Skip to main content

रेखाटन

जरा जपून

लेखक Bhagyashri satish vasane यांनी गुरुवार, 03/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!

आयुष्य

लेखक Bhagyashri satish vasane यांनी बुधवार, 02/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पायाला लागली ठोकर तिथे बांधायचे घर जिथे काहिच नाही तिथे आभाळ आहेच वर जिवनाचे पुस्तक लिहिले मी स्वत:च्या चेहर्यावर वाचता आले तर विश्वास ठेव वेदनांच्या त्या शब्दांवर तूला कधीच ह्या मनाचा मजकूर समजला नाही मी बंद लिफाफा आहे जो कुणी उघडलाच नाही मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो कुणाला समजलाच नाही मन माझे कुणाला कळलेच नाही, तळ हातावर पोट घेऊन कष्टकरी बनवत फिरत होते, इवल्याशा पोटाची भुक भागावी म्हणूनच तर रक्त जाळत होते...!

फक्त तुझ्यासाठी...! 2

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 01/11/2016 या दिवशी प्रकाशित केले.
तु गेलीस पण हा मावळता सुर्य पौर्णिमेचा चंद्र आणि चांदण्या तेथेच स्तब्ध राहिल्या फक्त तुझ्यासाठी मनामध्ये प्राजक्तांच्या फक्त तुझ्यासाठी एकदा वादळ ही सुटले पण ते ही शांत झाले फक्त तुझ्यासाठी येत्या पावसाळ्यात आनंदाचे झरे वाहणारे फक्त तुझ्यासाठी शेवटी-शेवटी या फुलांमधील गंध ही सुगंधीत होणार फक्त तुझ्यासाठी आकाशातील तार्यांचा शितल गारवाही मंदावणार फक्त तुझ्यासाठी तो रोजचा वारा आहे पण तो रोजचा आहे पण तो तुला विसरणारा आहे फक्त तुझ्यासाठी माझ्या प्रेमाच्या फुलांची ओंजळ फक्त आणि फक्त तुझ्यासाठी...!

फक्त तुझ्यासाठी...!

लेखक Bhagyashri satish vasane यांनी सोमवार, 31/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी खुप आठवण आली तर काय करु? तुलाही माझी आठवण करुण देऊ की एकटीच तुझ्या आठवणीत झरु तुझ्याशी बोलावसं वाटलं तर काय करु? स्वत:शीच गप्पा मारु की अबोल राहुन मौन व्रत धरु तुला बघावस वाटलं तर काय करु? तुला शोधत राहू की स्वत:ला एकांतात नेऊ तुला स्पर्श करावासा वाटला तर काय करु? तुझा पहिला स्पर्श आठवू की तु आता माझा नाहिस ही मनाला जाणीव करुन देऊ तुझी आठवण घेऊन जाऊ की तुला विसरण्यासाठी जीव देऊ...!
काव्यरस

मूल दत्तक घेणे, प्रक्रियेची सुरुवात...

लेखक केडी यांनी गुरुवार, 27/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला फोन करून त्याचे आधी अभिनंदन करून, त्याची आणि त्याच्या बायकोची वेळ मागून घेतली. एका विकांताला त्याला आम्ही (चिरंजीव सुद्धा) जाऊन भेटलो, भरपूर बोललो, खूप छान माहिती मिळाली, आणि आत्मविश्वास वाढला. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून एक जाणवल, ते म्हणजे दत्तक घेणेची प्रक्रिया खरं तर खूप सोप्पी आहे, पण अर्थात वेळ काढू आहे.
आधीच धागा इथे आहे. मित्राकडून सगळी माहिती घेऊन, आम्ही पुढच्याच विकांताला सोफोश [SOFOSH] च्या ऑफिस मध्ये फोन करून, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन भेटायला गेलो.

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा नक्कीच नाही!

