवला ..
"गनिमी कावा" त्याचा ध्यानी
आला माझ्या त्याच क्षणी
मुकाट उठलो हाती धरुनी ..
जर्जर जीव त्या पाहुण्याचा
"चार्जर" विसरला मोबाईलचा
शोधला पत्ता माझ्या घरचा .. !
.
काव्यरस
मानवी स्पंज आणि स्प्रिंग!
तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील.
Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो.
गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं.
रसज्ञ नरभक्षक
कां उगीच घाबरतोय आम्ही?
कां उगीच गळा काढून रडतोय?
कां उगीच त्यांचा वारसा सांगतोय?
तो नरभक्षक चटावलाय
आपला क्रुस
आपल्याच खांद्यावरून वाहणार्या
महात्म्यांच्या रक्ताला
तो क्रुस खांद्यावरून वाहण्यासाठी
खांदे मजबूत लागतात
ख्रिस्तासारखे
गांधीबाबासारखे
दाभोलकरांसारखे
पानसरेंसारखे
आजन्म व्रतस्थ जनसेवेतून
बहूमताच्याही विरोधात सत्यच सांगेन
अशा निर्धारी आचारातून
ऋशींनाही लाजवेल
अशा निर्मोही चारित्र्यातून
मजबूत होतात असे खांदे
आमची जनसेवा
सोयीची आणि सवडीची
थोडेसे दमल्यावर
कुणी लालूच दाखवल्यावर
कुणी धमकावल्यावर
क्रुस टाकून पळून जाणारे भेकड आम्ही
आमचे रक्त चालत नाही त्याला
भुकेला तरी
चवीचा रस
मिसळपाव