खंत
आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी इथल्या ‘मेमोरिअल हर्मन’ हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये सकाळी ९.३० वाजता पोहोचायचे होते. हॉस्पिटल घरापासून अंदाजे सहा मैलावर असून ड्राईव्ह टाईम अंदाजे ३० मिनिटांचा होता. हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यासाठी जरा लौकरच म्हणजे साडेआठच्या सुमारास घरून कारने निघालो. वाटेत एका सिग्नलजवळ अपघात झाला होता, फार काही झाले नव्हते, फक्त एका कारने पुढील कारला मागून ठोकले होते. इथल्या प्रथेनुसार दोन्ही गाड्या रस्त्यावरच उभ्या होत्या, पोलिसांनी बाजूची लेन देखील अडवून ठेवली होती. पोलिसांच्या हजेरीतच दोन्ही गाड्यांच्या ड्रायव्हर्स आपापले ड्रायव्हर लायसन्स, इन्शुरन्स पेपर्स, टेलिफोन नंबर एकमेकांना देण्याचे सोपस्कार पार पाडत होते. पण ह्या सर्व गोष्टी जेथे अपघात झाला तेथेच चालल्यामुळे चार लेन्स पैकी, दोन लेन्स बंद पडल्या होत्या आणि त्यामुळे, ट्राफिक बऱ्यापैकी जाम झाले होते. माझ्याकडे अर्धा तास जास्तीचा असल्याने मला फारशी घाई नव्हती, तरी देखील ह्या जाम मधून लवकर बाहेर पडावे असे मनोमन वाटत होतेच. अपघाताची जागा ओलांडून हळूहळू मी मोकळ्या रस्त्यावर आलो, पुढची गाडी अगदीच हळू चालत असल्यामुळे लेन बदलण्याचा सिग्नल देऊन मी लेन बदलणार होतोच, इतक्यात मागील गाडी, माझ्या सिग्नलला न जुमानता बाजूच्या लेनमध्ये आली. मी जर अलर्ट नसतो तर मी ज्या लेनमध्ये गाडी घेणार होतो त्याच लेनमधून मागून येणार्या गाडीने माझ्या गाडीला मागून धडक दिली असती. सहसा येथे असे होत नाही. एकदा का पुढील गाडीने सिग्नल दिला की मागून येणार्या गाड्या त्या सिग्नलचा मान राखून, पुढील गाडीस अपेक्षित लेन अथवा टर्न घेऊ देतात. मी ह्या अनपेक्षित आलेल्या गाडीमुळे एकदम दचकलो, मनोमन त्या गाडीच्या ड्रायव्हरला शिव्या हासडल्या आणि लेन न बदलता गाडी स्लो केली. ती गाडी थोडी पुढे आल्यावर जाणवले की त्या गाडीची ड्रायव्हर एक आफ्रिकन अमेरिकन स्त्री होती. ह्या आफ्रिकन अमेरिकन लोकांची वर्तणूक पाहता तिच्याकडून ह्याहून वेगळ्या वागण्याची अपेक्षा नव्हतीच. ‘आफ्रिकन अमेरिकन’ म्हणजे ‘निग्रो’ वंशाची लोकं, परंतु येथे ‘निग्रो' शब्द अपमानकारक (शिवी सदृश्य) असल्याने त्यांना ‘काळे’ म्हणण्याची प्रथा आहे. ‘आफ्रिकन अमेरिकन’ हा त्यातल्या त्यात संसदीय शब्द, तरी देखील त्यांना ‘काळे' (Black) म्हटलेलं चालतं.
