माझी ज्यूरी ड्यूटी ४
आधीचा भाग
बचावपक्षाच्या वकिलाने निवड प्रक्रियेत असा एक प्रश्न विचारला होता की "ह्या खटल्यात वेश्या व्यवसायाशी संबंधित मुद्दे उपस्थित होऊ शकतात. हा व्यवसाय राज्यात बेकायदा मानला जातो. तुम्हापैकी कुणाला धर्म वा अन्य श्रद्धेमुळे ह्या व्यवसायाविरुद्ध काही आक्षेप असतील तर सांगा". इथे कुणी आक्षेप घेतला नाही. पण खटल्यात काय होणार ह्याची एक अंधुक कल्पना आली.
सकाळी कोर्टात हजर झालो.पहिले काही दिवस कोर्ट कधीही वेळेवर सुरु झाले नाही. कधी १५ मिनिटे उशीर तर कधी अर्धा तास. आता आम्ही पुढच्या भागात येऊन बसलो. प्रेक्षकांकरता असणारा कक्ष बराचसा रिकामा.
मिसळपाव