लेखक केडी यांनी बुधवार, 26/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
आदित्य कोरडे ह्यांनी ह्या विषयावर हा धागा काढला. त्यांना दुर्दैवाने प्रक्रियेत आलेला अनुभव हा नक्कीच चांगला न्हवता. आम्ही २०१३ मध्ये मूल (मुलगी) दत्तक घेतली तेव्हा आम्हाला आलेला अनुभव मात्र निश्चितच चांगला होता (काही थोडे सरकारी विलंब वगळता), म्हणून हि लेखमाला लिहितोय. ह्याचा उद्देश, आम्ही काही जगा वेगळे केले, किंवा इतर कुठलाही नाही, तर आम्हाला मिळालेले मार्गदर्शन, सल्ले आणि आलेले अनुभव इतरांशी शेयर करून, त्यांना त्यातून प्रोत्साहन आणि योग्य दिशा मिळवी एवढाच हेतू आहे.

मला गरज आहे तुझी

लेखक Bhagyashri satish vasane यांनी मंगळवार, 25/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
गरज आहे मला आज त्या तुझ्या आधाराची अडखळणारे पाऊल माझे सावरणार्या तुझ्या हातांची गरज आहे मला तुझ्या त्या मोहक मिठीची दडपण असता या मनी तुझ्यात स्वत:ला सामावून टाकणार्या त्या बाहूंची गरज आहे आज मला त्या तुझ्या कोमल प्रितीची भय दाटताच या मनी आपलेपणा देणार्या त्या तुझ्या स्पर्शाची गरज आहे आजही मला माझ्यावरच्या त्या तुझ्या नि:स्वार्थी प्रेमाची सारे जग असुरक्षित वाटतांना तू जवळ आहेस या जाणिवेची गरज आहे मला खूप गरज आहे....
काव्यरस

देशपांडे -आमचे वडील!

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
देशपांडे म्हणजे आमचे वडील.आमचं मूळचं आडनाव देशपांडे पण त्यांनी मी दुसरीत असताना ते बदलून कोरडे केलं . त्यांना म्हणे बाबासाहेब पुरंदऱ्यान्नी सांगितलं कि आमचे पूर्वज रघुनाथ पंत कोरडे हे शिवाजी महाराजांच्या पदरी वकील होते आणि आग्र्याहून महाराज निसटताना हे मागे राहिले होते ते नेमके सापडले , त्यांचा औरंगजेबाने खूप छळ केला पण त्यांनी महाराज कोणत्या वाटेने महाराष्ट्रात परतणार ह्याचा थांग पत्ता काही मोगलांना लागू दिला नहि. पुढे ते सुटले तेव्हा त्यांच्या ह्या स्वामिभक्ती साठी त्यांना नाशिक जवळचे वतन (देशपांडे वतन) दिले. त्यामुळे म्हणे आम्ही मूळ कोरडे होतो त्याचे देशपांडे झालो.

मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का?

लेखक आदित्य कोरडे यांनी मंगळवार, 25/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मूल दत्तक घेणे हा मूर्खपणा आहे का? मूलतः हा प्रश्नच मूर्खपणाचा आहे पण तो मला पडलेला नाही. वसुधाने(बायको) मानसिक समुपदेशक म्हणून काम करायला सुरुवात केल्यापासून एक एक वल्ली येऊन भेटतात त्यातल्याच एकाने विचारलेला हा प्रश्न. आता बायकोकडे येणाऱ्या रुग्णांबद्दल लिहिणे नैतिकतेला धरून नसल्याने त्याबद्दल जास्त लिहित नाही पण या प्रश्नाने विचार चक्र सुरु झाले. आम्ही आमची एकुलती एक मुलगी दत्तकच घेतली आहे आणि त्या सगळ्या सरकारी प्रक्रियेतून जाताना अनेक अनुभव आले,अनेक लोक भेटले त्यांच्या प्रतिक्रिया, अनुभव (बऱ्याचदा अननुभव).

वादळ

लेखक Bhagyashri satish vasane यांनी शुक्रवार, 21/10/2016 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनाच्या वाटेवर बरीच होती स्वप्न ह्रदयाच्याच्या जवळची बरीच होती मानसं आयुष्याच्या सायंकाळी सगळं कसं दाटून आलं मनाच्या ह्या कोपर्यामध्ये स्थान तुझं तेच राहिलं भरुन येत मन कधी, वाटत उधळुनी द्यावा खेळ सारा मनातल्या ह्या वादळाला हवी आता नवी दिशा...!