गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३१
मागिल भाग..
फक्त तो जेव्हढा याबाबतीत सशक्त होत जाइल्,तेव्हढं हे फळ आपल्याला अधिकाधिक खणखणीत आणि वाजवून मिळेल.
================================
अध्ययन आणि खरेखुरे गुरुसंस्कार याच्या सहाय्याने आंम्ही मुलं खरोखर मोठी होत होतो.आणि अपरिहार्यपणे पाठशाळेतून बाहेर पडायचं वर्षंही जवळ येत चाललेलं होतं. आंम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला तो एक अत्यंत जड अवघड दिवस असे. अगदी माझ्या चार महिने आधी,असेच ३ विद्यार्थी अध्ययन संपवून शाळेतून बाहेर पडले होते. त्यात ती जोडगोळीही होती. श्रीराम व जयराम .
मिसळपाव