एक संघ मैदानातला - भाग २
डायरेक्ट दुपारी ४ ला डोळे उघडले.... मस्त झोप झाली होती. परत जेव्हा संध्याकाळी ग्राउंडवर पोचले तेव्हा एक गुड न्यूज मिळाली... आप्पा फक्त सकाळीच येणार होते. हुशशश..... सुटलो, निदान संध्याकाळी तरी मिलिटरी ट्रेनिंग नसणार हे ऐकून जीवात जीव आणि पायातही जीव आला.
आत्ता काय ह्या पोरी काही सुटणार नव्हत्या. आमचा ओपनच्या टीमचा सगळा सेट असल्यामुळे कव्हर सेट करता येणार होती. कव्हर फिरवल्यावर लगेच पाम्मीने धावत जाऊन टर्न घेतला…. झालं तूप्याची सटकली. तिने पम्मीच बखोट धरलं आणि तिला बाजूला केलं. ' ताई, टर्न मला लावायला सांगितला आहे दादांनी"... पम्मी वैतागून तुप्याला सांगायला लागली.
मिसळपाव