Skip to main content

समाज

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३६ (विवाह विशेष...-३..अंतिम.)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 18/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. " बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????" पुढे चालू... ================================= हा सर्व संवाद माझ्या मनात अमृतासारखा झिरपत होता..आणि मी त्याच चिंतनमय अवस्थेत कधी शांत झोपि गेलो,ते कळलंही नाही. .............................................. कोकणात पहाटे एखादं लग्नघरच काय?..परंतू सर्व गाव, आजंही तसं लवकरच उठत असतं.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३५ (विवाह विशेष...-२)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 16/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मागुन येऊन मग मला अचानक काकूनीच जागं केलन. "अरे आत्मू..आता जरा ध्यानातून बाहेर ये...आणि तुझ्यासाठी जे ध्यान तिकडे आत डोळे-लावून बसलय ना? त्याच्यासाठीच्या तयारीला लाग..जा .. आवरायला घे त्या शेजारच्या घरात जाऊन... जा!" असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन... पुढे चालू... ============================ वस्तुतः आमची मित्रमंडळी आणि मी स्वतः देखिल,या आदल्या दिवशी वांङनिश्चय वगैरे करण्याच्या विरोधी होतो.

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी सोमवार, 16/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.

दीक्षितांचा दणका

लेखक पिंपातला उंदीर यांनी गुरुवार, 12/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्ट ,अन्यायी आणि कुणालाही आपल्या पाशवी शक्तीने चिरडून टाकण्याची क्षमता असणारी सिस्टम आणि या सिस्टम विरुद्ध उभा ठाकलेला एक सर्वसामान्य माणूस. हा लढा अर्थातच खूप विषम आहे . पण सगळ्यात भारी गोष्ट ही की कधी कधी या युद्धात सर्वसामान्य माणूस पण जिंकू शकतो . प्रचलित सर्वशक्तिमान व्यवस्थेने कितीही आसुरी बळाचा वापर केला तरी . या लढ्यात रोजच्या अवघड जगण्याला पिचलेली आणि कुठल्याही कामासाठी चिरीमिरी द्यावी लागणारी जनता नेहमी व्यवस्थे विरुद्ध उभा ठाकलेल्या माणसाच्या मागे उभी राहते हा जागतिक नियम .

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३४ (विवाह विशेष...)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 11/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. अरे व्हायचं काय आणखिन आता त्यात?...तिच्या आई बापास सगळे बोललो नीट.आणि पुढल्या पौर्णिमेच्या मुहुर्ताला 'बैठकिचे' - सगळे ठरवुन आलो...आता दे बरं मला टाळी!" पुढे चालू... ================================== आणि मग,झाली...अखेर ती बैठक की कायशी म्हणतात ज्याला जुन्या श्टाइल मधे.., ती बैठक झाली. फक्त उलट आश्चर्य म्हणजे, बाबां ऐवजी आज्जीच आमच्या विवाहास 'कमी वय' म्हणून 'अजुन चांगली(?) दो.......न वर्ष जाऊ देत,मग करा लग्न' असा आक्षेप घेत होती. पण शेवटी काकानी आज्जीला. "आगो मायो माझे...

स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ?

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 10/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच "सुखी" असलेले स्पष्टवक्ते "स्पष्टवक्ता सुखी भव" या म्हणीमुळे आणखीनच सुखावतात आणि त्यांना चेव चढतो. ही म्हण तयार करणारांनी फक्त एकतर्फी विचार केलेला आहे. म्हणजे त्यांनी या तथाकथित स्वयंघोषित स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांचा विचार केलेलाच नाही. म्हणून सर्वप्रथम मी ही अपूर्ण म्हण पूर्ण करतो ती अशी: "स्पष्टवक्ता सुखी भव । कष्टश्रोता दु:खी भव ।" स्पष्टवक्ते लोकांच्या बोलण्याची शिकार झालेल्या आणि त्यामुळे दु:खी कष्टी झालेल्या बिचार्‍या बापुड्या श्रोत्यांना आपण "कष्टश्रोता" म्हणूया!

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 09/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि मी मात्र रात्रिची जेवणं झाल्यानंतर..झोपताना काहि क्षण पुन्हा त्या देवळातल्या प्रसंगाच्या शेवटाला गेलो. मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर??? पुढे चालू... ================================ त्या कार्यक्रमा नंतर घरी आलो खरा.पण खरा कुठे??? खरा तिकडेच राहिलो होतो. मन थार्‍यावर रहात नव्हतं. सरळ जाऊन आईला विचारावं,तर तिचा गैरसमज होइल की काय? ही भिती.

चलती का नाम गाडी- ६: वाहन सुरक्षितता

लेखक खेडूत यांनी शनिवार, 07/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
चलती का नाम गाडी-१: टोयोटा रिकॉल चलती का नाम गाडी-२: गुंतागुंत चलती का नाम गाडी-३: नवी फीचर्स चलती का नाम गाडी-४: प्रदूषण नियंत्रण (युरो नॉर्मस) चलती का नाम गाडी- ५: वाहन चौर्य प्रतिबंधन मागच्या भागात चौर्य प्रतिबंधक उपाय कसे आणि किती प्रकारचे असतात ते आपण पाहिले. आता सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा विषय पाहूयात.

वाडा (भाग 2)

लेखक जयंत माळी यांनी शुक्रवार, 06/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्या दिवशी सकाळी रामरावांचे लक्ष त्या खोलीकडे गेले तर त्यांच्या लक्षात आले की कोणीतरी ती खोली उघडली आहे.

वाडा ( भाग 1 )

लेखक जयंत माळी यांनी बुधवार, 04/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
------ वाडा ------------- नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी जयंत माळी घेऊन आलोय एक खास भयानक कथा. ही कथा पुर्णत: काल्पनीक असून या कथेतील पात्रे , घटना , स्थळ यांचा कोणत्याही खर्या घटनेशी संबंध नाही. तसे आढळल्या तो निव्वळ योगायोग समजावा कथेचा लेखक :- जयंत माळी कथेतील पात्रे : 1} रामराव चंद्रकांत पाटील ( माजी सरपंच ) 2} विकास रामराव पाटील 3} सुखदा विकास पाटील 4} सचिन शर्मा 5} विनायक शर्मा डोंगराच्या कुशीत वसलेले आई जगदंबेची कृपा असणारे करेवाडी गाव. रामराव पाटील या गावचे माजी सरपंच. रामरावांना गावात भरपुर मान होता.