माझी ज्युरी ड्यूटी ६
भाग ५
पीडित महिलेची साक्ष बरीच मोठी होती. जवळपास प्रत्येक मोठ्या सुट्टीनंतर दुभाष्या बदलत असे. एकदा एक गंमतीदार दुभाष्या आला होता. अनुवाद करताना एखाद्या नटासारखे चेहर्यावरील हावभाव जिवंत असायचे. कधी खांदे उंच करून, भुवया उंचावून, डोळे मोठ्ठे करून आपले भाषांतर सादर करायचा. तमाम ज्युरी मंडळींची करमणूक होत होती. तो दुभाष्या गेल्यावर सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. आश्चर्य म्हणजे जसा दुभाष्या असे तसे त्या साक्षीदार बाईंचा उत्साह कमीजास्त होत असे. ह्या नटसम्राटाच्या वेळी तिच्या उत्तरात एक जोश होता. नंतर काही शांत दुभाषी आले.
मिसळपाव