हे आफ्रिकन अमेरिकन, अमेरिकेत आफ्रिका खंडातून गुलाम म्हणून आणले गेले. कित्येक शतके ते गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडले होते. अब्राहम लिंकन आणि मार्टिन ल्युथर किंग ह्यांच्या अथक प्रयत्नाने, गुलामगिरीचे जोखड त्यांच्या खांद्यावरून दूर झाले आणि त्यांना सामान्य जनांसारखे अमेरिकेचे नागरिकत्व बहाल केले गेले. जरी ते अमेरिकेचे सामान्य नागरिक म्हणून ओळखले जाऊ लागले तरी सन्मान त्यांच्या वाट्याला फारसा आला नाही. आजही अमेरिकेतील तुरुंग पंच्याहत्तर टक्क्याहून जास्त काळ्यांनीच भरले आहेत. अत्याचार त्यांच्यावरच जास्त होताहेत. शिक्षण, नोकरी, सामाजिक समानता त्यांच्या वाट्याला फारशी येत नाही. अजूनही ह्या लोकांत शिक्षणाचा प्रसार, आरोग्य, व्यसनांपासून मुक्ती फारशी झाली नाही, आजही ते दारिद्र्याच्या,अज्ञानाच्या खाईत खितपत पडले आहेत. आता त्यांना ‘मायनॉरिटी’ म्हणून सरकारकडून अनेक सुविधा, मदती देखील मिळतात त्यामुळे त्यांच्या ह्या मागासलेपणाला ते स्व:ता देखील तितकेच जबाबदार आहेत. हे सर्व जरी असले तरी देखील पूर्वग्रहदूषित विचारसरणीचा फटका त्यांना जास्त बसतो, ही वस्तुस्थिती आहे.
त्या काळ्या बाईने मला ओव्हरटेक करताना दाखवलेल्या उद्दयामपणाची, उर्मटपणाची चीड तर मला आलीच होती, तरी राग आणि अपमान गिळून मी तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यात ती बाई थोडे पुढे जाऊन, आपल्याकडे ड्रायव्हर मंडळी गुटखा, तंबाखू वगैरे खाऊन थुंकण्यासाठी, गाडीचा दरवाजा उघडून जमिनीवर पिचकारी मारतात, त्याप्रमाणे सिग्नलला दरवाजा उघडून जमिनीवर पचकन थुंकली. ते बघून तर आणखीनच राग आणि किळस आली, पण करणार तरी काय ? हे लोक कधीच सुधारणार नाहीत असा मनाशी विचार करून पुढे निघालो.
घरून लवकर निघाल्यामुळे वेळेआधीच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. ब्लड सँपल वगैरे दिल्यावर पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमधून मेन रिसेप्शन एरियात, तिथल्याच एका लॅब टेक्निशियन बरोबर चालत येत होतो. वाटेत रेडीओलॉजी डिपार्टमेंट लागले. तेथील कॉरीडॉरमध्ये, नुकतीच ट्रीटमेंट घेऊन एका व्हील चेअरवर एक साधारण पन्नाशीची काळी बाई बसली होती. डोक्यावर हॉस्पिटलची हिरवी कॅप, अंगावर हिरवा गाऊन, दोन्ही नाकात ऑक्सिजनसाठी नळ्या होत्या, तसेच हाताच्या पंजावर आयव्हीज लावून व्हील चेअरलाच टांगलेल्या बाटलीतून सलाईन चालू होते. तिला दुरून पाहतानाच तिच्या चेहऱ्यावरचे थकलेले, अशक्त भाव स्पष्ट दिसत होते. बहुतेक ‘किमो’ ट्रीटमेंट घेऊन ती निघाली होती. आम्ही चालत चालत तिच्या बाजूने पुढे गेलो आणि अचानक, “गुड मॉर्निंग, जंटलमेन" हे शब्द ऐकू आले. आम्ही चपापून थांबलो, त्या व्हील चेअरवरील स्त्रीने आम्हाला गुड मॉर्निंग म्हंटले होते. थोडेसे ओशाळं होऊन, मागे वळून त्या स्त्रीला, चेहऱ्यावर हास्य आणून “गुड मॉर्निंग” केले आणि खाली मान घालून परत पुढे चालू लागलो. माझ्या बरोबर असलेल्या टेक्निशियनच्या