Skip to main content

समाज

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४१ .. (खेडेगावातील नाटक..)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 17/04/2015 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि अश्या वातावरणात मग ते नाटकं सुरु झालं. नाटकाचं नाव होतं............... पुढे चालू... ====================================== रामाची सीता... हां ...... , पण ह्यात गोंधळाल हां तुम्ही. आता 'रामाची सीता...' ह्या नावाची ट्रॅजिडी म्हणजे, खरं तर या वर्षी ठरलेलं नाटक होतं- सीता स्वयंवर . पण पहिल्यांदा तालमी सुरु झाल्या आणि हुंबैस्नं मिलवलेली प्रोपेशनल नटी ठरल्या मानधनाच्या दुप्पट मागायला लागली. आणि मग आली पंचाइत सगली.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४०

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/04/2015 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि ह्या काहिश्या समाधानानी दाटलेल्या हृद्य प्रसंगी, काकूचा निरोप घेऊन आंम्ही घराकडे परतलो. पुढे चालू... =================================================== काहि व्यवसायच असे असतात..की त्यामधे सुट्टी घेण्याचं स्वातंत्र्य असलं,तरी ती मिळण्याचं असेलच असं नाही. आता हेच बघा ना.. मी इकडे दिडदोन महिन्याकरिता आलो आणि त्यातले पंधरावीस दिवस गेले कसे ते खरच कळलं नाही..असं म्हणण्यासारखे दिवस सुखात चाललेले होते.

इतिहासाचे मारेकरी आणि पहारेकरी

लेखक विकास यांनी बुधवार, 15/04/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
सुभाषबाबूंच्या संदर्भातील गेल्या काही दिवसात आलेल्या अधिकृत बातम्यांवरून मिपावर नको इतके चर्वितचर्वण झालेले दिसले. त्यामुळे जरी वरकरणी विषय समान असला तरी चर्चेचे मुद्दे वेगळे आहेत हे कृपया सर्वांनी विचारात घ्यावे. सुभाषबाबूंचा इतिहास हा "आजच्या संदर्भात" सगळा आदर्श नसावा. त्यांच्या उद्देशांवर (देशाचे स्वातंत्र्य) कोणी शंका घेऊ शकेल असे मात्र वाटत नाही... आणि हे मी काही ते सशस्त्र क्रांतीचे सक्रीय समर्थक होते म्हणून म्हणतोय असे समजू नका. त्यात काहीच गैर नव्हते. ज्यांना सक्रीय क्रांती करणे जमले ती त्यांनी केली आणि ज्यांना नि:शस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 14/04/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. मी दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहाच्या पहिल्या येश्टीनी गावाकडे निघालो.. पुढे चालू... ========================================== आणि पुन्हा येकवार तो येश्टीचा कंटाळवाणा परंवास करुन, मी दुपारच्या चिडचिडं करणार्‍या तिनाच्या तिरप्या उन्हात मुक्कामी पोहोचलो. बघतो..., तर चक्क काका त्याची ती भल्यामोठ्ठ्या क्यारियरची सायकल घेऊन स्वागताला उभा असल्यासारखा उभा.आणि बरोबर संघटनेतल्या दोनचार पोरांचं कोंडाळंही.

हरवला जीव तो …

लेखक अनामिक२४१० यांनी सोमवार, 13/04/2015 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
हरवला जीव तो … कुठे शोधू समजता समजता सापडेना.....!!! जीव लागला मागं त्याचं त्यालाच समजेना हरवून पण गवसला तो जीव थांबता थांबता थांबेना.....!!! वेडाच जीव तो आस लागलीया माग हरवलेल्या उत्तराची … स्वत:च धावूनिया लागे त्या वेड्या उत्तरासाठी गुंतून गेला जीव तो वाट पाहता पाहता थांबेना … !!! विचाऱ्याच्या गराड्यात अडकलेला तो जीव बाहेर येईना अजिचेयी .... कसं हे जीवनाच कोडं त्यालाच उत्तर मिळेना तरीसुद्धा जीव तो प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत धावायचं … … थांबता थांबता थांबेना.…...!!!

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३८

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 12/04/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. जिन्याच्या पायर्‍या चढू लागलो.. पुढे चालू... ================================== अर्थातच हा जिना मी प्रथमदर्शनी जरी एका इमारतीचा चढत असलो,तरी मनामधे जी चढण सुरु झाली होती, ती एका व्यवसायिक वटवृक्षाची होती..याचा मला तेंव्हा अंदाजंही आलेला नव्हता. काय आहे ना? की कुठल्याही नोकरीधंद्यात प्रथम प्रथम माणासाला सशाची कातडी प्राप्त झालेली असते. प्रत्येक नविन गोष्ट करताना तो घाबरतो,चाचपडतो..हे करु की नको? चुकेल की बरोबर येइल? हे असच-असतं का? असले ढीगभर प्रश्न त्याला पडतात.

सांगावा (शतशब्दकथा)

लेखक खेडूत यांनी बुधवार, 08/04/2015 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
गुटख्याचा भपकारा आला तशी पारू सावध झाली. वासामागनं आन्ना ग्रामशेवक आला. कसल्यातरी फॉर्मवर आंगटा घ्यायाचा म्हनला . येका आटावड्यात तिसऱ्यांदा आलंय. निराधार योजनेचं काम करतो म्हनतुया - बगू. जाताना म्हनला, '' काय ? आटापलं सैपाकपानी-आंगुळ ? '' नस्त्या चौकशा मुडद्याला ! *** जैवंता मेल्यावर दादा म्हनलावता वडगावला चल परत. पन पोरास्नी घिउन कुटं तेनच्यात ऱ्हानार ! आपलीच झोळी फाटकी. नगु मनलं. पेन्शल मिळंल . पर गावातल्या मानसांची नजरच लई वंगाळ ! काय वाटलं अचानक - आन गेली कासाराच्या दुकानात. फोनच्या मशिनीत त्येनंच नंबर फिरीवला. दादाचा आवाज आल्याव रुपाया टाकला. मंग आवाजच फुटंना !

सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

लेखक पगला गजोधर यांनी बुधवार, 08/04/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……! टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी :: १६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता.

मराठी

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 08/04/2015 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रात मराठी चित्रपट सिनेमागृहात प्राइम टाइम ला दाखवणे चित्रपटगृहांना अनिवार्य करण्यात आले ही बातमी वाचली. ट्विटरवर या विरोधातील पोस्ट्स मुळे का होईना #Marathi ट्रेंडिंग झालं.