Skip to main content

राजकारण

अस्तित्वकण

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 18/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत

पशु-पक्षीभूषण

लेखक तिमा यांनी मंगळवार, 18/08/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्‍या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत. सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला. कावळ्यांनी सर्वप्रथम , एका तळयांत होती' या गाण्याविषयी आक्षेप नोंदवला.

संसद सदस्य ते गोंधळी - एक प्रवास

लेखक आकाश कंदील यांनी शुक्रवार, 14/08/2015 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही आठवडे संसदेत प्रचंड गोंधळ चालू आहे. वृत्तवाहिन्यांमध्ये आणि वर्तमानपत्रात याबद्दल बरेच लिहिले आणि बोलले गेले आहे, त्यामुळे मी या विषयावर धागा काढणारच नव्हतो. एक अशी आशाही होती की किमान शेवटच्या दिवशी सगळ्या पक्षांना (सन्माननीय अपवाद सोडून) सुबुद्धी येईल आणि 'G.S.T.' पारित होईल. पण आता अधिवेशन संपले काही ठोस हाती न लागता. खूप वाईट वाटले. म्हणून हा धागा प्रपंच. कॉंग्रेसने तर होईल तेवढे बालिशपणाचे प्रदर्शन केले. मला वाटते 'ललित मोडी' हा मुद्दा पूर्ण अधिवेशन वाया घालवण्याएवढा महत्त्वाचा नक्कीच नव्हता. फार फार तर दोन दिवस या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडता आले असते.

अगदी खर्री लोकशाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 05/08/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
“लोकशाही म्हणजे रे काय, भाऊ?” “अरे, लोकशाहीवर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, अनेक छोटी मोठी पुस्तकं लिहिली गेली आहेत, अनेक चर्चा-वाद झाले आहेत. त्यातून काही माहिती मिळेल ती मिळेल. पण तुला थोडक्यात सांगतो. लोकांनी केलेलं, लोकांसाठी केलेलं, लोकांचं राज्य ती लोकशाही. ती आपल्या भारत देशात आहे, ती अमेरिकेत आहे, ती युरोपात आहे, ती अनेक पश्चिमी देशात आहे. तिलाच लोकशाही म्हणतात!” “मग ही लोकशाही निरनिराळ्या प्रकारची असते का रे भाऊ?” “हो, अगदी बरोबर.

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

फाशी आणि प्रसिद्धी माध्यमांचा विपर्यास - एक विश्लेषण

लेखक विकास यांनी गुरुवार, 30/07/2015 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख माध्यमे माहिती कशी वापरू शकतात या संदर्भात आहे, जरी त्याचे आत्ताचे कारण आणि संदर्भ याकूबची फाशी असली तरी. आधी याकूबवरील चर्चेत प्रतिसाद म्हणून देणार होतो पण विश्लेषण असल्याने येथे वेगळा काथ्याकूट टाकत आहे. त्यामुळे चर्चा करताना केवळ याकूब सोडून विस्तॄत मुद्दयावर चर्चा होऊदेत अशी विनंती. मी उठसूठ फाशीच्या शिक्षेच्या बाजूने नाही. मात्र भारतीय घटनेत सांगितलेल्या "रेअरेस्ट ऑफ दी रेअर" म्हणून दिल्या जाणारी शिक्षा गरज पडल्यास असली पाहीजे अशा मताचा नक्की आहे. २००० सालापासून ते ३० जुलै २०१५ पर्यंत भारतात ४ जणांना फाशी दिली गेली आहे.

सर्प दंश - दोन लघु कथा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 29/07/2015 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आज्ञा दिली, यात विचार कसला, ठेचुन टाका त्याला. सैनिकानी तत्काल त्या नागाला ठेचुन ठार केले. दुसरी कथा: महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे.

भारतरत्न अब्दुल कलाम

लेखक विकास यांनी सोमवार, 27/07/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
APJ Kalam भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले. आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे.

आमचाही पाउस.....

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 26/07/2015 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मिपावर सुंदर कवितांचा एवढा पाउस पडतो आहे की सारे वातावरणच बदलले. त्यातच संमं ने पण छायाचित्रकलास्पर्धेचा विषयपण पाउस निवडला आणि मग हे कवी लोक जास्तच पेटले. आमची प्रकृती थोडी नाजुकच. या बदललेल्या वातावरणाचा नाही म्हटले तरी परिणाम होतोच. काल रात्री शेवटी विडंबनारीष्ट घेउन झोपावे लागले. तेव्हा कुठे सकाळी मोकळे मोकळे वाटले. फ्रेश झाल्यावर ठरवले की चला पावसाळ्यात थोडी रंगपंचमी खेळूया...

अणुयुद्ध (शतशब्दकथा)

लेखक सटक यांनी रविवार, 19/07/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वेकडुनीचा सूर्य, चन्द्र हतवीर्य, बुडाले बेट.. रक्तील दिलासे अर्घ्य, काहीना वर्ज्य, यमाची भेट !! त्या कितीक पडल्या रती, मदन संगती, जीव तो स्वस्त.. युद्धाची वाढे गती, नवे संगती, दुखवले दोस्त !! केलेच पाहिजे अता, शांत राहता, शेण तोंडात... जमवून खुळे ठरवता, गिधाडी जथा, घडे आक्रित !! अणुरेणू फुटाया आले, भरून घेतले, निघाले गगनी... बोटात वीष साठले, बटन दाबले, थरारे अवनी !! आकाशी फुलले झाड, मिळेना पाड, सुटेना गुंता... त्या जहरफुलाचे वेड, जीवाची राड, हलेना चिंता !! कित्येक चिरडले देह, धनाचा मोह, गळेना आता.. पसरला धरेवर डोह, तयाचा टोह, न लागे पुरता !! क्षणभरात सरले युद्ध, वारला बुद्ध, लपविती त