मनात काय भाव उमटले असतील हे सांगता येणं कठीण आहे, पण मला मात्र माझी स्व:ताची अतोनात लाज वाटली. तिच्या ‘जंटलमेन’ ह्या संबोधनाला आपण किती नालायक आहोत हेच सारखं मनात येत राहिले. एका असाध्य आजाराने स्व:ता ग्रासली आणि त्रासली असताना देखील, चेहऱ्यावर स्मित हास्य आणून आम्हाला ‘गुड मॉर्निंग’ करणाऱ्या त्या स्त्रीच्या मानसिकतेला सलाम करावासा वाटू लागला. असं म्हणतात की स्मशानात येतं ते ‘स्मशान वैराग्य', परंतु खरे वैराग्य माझ्या मते हॉस्पिटलमध्येच येतं. आपण जर प्रकृतीने ठीक असू आणि आसपास टर्मिनली आजारी लोकांना पाहिले की मनात जे विचार येतात ते खरे वैराग्याचे विचार. हॉस्पिटलमधील पेशंट्सना पाहिले की देवाने आपल्याला धडधाकट शरीर देऊन किती उपकार केले आहेत हे ध्यानात येतं आणि देवाचे उपकार मानावेसे वाटू लागतात. जीला शुभेच्छा, शुभ चिंतनाची खरी गरज आहे अश्या त्या आजारी स्त्रीने स्व:ताच्या आजारपणात आमच्या सारख्या धडधाकट पुरुषांना शुभ चिंतन करावे आणि आम्हाला ते साधे सुचू देखील नये, ह्याची जाणीव होऊन मन एकदम खजील झालं.
“सर्वच काळे वाईट, त्यांना मॅनर्स नसतात, सामाजिक जाणीवांच्या बाबतीत ते शून्य असतात,” हा एक गैरसमज मनात घर करून राहिला होता त्याला ह्या “गुड मॉर्निंग, जंटलमन” ने एकदम तडा गेला. विनयशील वागणं हे वंशावर आधारित नसून स्वभावावर अवलंबून असते हेच खरं.
स्व:ता धडधाकट असताना, एका व्हील चेअरवर बसलेल्या आजारी स्त्रीला साधे ‘गुड मॉर्निंग’ करण्याचे सौजन्य मी दाखवू शकलो नाही ह्याची खंत अजूनही उरात आहे.
याद्या
4722
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रांजळ आत्मकथन आवडलं
लेख आवडला . (स्वगत :मिपा
नक्कीच नाही.
In reply to लेख आवडला . (स्वगत :मिपा by उगा काहितरीच
+१
लेखन आवडले. माझ्याकडूनही अशा
+१
In reply to लेखन आवडले. माझ्याकडूनही अशा by रेवती
आवडलं!!
मनोगत आवडले !
खूप छान!
लेखातील संदेश चांगला आहे यात
ओजी साब्जी हम कुष नै बोल्ता …
अस्संच थोडं मनात आलं
In reply to ओजी साब्जी हम कुष नै बोल्ता … by पगला गजोधर
पुण्यात ब्राह्मणांच्या नजरेत
In reply to अस्संच थोडं मनात आलं by तुषार काळभोर
पहिली गोष्ट म्हणजे जगातली
In reply to पुण्यात ब्राह्मणांच्या नजरेत by मृत्युन्जय
???
In reply to पहिली गोष्ट म्हणजे जगातली by अनुप ढेरे
+१ सहमत
In reply to पुण्यात ब्राह्मणांच्या नजरेत by मृत्युन्जय
शतश्: धन्यवाद
In reply to +१ सहमत by तुषार काळभोर
लेखन आवडले...
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Increased Chinese fighter aircraft operations at the Kashgar airfield.छान लिहिलंय
आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी
पुर्वग्रहदुषीत दृष्टीकोनाचे कारण - आलेले इतर अनुभव
In reply to आज सकाळी, ब्लड रिपोर्टसाठी by मराठी_माणूस
चूक
अगदी बरोबर.
In reply to चूक by नाखु
आवडलं, लिहित रहा
आभार !
लेख आवडला. पूर्वग्रहदूषित
प्रांजळ कथन आवडले.