Skip to main content

राजकारण

कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 07/08/2010 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र 'मिपा'करांनो, कराचीहून प्रकाशित होणार्‍या 'डॉन' या आंग्ल वृत्तपत्राला मी एक पत्र पाठविले होते. साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत, पण या पत्राला हिरवा झेंडा मिळाला. मूळ संपादकीयाचे आणि माझ्या पत्राचे दुवे दिले आहेत आणि मजकूर स्पष्ट असल्यामुळे कांहीं अवांतर किंवा अधिक लिहिण्याचे टाळले आहे.

टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

लेखक अविनाश ओगले यांनी गुरुवार, 05/08/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली! परवा एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज! ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड"पाशी येऊन

आता पुढची लढाई...

लेखक निनाद यांनी गुरुवार, 05/08/2010 06:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रगती अभियान या संस्थेद्वारे नाशिकमध्ये कार्यरत, तरुण, तडफदार आणि सदैव उत्साही व्यक्तीमत्व, अश्विनी कुलकर्णी यांचा हा लेख दै. लोकमत मध्ये पूर्व प्रसिद्ध झाला आहे. परंतु त्यावर येथेही काही विधायक चर्चा होऊ शकेल असे वाटून देत आहे. लेख वर्तमानपत्रासाठी लिहिला गेल्याने स्वरुप आंतरजालिय लिखाणासारखे नाही याची कल्पना आहे. पण सांभाळून घ्यावे! तसेच अश्विनी कुलकर्णी यांना मिपावरही येण्यासाठी विनंती केली आहेच. आता पुढची लढाई... माहितीच्या अधिकारातून संवेदनशील माहिती हाती आली, गैरकारभार झाल्याचंही दिसतं आहे; पण पुढे काय? या माहितीचं काय करायचं? कोणाकडे दाद मागायची?

फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा!

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 29/07/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
फडकवा आपला लाडका तिरंगा....पण सुलटा! आपण सगळेच आपल्या "तिरंगी" ध्वजाचे अभिमानी आहोत. जेंव्हां मी आपला ध्वज उलटा लावलेला पहातो तेंव्हां माझं तर रक्तच उसळतं! एक अनुभव माझा स्वतःचा! साधारणतः सर्व आंतरराष्ट्रीय परिषदांत परिषद संपल्यावर एक 'ओली' मेजवानी देण्यात येते व त्यात परिषदेत ज्या ज्या सभासदांनी भाग घेतलेला असतो त्या त्या देशांचे ध्वज एका विशाल फलकावर लावले जातात. एकदा जर्मनीतील अशाच एका परिषदेत माझ्यासारखे इतरही भारतीय प्रतिनिधी असल्याने आपला तिरंगी ध्वज लावला होता, पण (बहुदा) अज्ञानामुळे उलटा लावलेला होता (हिरवी पट्टी वर ठेऊन).