मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जरुरत है, जरुरत है......

शिव कन्या · · जनातलं, मनातलं
मुल्ला नसरुद्दिन करडी दाढी [स्वतः ची] कुरुवाळीत, निवांत गप्पा छाटीत बसला होता. गप्पा मारता मारता मित्राने विचारले, “ नसरुद्दिन, तू कधी लग्नाचा विचार नाही का केला?” नसरुद्दिनची दाढी हसली. म्हणाला, “केला तर! कधीकाळी आम्ही पण तरुण होतोच कि! एकदा मी निश्चय केला - आपण स्वतः साठी एक आदर्श स्त्री शोधायची आणि तिच्याशी निकाह लावायचा. ठरवले. निघालो. वाळवंट ओलांडून दमास्कसला पोहचलो. नशीब बलवत्तर. तिथे एक स्त्री भेटली. अत्यंत देखणी. धर्मपरायण. संपूर्ण कुराण तोंडपाठ असलेली!” “मग?” “पण..... तिला काव्यशास्त्रविनोदातले ओ कि ठो कळत नव्हते. आणि व्यवहारज्ञान म्हणशील तर, शून्य. काय करायचीय अशी बेगम? मी प्रवास पुढे चालू ठेवला.इस्तंबूलला पोहचलो. इथेही नशिबाने साथ दिली. एका स्त्रीशी ओळख झाली. ती धर्मपरायण होती, तिला बाहेरचे जग माहित होते. तिची काव्यशास्त्रविनोदबुद्धी अजोड होती.” “मग?” “पण ...... रुपात मार खात होती. बेगम कशी देखणी हवी! चारचौघात उठून दिसणारी. मी शोध जारी ठेवला. पुढे इजिप्तला पोहचलो. नशीब सोबतीला होतेच. तिथेही एक स्त्री गाठ पडली!” सांगता सांगता , मुल्ला नसरुद्दिनचे डोळे चमकले. तंद्रीत पुढे सांगू लागला, “तिने मला जेवायला बोलावले. अप्रतिम लावण्यवती. मवाळ अंतः करणाची. नीतिमान. धर्मपरायण. काव्यशास्त्रविनोद जाणण्याची तरल बुद्धीमत्ता. दुनियादारी माहित असणारी! सर्वगुणसंपन्न! मला हवी होती तशी आदर्श स्त्री मिळाली मला!” “मग का नाही निकाह केला?” मुल्ला नसरुद्दीनच्या डोळ्यातली चमक विझली. थोडासा निराश, पण विचारमग्न होऊन म्हणाला, “काय सांगू दोस्त! तिला नवरा म्हणून आदर्श पुरुष हवा होता. ती पण एका आदर्श पुरुषाच्या शोधात होती!” [मुल्ला नसरुद्दीनच्या पारंपारिक कथा.]

वाचने 5472 वाचनखूण प्रतिक्रिया 21

श्रीरंग_जोशी 10/05/2015 - 17:50
अहाहा, खासंच आहे रुपककथा :-) .

पैसा 10/05/2015 - 21:36
जे मिळतंय त्यात खुश रहायला जमतं का बघा नाहीतर शोधत रहा!

कपिलमुनी 11/05/2015 - 16:28
_/\_

स्पंदना 11/05/2015 - 16:36
ते काय म्हणतात ना दुसर्‍याच्या डओळ्यातल कुसळ दिसत..तसा प्रकार. अन मग तसाच कुसळ शोधणारा दुसरा मिळाला की धक्का बसतो.